Nitesh Rane : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई (Mumbai) विकली असती असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. तसेच पाटणकर आणि सरदेसाई यांच्याकडून मुंबईला धोका असल्याचे राणे म्हणाले. तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विचारणार का? असा सवालही राणेंनी केला. आज सकाळी नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 


उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका निभावणार का? 


बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी विरोधात पाऊल उचलले होते. याबाबत माझा बाप चोरला अशी भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांची भूमिका निभावणार का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. 
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवर अन्याय वाढल्याचे नितेश राणे म्हणाले. सगळे नेते त्यांना जाब विचारतील का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.


 लाचार कोण, खोटारडे कोण हे सर्वांना माहीत


मुंबईला ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गिळत होती. मुंबई वाचवण्याचे काम मोदी-शाह-फडणवीस यांनी केलं असल्याचे नितेश राणे म्हणाले. लाचार कोण, खोटारडे कोण हे सर्वांना माहीत असल्याचे राणे म्हणाले. 
संजय राऊत यांनी अनेक भाकीत केले आहेत. त्यातील एकही भाकीत खरं झालं नसल्याचे नितेश राणे म्हणाले. संजय अटक होण्याच्या भीतीने बोलत आहेत. ते जेलमध्ये जाणार असल्याचे राणे म्हणाले.


सुनील राऊतांना पक्षात घेण्यासाठी कोणी 100 कोटी नाहीतर 100 रुपये पण देणार नाही


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांना पक्षात घ्यायला कोणी 100 कोटी नाहीतर 100 रुपये पण देणार नाही असे नितेश राणे म्हणाले. राजाराम राऊत यांची दोन्ही मुलं खोटारडी आहेत. संजय राऊत जेलमध्ये असताना हे सुनील राऊत अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर आणि भाजप कार्यालयाबाहेर चार चार तास थांबून होते असेही नितेश राणे म्हणाले. आम्ही भाजपात प्रवेश करतो पण माझ्या भावाला सोडा असे सुनिल राऊत  सांगत होते. पण संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी भाजपा आपल्या पक्षात कधीच घेणार नाही असेही नितेश राणे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून; नितेश राणेंचा गौप्यस्फोट