Vinayak Rautरत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी सावंतवाडीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. गद्दारांचे नेतृत्व करणारे नवीन प्रवक्ते दीपक केसरकर हे आता भाजपने कसं चालावं किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसा चालावं हे सांगणार आहेत, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. दीपक केसरकर यांना अनेक पक्षांचा अनुभव असल्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता खूप आहे. प्रत्येक पक्षाची चव त्यांनी घेतलेली आहे. या राजकारणातला दीपक केसरकर यांचा फायदा एकनाथ शिंदे यांना नक्की होईल आणि येत्या सहा महिन्यात हे सरकार बुडेल, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.


शिवसेनेतून गेलेल्या 40 भडगुंजांना आणि केंद्रातील भाजप सरकारला तसेच दिल्लीच्या निवडणूक आयोगाला दाखवण्यासाठी शिवसेनेच्या सदस्य पदाचे फॉर्म भरून करोडोच्या संख्येने आजही शिवसैनिक आहेत, हे त्यांना दाखवून द्या असे आवाहन त्यांनी येथील शिवसैनिकांना केलं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंढरीच्या पांडुरंगाला यावेळी गारान्हे देखील घातलंय, शिवसेनेवर आलेलं अनिष्ठ दूर कर आणि तुझ्या भक्तांना संकटातून वाचव. तसेच महाराष्ट्रातील देव माणूस आणि पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त असलेल्या उद्धव ठाकरेंना एकटं पाडून जे नराधम बंडखोरी करून निघून गेलेत त्यांचा कदापिही भलं होऊ शकत नाही. येत्या सहा महिन्यात विधानसभा लागेल त्यामुळे कार्यकर्तेनी तयार रहावं असं आव्हाहन देखील विनायक राऊत यांनी केलं.


शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भगवा झेंडा घेऊन जाण्याची बंडखोर आमदारांची भाषा ही त्यांची वाणी नसून दिल्लीत बसून असलेले सांगतायेत. अशी भाजववर निशाणा साधला आहे. आमदार विकत घ्याल, शिवसैनिक कदाही विकत घेऊ शकत नाही. बंडखोरांचे हे बेगमी बोबडे पण आम्ही कदापि सहन करणार नाही. 


आमदार, खासदार फोडून तुमचं पोट भरलं नाही, आता तुम्ही शिवसेना पक्षाच्या मूळ झाडालाच हात घालता आहात. म्हणे शिवसेना आमचीच आहे, उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन शरणांगती पत्करावी आणि मग आम्हाला बोलवाव. असा समुपदचा सल्ला शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर देतायेत. दीपक केसरकर हे पोपटपंची असल्याची टीका विनायक राऊत यांनी केलीय. शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी वर्षा निवासस्थान सोडलं, तेव्हा महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि प्रदेशातील लोकही रडले. मात्र बंडखोर आमदार हे गुवाहाटीमध्ये पेढे वाटून नाचत होते. या बेइमानीच्या अवलादाना म्हणावं तरी काय असं कार्यकर्त्यांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले.