मुंबई: अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका अखेर तब्बल 16 तासांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं. या ट्वीटला अवघ्या 25 मिनीटांमध्ये 20 हजार लाईक्स मिळाले आणि साडेचार हजारवेळा रिट्वीट करण्यात आलं.


काय म्हणाले एकनाथ शिंदे? 


एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."


 






एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार ? 


मुंबई


1. मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे


मराठवाडा 


1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर


कोकण 
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले


पश्चिम महाराष्ट्र 
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे


ठाणे  
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर


उत्तर महाराष्ट्र  
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील


विदर्भ 
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड