Sanjay Gaikwad : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या टीकेला आमदार आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गुवाहाटीचा (Guwahati) खर्च कोणी केला होता? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता. याला उत्तर देताना 'गुवाहाटीचा खर्च मी केला होता' असे संजय गायकवाड म्हणाले. ते बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


उद्धव ठाकरेंना कोटी करण्याशिवाय दुसरा धंदा नाही


शासन आपल्या दारी आणि थापा मारतय भारी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, उद्धव ठाकरेंना कोटी करण्याशिवाय दुसरा धंदा नाही. अडीच वर्षात तुम्ही घरात बसून होते. तुम्ही शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना काय दिलं? असा सवाल गायकवाड यांनी केला. किमान आम्ही देतोय याचे कौतुक तरी करा असे गायकवाड म्हणाले. 


बच्चू कडू संघर्षातील दिवा


बच्चू कडू यांना इंडिया आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिलं आहे. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, बच्चू कडू संघर्षातील दिवा आहे. लोकांशी नाळ जुळलेला पदाधिकारी आहे. ते कोणाच्या हाताखाली काम करु शकत नाही. त्यांनी मंत्रीपदाची आशा सोडली असल्याचे गायकवाड म्हणाले.  


विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करु शकत नाहीत


दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. असे कितीही विरोधी पक्ष नेते एकत्र आले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करु शकत नाही. हे मनाने हरलेले आणि शरीराने थकलेले किती दिवस टिकणार असी खोचक टीका संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर केली आहे. 


रविवारी बुलढाण्यात होणार  शासन आपल्या दारी कार्यक्रम 


परवा म्हणजे रविवारी (3 ऑगस्ट) बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाण्यात येणार आहेत. या कार्यक्रमस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डीक्कर आत्मदहनाचा प्रयत्न करु शकतात. यामुळं प्रशांत डीक्कर यांना शोधून काढण्याचं आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.


नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे


गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला? असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या (Opposition Meeting) आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उदय सामंतांकडून (Uday Samant) मांडण्यात आला आहे. या टिकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या:


आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं; मग आज भाजपाने काय केलं? - आदित्य ठाकरे