Abu Azmi : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) कधीच मुस्लिमांना विरोध केला नाही. आताच्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिकावं असेही अबू आझमी म्हणाले. ते काल नागपुरात प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत संवाद साधत होते.


 


छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता - अबू आझमी


छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचे सेनापती मुस्लिम होते. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता. त्यांचा वकील ही मुस्लिम होता. एवढेच नाही तर महाराजांचे अकरावे गुरू ही मुस्लिम होते असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी केले आहे. छत्रपतींनी कधीच मुस्लिमांना विरोध केले नाही. छत्रपतींनी युद्धात हाती लागलेल्या मुस्लिमांवर अत्याचार केले नाही. कुराण शरीफचे सन्मान केले. आताच्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिकावं असेही अबू आझमी म्हणाले.


 


मुस्लीम समाजालाही आरक्षण द्यावे - अबू आझमी


मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना मागच्या वेळेस अबू आझमी म्हणाले होते की, मराठा आरक्षण बिलाचे आम्ही स्वागतच करतो. मुस्लीम समाजालादेखील आरक्षण देण्यात यावे. मुस्लीम समाजावर अन्याय होता कामा नये. मुस्लीम समाजात जे गरीब लोक आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 


 


 


हेही वाचा>>>


Sujay Vikhe Patil: मी कायमचा इकडेच येईन! भाजपची पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर अन् सुजय विखे-पाटलांचा सूर बदलला