Uddhav Thackeray : ठाणेकर गद्दारांनी धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात यायची मला गरज नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाण्यातील राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील खरं चित्रं आपण महाराष्ट्राला दाखवलं आहे. पोलिसांची हतबलता देखील पाहिली. त्यांचा दोष नाही. या सरकारने मराठा आंदोलक, वारकरी यांच्यावर हल्ला करायला लावला होता. आता यांनी पोलिसांना चोरांचे रक्षण करायला सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. . 


सत्तेचा आधार घेऊन हे नेबळट अत्याचार करत आहेत. यांनी बुलडोझरच्या साह्याने शाखा पडली आणि त्यांनी एक यांचं खोक आणून लावलं आहे. शिवसेनेची शाखा ही तिथच असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. कुणाचंही नाव कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसल्याचे ठाकरे म्हणाले. मी पोलिसांना आव्हानं करतो की तुम्ही बाजूला व्हा आम्ही यांना बघतो असा इशाराही ठाकरेंनी दिला. आम्ही सयंम राखला आहे. मी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की, मी इथं येणारं आहे. परंतू यांनी तिथं भाडोत्री गुंड आणून बसवले आहेत.  त्यांना पोलिसांचे संरक्षण दिल्याचे ठाकरे म्हणाले. 


डिसेंबर किंवा जानेवारीत ठण्यात आम्ही सभा घेणार 


डिसेंबर किंवा जानेवारीत ठण्यात आम्ही सभा घेणार आहोत. सत्तेच्या माजावर यांनी शाखा पाडली आणि आता घरं देखील पाडतील असे ठाकरे म्हणाले. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात यायची गरज नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


गद्दारांना सत्तेचा माज, सत्तेचा आधार घेऊन अत्याचार


आम्ही ठाण्यात आणि मुंब्य्रातही येऊन दाखवलं. सकाळी कोणीतरी ठाण्यात येण्याचं आव्हान दिलं होत. आम्ही इथं आलो असल्याचे उद्धव ठाकर म्हणाले. गद्दारांना सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करत आहेत. आमची शाखा बुलडेझर पाडून लावली. पण आम्ही गप्प बसणार नाही. कारण ती शाखा आमची आहे. शिवसेना ही एकच आहे, ती आमची आहे. त्यामुळं शिवसेनेची शाखा जिथे आहे तिथेच राहील असे ठाकरे म्हणाले. 


गद्दारांचं राजकीय आयुष्य थोडं 


पोलिसांकडून त्यांचं रक्षण होणार आणि आमच्या लाठ्या चालणार हे चालणार नाही. गद्दारांचं राजकीय आयुष्य थोडं राहिलं आहे. त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का पडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आज आम्ही संजम दाखवला आहे. दिवाळीत कुठेही हंगामा नको आहे म्हणून मी संजम दाखवला आहे. मी तिकडे येणार हे आधीच सांगितलं होतं, तरी देखील तिथे पोलिसांनी भाडोत्री गुंडांना येऊ दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.