Sanjay Raut News : दिवसेंदिवस देशातील वातावरण आणीबाणीपेक्षाही भयंकर होत आहे. रोज देशातील लोकशाही खड्यात जात असल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. सरकारला जे प्रश्न विचारत आहेत, त्या राजकीय विरोधकांना विविध प्रकरणामध्ये गुंतवण्याचे काम सुरु असल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीचे शिक्षण मंत्री म्हणून मनिष सिसोदियांना (Manish Sisodia) जगाला हेवा वाटावं असं काम केल्याचे राऊत म्हणाले. तुमच्या पक्षात सगळे संत आणि महात्मे भरलेत का? असा सवालही राऊतांनी भाजपला (BJP) केला.


सर्व प्रसंगांना सामोरं जाऊन आता लढलं पाहिजे 


मनिष सिसोदियांना एका धोरणात्मक निर्णयासंदर्भात अटक केली आहे. अशा प्रकारचे निर्णय हे कॅबिनेटचे असतात. कोणा एका व्यक्तीचे नसतात असे राऊत म्हणाले. छगन भुजबळांना अटक केली तो निर्णय कॅबिनेटचा होता. खोटे आरोप करुन, यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचे राऊत म्हणाले. विरोधकांना अटक करायची, त्यांना जामीन मिळून द्यायचा नाही. त्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर करायचा. हे बेफाममध्ये दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंडमध्ये सुरु असल्याचे राऊत म्हणाले. मात्र, या सर्व प्रसंगांना सामोरं जाऊन आता लढलं पाहिजे असेही राऊत म्हणाले.


INS विक्रांतचा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा घोटाळा


केंद्र सरकारला माझे आवाहन आहे की, तुमच्या पक्षात सगळे संत आणि महात्मे भरले आहेत का? रोज तुमची 100 प्रकरणे बाहेर येतात. या महाराष्ट्रात झाडं हलवलं तर भ्रष्टाचाराची 100 प्रकरणे बाहेर पडतील असे राऊत म्हणाले. LIC चे पैसे बुडवण्यात आले. यात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. पंजाब नॅशनल बँक कोणी बुडवली, त्यांना साधी नोटीस पाठवयाचे तर धाडस झाले का? असा सवाल राऊतांनी सरकारला केला. या महाराष्ट्रात INS विक्रांत वाचवण्याच्या नावाने सगळ्यात मोठा घोटाळा झाला. काय झालं. चौकशी सुरु होताच सरकार बदललं मग क्लिनचीट मिळाल्याचे राऊत म्हणाले. चौकशी का होऊ देत नाहीत असे राऊत म्हणाले.


तुम्ही अत्यंत घातक पायंडा पाडला, राऊतांचा भाजपवर निशाणा


तुम्ही केलेली सुरुवात ही लोकशाही अत्यंत घातक असल्याचे राऊत म्हणाले. उद्या 2024 ला सत्तेत कोण येईल हे सांगता येत नाही. तेव्हा जे सरकार येईल ते सरकार जर तुमच्या पावलावर पाऊल ठेऊन विरोधकांच्या बाबतीत असे चालायला लागले तर तुम्हाला कोण वाचवणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तुम्ही अत्यंत घातक पायंडा पाडल्याचे राऊत म्हणाले. देशात असे कधी घडत नव्हते, पण गेल्या सात वर्षात घडत असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : 2024 ची तयारी सुरु, देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात : संजय राऊत