Amol Mitkari on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेमहमीच अकलेचे दिवे लावतात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मिटकरी यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. आता तर त्यांना महायुतीचे प्रचारक म्हणून नेमल्याचा टोला देखील मिटकरींनी लगावला. महायुतीचे खासदार फुटतील याबाबत राऊतांनी वक्तव्य केलं होते. यामागे त्यांची अस्वस्थता असल्याचे मिटकरी म्हणाले. कारण त्यांच्या राज्यसभा खासदारकीचा चान्स पण गेलेला आहे. त्यामुळं आजचं संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्यासारखेच असल्याचे मिटकतरी म्हणाले.
महायुतीसोबत सर्वजण एकत्र आले तर आपलं काय खरं नाही असे संजय राऊत यांनी वाटत आहे. कारण त्यांचा राज्यसभेचा चान्स जाईल असे मिटकरी म्हणाले. त्यामुळं संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे अकलेचे दिवे असल्याचे मिटकरी म्हणाले.
रोहित पवारासह जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी एकत्र यावी असं वाटतं का?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबात आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या विधानाचं मी स्वागत करतो. रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी एकत्र यावी असं वाटतं का? हे आधी स्पष्ट करावं, असा सवाल यावेळी मिटकरी यांनी केलाय. आम्हाला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे, तसं नसतं तर काल अजितदादा बुके घेऊन शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेच नसते असेही मिटकरी म्हणाले. दरम्यान, त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्या आम्ही आमच्या मांडू, याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही मिटकरी म्हणाले.
शरद पवार भाजपसोबत जाणार का? नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
अजित पवारांसोबत जाणे आणि भाजपासोबत जाणे हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. त्यांच्याबरोबर जवळपास मी रोजच असतो. राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा आजूबाजूलाच आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नसल्याचे संजय राऊत म्हणाले होते. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नौशे गौशे घाबरून पळून गेलेले आहेत. त्यांच्या नादाला लागून ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.