Maharashtra Rain : हवामान विभागानं (Imd) राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तासात छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव, जळगाव, नाशिक, नंदुरबार, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी
पुढील तीन ते चार तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. या पावसामुळं दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच रहदारी कमी होईल. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
नागपुरात मुसळधार पाऊस, नाग नदीला पूर
नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नाग नदीला पूर आला आहे. नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नाग नदीला पूर आला आहे. नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिन्याचे देखील वीस दिवस कोरडे गेले. त्यानंतर उरलेल्या दहा दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. काल आणि आज झालेल्या या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान तर मिळालाच आहे, पण कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये देखील काही प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: