Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात नेमकं कसं हवामान असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. आजपासुन पुढील 2आठवडे म्हणजे गुरुवार दिनांक 24 जुलैपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपीचीच शक्यता जाणवते. 

मुंबईसह कोकणात मध्यम पावसाची शक्यता

मुंबईसह कोकणात केवळ मध्यम पावसाची शक्यता पुढील दोन आठवड्यात जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर संपूर्ण विदर्भ व सांगली सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात गुरुवार-शुक्रवार दिनांक 16 ते 17 जुलै ला दोन दिवस केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.तसेच उत्तर जळगांव जिल्ह्याच्या तालुक्यात आजपासुन 4 दिवस म्हणजे बुधवार दिनांक 16 जुलै पर्यंत अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

कशामुळं ही पावसाची उघडीप?

बंगालच्या उपसागारात कमी दाब क्षेत्र तयार झालं आहे. हे पूर्व भारतात जोरदार पाऊस देत पश्चिम बंगाल व ओरिसातून उत्तर व उत्तर -वायव्येकडे मार्गक्रमण करण्याच्या शक्यता आहे. त्यामुळं अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकल्यामुळे  ह्या दोन आठवड्यात पावसाचा जोर कमी जाणवत आहे. ह्या जोडीला जागतिक पातळीवर ही दोन घटना महाराष्ट्रातील पावसासाठी सध्या मारक ठरत आहे. 

सध्या मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सक्रिय असून राजस्थान पासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावणार असून जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर ,जालना जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 30-40 किमी असून हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: