Maharashtra rain : सध्या राज्यातील तुरळक भागात पाऊस (Rain) पडत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात राज्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचा हवामान विभागाचा अंदाज.


या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पुण्यातील चार धरणात 'इतका' पाणीसाठा, पाहा आकडेवारी