Jitendra Awhad : राज ठाकरेंना डिमेन्शिया झाला आहे, ते विसरतात, जातीयवाद तुमच्यामध्ये भरला आहे. राज ठाकरेंनी कालच्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हांडांनी देखील राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले आव्हाड?


राज ठाकरे राजकीय व्यासपीठावरील 'जॉनी लिव्हर', आव्हाडांची टीका


गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं. जर 3 मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय, यावेळी मविआ नेत्यांवरही राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला होता. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केलीय. ते म्हणाले, राज ठाकरे राजकीय व्यासपीठावरील जॉनी लिव्हर आहेत, तसेच आमच्या संस्कारात शिवीगाळ बसत नाही असेही आव्हाड म्हणालेत.


राज ठाकरे जय भीम का म्हणाले नाहीत?


महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे.  शरद पवार कोणत्याही सभेत छत्रपती शिवाजींचे नाव घेत नाही. ते काय शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार हे नास्तिक आहेत. शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी भीती शरद पवारांना आहे. घराघरात शिवाजी महाराजांना पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरेने केले आहे. बाबासाहेब पुरंदरे हे पवारांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. राज ठाकरेंच्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, "राज ठाकरे जय भीम का म्हणाले नाहीत? शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेणं हे शिवरायांना अभिवादन आहे, तसेच शिवरांयांची समाधी फुलेंनी शोधली, दुर्दैवाने राज ठाकरे केवळ पुरंदरेच वाचतात. साधू साध्वींच्या वक्तव्यावर राज ठाकरे का बोलत नाहीत? दाढी, वस्तऱ्याबाबत वक्तव्य करणाऱ्या राज यांना जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत सवाल केले आहे.


जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर सडकून टीका
सुप्रीम कोर्टाचे नियम डावलून राज ठाकरेंनी घेतली सभा घेतली आहे. कालच्या भाषणात महागाईच्या मुद्द्यावर राज ठाकरे गप्प का बसले आहेत? दरम्यान शरद पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना आव्हाडांनी प्रत्त्युत्तर दिले आहे


मुंब्र्यात अतिरेकी सापडल्यावरून राज ठाकरेंच्या टीकेवर आव्हाडांचे उत्तर


पाडवा मेळाव्यानंतर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार काल राज ठाकरे यांनी आपल्या उत्तरसभेत घेतला. शरद पवार यांच्यापासून ते संजय राऊतांपर्यंत अनेकांवर राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर बोलताना राज ठाकरे यांनी, ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असे सांगत थेट आकडेवारीच दिली. यावर आव्हाडांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले, मुंब्र्यात एवढा बदल झाला आहे की तिथल लोकं दुसरा विचार करणार नाही, जे दहशतवादी मुंब्र्यात सापडले ते मुंब्र्याचे नव्हेत. एवढंच असेल तर मुंब्र्यातील दहशतवाद्यांची संख्या जाहीर करा असे देखील आव्हाड म्हणाले.