Amit Deshmukh : सत्ताधाऱ्यांनी मराठवाड्यात अनेक घरं फोडली. मला वाटलं लातूरमध्ये (Latur) असं होणार नाही. पण त्यांनी लातूरमध्ये देवघर फोडलं, पण देवघरातील देव आमच्याबरोबर असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केलं. विधानसभेच्या निवडणुकीत आता महाराष्ट्रात परिवर्त घडेल. महाराष्ट्राची लूट थांबली पाहिजे असे देशमुख म्हणाले. राज्यात भ्रष्टाचार मोठा वाढला आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार होते. तेथील सरकारवर चाळीस टक्के सरकार असा आरोप केला जात होता. पण महाराष्ट्रातील सरकार हे दोन पावलं पुढे आहे. राज्यातील भाजप सरकार हे साठ टक्के सरकार आहे. हे मुक्त करण्याची गरज असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
तुम्ही कामाला लागा. पक्षश्रेष्ठी आपलं काम बघूम आपल्याला संधी देतील असे अमित देशमुख म्हणाले. सर्व खासदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करत असल्याचे देशमुख म्हणाले. मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित 3 खासदारांचा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लातूरमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याची चर्चा सुरु आहे. पण माझ्याकडून ब्रेकिंग न्यूज कधी मिळणार नाही. पण नाना पटोले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतील असे देशमुख म्हणाले.
नाना पटोले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतील
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याची चर्चा सुरु आहे. पण माझ्याकडून ब्रेकिंग न्यूज कधी मिळणार नाही. पण नाना पटोले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतील असे देशमुख म्हणाले. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम केलं. त्यामुळं व्यासपीठावरील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी मराठवाड्याचं पालकत्व घ्यावं असे अमित देशमुख म्हणाले. मराठवाड्यामध्ये काँग्रेसने तीन जागा लढवल्या आणि तिनही जागा जिंकल्या. लातूर जिल्ह्यामध्ये अनेकजण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तुळजापूर, औसा या मतदारसंघाची नावे अमित देशमुखांनी घेतली. तसेच उदगीर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसला सुटवा असे अमित देशमुख म्हणाले. कारण, या मतदारसंघात ग्रामपंचायती, जिल्हा, परिषदा, मार्केट कमिट्या, सोसायट्या हे सारं जाळं काँग्रेस पक्षाचे असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांनी लोकसभा निवडणुकीपूरर्वी भाजपात प्रवेश केला होता. तसेच राज्याचे माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी देखील काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
महत्वाच्या बातम्या:
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये कोणाचं वर्चस्व? कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? सध्याची राजकीय परिस्थिती काय?