Maharashtra Politics : गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) जरी बाळासाहेबांची शिवसेना (SHinde Group) या पक्षात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात उपनेते या पदावर आहेत.  गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी म्हटलं की, हा माझ्या वडिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहील, असे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले आहे. 




शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर गजानन कीर्तीकर काय म्हणाले?

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हटलं की, रवींद्र नाट्य मंदिरात हा ऐतिहासिक क्षण आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले. आज मी शिंदे साहेबांसोबत जात आहे. गेले अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सरकार ठाकरेंचे होते पण चालवत पवार  होते.  प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन शिवसैनिकांना जुमानत नव्हते. मी ज्येष्ठ असून देखील विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना मोठी पद दिली. अखेर सर्वांनी बोलून एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास खडतर आहे त्यामुळे शिवसैनिकांनी उठाव करणं गरजेचं आहे. उद्धवजींनी चुकीच्या माणसांना बाजूला घेतलं. त्यामुळे आज मीही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आलो आहे, असं गजानन कीर्तिकर म्हणाले. 


गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते. 


शिंदे गटात सामील झाले 13 खासदार
1. राहुल शेवाळे 
2. भावना गवळी 
3. कृपाल तुमने 
4. हेमंत गोडसे 
5. सदाशिव लोखंडे 
6. प्रतापराव जाधव  
7. धर्यशिल माने 
8. श्रीकांत शिंदे 
9. हेमंत पाटील 
10. राजेंद्र गावित 
11. संजय मंडलिक 
12. श्रीरंग बारणे 
13. गजानन किर्तिकर