Maharashtra Politicis : तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार (Sharad Pawar) हेच आहेत, हे अख्या जगाला माहित आहे. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार (Ajit Pawar) इतके मोठे नाहीत असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. अजित पवारांनी  शरद पवार  यांच्यावर बोलावं. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


मी कोणाला वितारुन आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. राज्यात कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल की खरी राष्ट्रवादी शरद पवार यांची असे आव्हाड म्हणाले. माझं आंदोलन शरद पवारसाहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलोच नाही असे आव्हाड म्हणाले. 


शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता?


तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता हा शरद पवारच आहे, हे अख्या जगाला माहित आहे. शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. ते जर बारामतीतून निवडणूक लढवत असतील तर यात गाजावाजा करण्याची गरज काय?
तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं, हे स्वतः विचार करा. 5 वर्ष पवार साहेबांचं डोकं कोणी खाल्लं? भाजपसोबत चला हे कोण कोण सांगायचं याचं चिंतन करा असे आव्हाड म्हणाले. शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून आपण सत्तेत यायचं हे यांना हवं होतं. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 


बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही


शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून सत्तेत यायचं हे आपणास हवं होतं. मी कोणाशी चर्चा केली नाही, बैठका घेतल्या नाहीत, ना कोणाला भेटलो. आंदोलन करायला मला कोणाचीही परवानगी लागत नसल्याचे आव्हाड म्हणाले. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही असे आव्हाड म्हणाले. तुम्ही शरद पवार यांना घाबरवायला जाता, बस करा हे बालिश राजकारण. काकाच्या पाठीत सुरा कोणी भोकसला, स्वतः च्या ताईला त्रास कोणी दिला असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.  


बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही


आपल्या इथे पण निवडणुका लागल्या की सर्व स्वस्त होईल. निवडणुका झाल्या की परत महाग होईल. त्यामुळ महाराष्ट्रानं सावध राहावं असे आव्हाड म्हणाले. पवारसाहेबांनी आधीपासून जातीयवादी शक्तीसोबत हात मिळवणी केली नाही ही यांची अडचण होती असे आव्हाड म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


JItendra Awhad : 'एकाच पुनर्वसन कराल पण इतर 39 जणांचं काय?' फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर आव्हाडांचा सवाल