Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha Live Updates: राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे; नाना पटोले यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र

Maha Vikas Aghadi Vajramuth Jahir Sabha: महाविकास आघाडीची वज्रमूठ जाहीर सभा लाईव्ह अपडेट्स...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2023 08:53 PM

पार्श्वभूमी

Maha Vikas Aghadi Vajramuth Jahir Sabha:  महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.  महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना...More

भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरु; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, राज्य सरकार, तसेच पीएम मोदी यांच्यावर तोफ डागली. भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले. लोकशाही म्हणजे दहीहंडी आहे का? दिसली की फोडा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. अदानी मुद्यावरूनही त्यांनी भाजपला इतके का हादरला? अशी विचारणा केली.