Rohit pawar : पक्षातील खऱ्या निष्ठावान नेत्यांना आता ताकद मिळत आहे. त्यामुळं येत्या काळात आमचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Mla Rohit pawar) यांनी केलं. मी मोठ्या नेत्यांबद्दल बोललो नव्हतो. मी जिल्हा पातळीवर असणाऱ्या नेत्यांबद्दल बोललो होत असेही रोहित पवार म्हणाले.आमच्या पक्षात काही एजंट होते. ते एजंट आता बाहेर पडल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एका मुलाखतीत केली होती. याबाबत त्यांनी आज स्पष्टीकरण दिले.
खरे निष्ठावान नेते मागेच राहायचे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात असे नेते होते की, ते स्वत: अजित पवार आणि शरद पवार यांच्या पुढे पुढे करायचे. खरे निष्ठावान नेते मागेच राहायचे. निष्ठावान असणाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्यात काहीजण अडथळा आणत होते असे रोहित पवार म्हणाले. ते लोकलचे नेते आता दुसऱ्या गटात गेले आहेत. मी त्यांच्याबद्दल बोललो होतो. मी वरिष्ठ नेत्यांच्याबाबत बोललो नसल्याचे रोहित पवार म्हणाले.
अभ्यास करुन योग्य त्या व्यक्तिला ताकद देण्यात येईल
आपण ज्यावेळी सत्तेत असतो, त्यावेळी आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. काही निष्ठावान लोकांकडे दुर्लक्ष झालं आहे, हे मान्य केलं पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. जिथं सत्ता असते तिथं काही लोकं जात असतात. सत्ता, पैसा आणि ताकद त्यांच्याकडे आहे म्हणून काही लोक तिकडे गेल्याचे रोहित पवार म्हणाले. आमदारांचे ऐकणारेचं पदाधिकारी असतील तर नवीन लोकं पुढे येणार नाहीत असे रोहित पवार म्हणाले. सध्या पक्षात काही प्रमाणात बदल झाले आहेत. येणाऱ्या काळात अभ्यास करुन योग्य त्या व्यक्तिला ताकद देण्यात येईल. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: लक्ष देत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
कार्यकर्ते पवारसाहेबांसोबत
कार्यकर्ते पवारसाहेबांसोबत आहेत. जिथं पवारसाहेबांची सभा होईल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले. पूर्वी काही पदे आमदारांनी सांगितली म्हणून देण्यात आली होती. मात्र, काही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना आणलं जात नव्हते. हे कार्यकर्ते नावापुरते होते. हे सगळे कार्यकर्ते आता दुसऱ्या गटात गेले आहेत. त्यामुळं आता पक्षात निष्ठावान राहिल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.
पुण्यात पवारसाहेबांची सभा होणार
राजकीय पोळी भाजून घेणारी मंडळी परत पक्षात आली तर आम्ही त्यांना पक्षात घेणार नसल्याचेही रोहित पवार म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत पवारसाहेब निर्णय घेतील. आम्ही जास्तीत जास्त जिल्हापातळीवरच्या, प्रदेशपर्यंत बोलू शकतो असे रोहित पवार म्हणाले. तिकडे गेलेली जिल्हापातळीवरची लोकं परत घेतली तर पुन्हा पहिल्यासारखेचं होईल असे रोहित पवार म्हणाले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पवार साहेबांची सभा होणार आहे. बारामती हा जिल्हा नाही, त्यामुळं पुण्यात शंभर टक्के पावरसाहेबांची सभा होईल असे रोहित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: