Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : भाजपचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंकडून मान्य

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्रीपद सोडा हे समोर येऊन सांगा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, मविआतून बाहेर पडण्यावर एकनाथ शिंदे ठाम. पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2022 07:19 PM
Aurangabad: शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत जिल्ह्यात परतले; शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत

Maharashtra Political Crisis: गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत आपल्या जिल्ह्यात परतले आहे. त्यांनतर ते आपल्या मतदारसंघात जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याच्या बातम्या समोर आल्यावर सुरवातीला आमदार राजपूत यांचे नाव सुद्धा बंडाच्या यादीत येत होते. मात्र आपण मुंबईतच असल्याचा खुलासा त्यांनी केल्याने चर्चेवर पडदा पडला. तर आज औरंगाबाद विमानतळावर येताच शिवसैनिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे सुद्धा उपस्थित होते.

Eknath Shinde : शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंची नेते पदी निवड

Eknath Shinde : शिंदेसेनेनं बैठकीत नेते पदाचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावावर सर्व आमदारांनी मिळून एकनाथ शिंदे यांची निवड केली आहेत

Maharashtra Political Crisis : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत

आमदार संजय राठोड अद्यापही मुंबईतच, काय निर्णय घ्यावा या संभ्रमात आमदार संजय राठोड

आमदार संजय राठोड अद्यापही मुंबईतच, संजय राठोड गुवाहाटीला गेलेच नाहीत आणि मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतही गेले नाही.. संजय राठोड यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्याने ते मुंबईत असल्याची सूत्रांची माहिती . काय निर्णय घ्यावा या संभ्रमात आमदार संजय राठोड.. आज सायंकाळपर्यंत आमदार संजय राठोड महंत, पदाधिकारी, शिवसैनिकांशी चर्चा करून निर्णय घेतील अशी ही माहिती मिळतेय..मुख्यमंत्री यांनी ही सगळ्यांची भावना समजून घ्यावी आणि एकनाथ शिंदे यांनी ही एक पाऊल मागे यावं अशी संजय राठोड यांची भावना असल्याचं सूत्रांनी सांगितले.. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंताचा ही राठोड यांच्यावर दबाव.. समाजाचा हित पाहून निर्णय घ्यावा अशी त्यांची संजय राठोडकडे मागणी..

मविआतून बाहेर पडण्याची इच्छा मुंबईत येऊन बोलून दाखवा, 24 तासांत परत या : संजय राऊत

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल : नाना पटोले

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे की, "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असण्याबाबत काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल."


Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी सांगलीत शिवसैनिक उतरले रस्त्यावर
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने या आव्हानाला सामोरे जाऊ. शिवसेनेचे आमदार कुठेही जाणार नाहीत. ते परत येतील, बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेनेला त्रास देणारे कोण आहेत त्याची जाणीव असलेले नेत्यांनी योग्य भूमिका घ्यावी उध्दवजी योग्य तोडगा काढतील असे उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर यावेळी म्हणाले. यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Governor : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर, दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार

Maharashtra Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर असून येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. राजकीय उलथापालथीमध्ये ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पुढील राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असू शकते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काल समोर आली होती.

शिवसेनेच्या अंतर्गत काय सुरु आहे याची कल्पना नाही

आम्हाला विश्वास, गुवाहाटीतील शिवसेना आमदार परत येतील : जयंत पाटील
राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करणार : जयंत पाटील

Trinamool Congress Agitation : आसाममध्ये पूर आला असताना आमदार आलेच कसे? तृणमूल काँग्रेसचा सवाल

Trinamool Congress Agitation : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेल रॅडिसन ब्लू बाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरु आहे. आसाममध्ये पूर असताना आमदार आलेच कसे असा सवाल विचारला जात आहे. भाजपकडून शिवसेना आमदारांची खरेदी सुरु आहे. तमाशा बंद करा आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष द्या, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

Sanjay Raut LIVE : जे आमदार सोडून गेले ती शिवसेना नाही तर काल रस्त्यावर उतरली ती शिवसेना : संजय राऊत

Sanjay Raut LIVE : जे आमदार सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रस्त्यावर उतरली ती शिवसेना, असं खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. शिंदे गटात आमदार का चालले आहेत हे लवकरच समजेल, असंही ते म्हणाले. 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Eknath Shinde LIVE : आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, आशिष जयस्वाल हे गुवाहाटीमधील दाखल

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, आशिष जयस्वाल हे गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये पोहोचल्यानंतरचा फोटो समोर आला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी त्यांचं स्वागत केलं. 



Ashish Jaiswal : रामटेकचे सेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटीत

रामटेकचे सेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटीत, चार आमदारांना घेऊन जैस्वाल गुवाहाटीत दाखल, आशिष जैस्वाल यांची एबीपी माझाला माहिती

महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट

महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट केलं आहे. 

सकाळी दहा वाजता एकनाथ शिंदेंची आमदारांसोबत बैठक

आज सकाळी दहा वाजता एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत बैठक करणार आहेत. पुढच्या रणनीतीबाबत आमदारांची ही बैठक असणार आहे. गुहाटीमधील एका हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. 

Maharashtra Political Crisis : आमदारांपाठोपाठ खासदारांचाही एकनाथ शिंदेंना पाठिंबा, 17 खासदार शिंदेंच्या संपर्कात : सूत्र

Maharashtra Political Crisis : शिवसेना आमदारांसोबतच आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात येताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 17 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचा खासदार श्रीकांत शिंदे गुवाहाटीमध्ये आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी, पालघरचे खासदार राजेंद्र गवित, रामटेकचे खासदार कृपाल तुमणे यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Shiv Sena Meeting : उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची आज सकाळी साडे अकरा वाजता बैठक

Shiv Sena Meeting : उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता ही बैठक होणार आहे. ही बैठक व्हर्च्युअल होणार की मातोश्रीवर हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदारांची आज सकाळी अकरा वाजता बैठक

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदारांची आज सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

Eknath Shinde LIVE : मीरा-भाईंदरमध्ये लागलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आनंद दिघे आणि बाळासाहेबांचं छायाचित्र; उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचं छायाचित्र नाही

Eknath Shinde LIVE : मीरा भाईंदरमध्ये लागलेले पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र आहे. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायचित्रे नाहीत. लोकांचा लोकनाथ एकनाथ, या वाक्यासह हिंदुत्वाचा नवा चेहरा आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस, भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आज तिसरा दिवस आहे. एकनाथ शिंदे आज काय पवित्रा घेणार याची उत्सुकता कायम आहे. मुंबईवरून सूरतमार्गे गुवाहाटीला पोहोचलेला शिंदे गट तिथल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. आज आणखी काही आमदार या गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.  या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या हॉटेलबाहेर एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आलेय. कालपासूनच इथे तगडा बंदोबस्त तैनात आहे.

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री म्हणजेच आमचा विठ्ठल, पण त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट : देवेंद्र भुयार

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री म्हणजेच आमचा विठ्ठल चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे. असा आरोप विदर्भातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलाय. नाव न घेता देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांचे सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय.

Maharashtra Political Crisis : शिंदेंचं विधानसभा उपाध्यक्षांना 34 आमदारांच्या स्वाक्षरीनिशी पत्र, आपणच शिवसेनेचे गटनेते असल्याचा दावा

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिंदेंनीही जशास तशी भूमिका घेतली आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदावरून सुनील प्रभूंना यांना हटवून त्यांच्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याचं शिंदे यांनी घोषित केलं आहे. तसंच शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरींची नियुक्ती अवैध असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. शिंदेंनी विधानसभा उपाध्यक्षांना 34 आमदारांच्या स्वाक्षरीनिशी पत्र लिहून आपणच शिवसेनेचे गटनेते असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंचं आवाहन एकनाथ शिंदेंनी धुडकावलं, हिंदुत्व फॉर एव्हर; शिंदेंचं ट्वीट

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंचं आवाहन एकनाथ शिंदेंनी धुडकावलंय. ट्वीट करत शिंदेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना उत्तर दिंलंय. हिंदुत्व फॉर एव्हर असं ट्वीट शिंदेंनी केलं. शिवाय अडीच वर्षात शिवसेना फक्त भरडली गेल्याचं ते म्हणाले. 

Eknath Shinde LIVE : शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल

Eknath Shinde LIVE : शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का याकडे लक्ष लागलंय. 


एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक गट आपल्या पाठी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसतोय. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रीचेबल आहेत. आणि हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून, ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे... दुसरीकडे शिवसेनेचे आणखी पाच आमदार मुंबईहून सूरतला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेय. आणि  सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांच्या खोल्या आरक्षित असल्याचं कळतंय. एका बड्या पदाधिकाऱ्यावर या आमदारांना सूरतला पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेय. सूरतवरून हे आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचं कळतंय. आता संपर्काबाहेर असलेले हेच ते आमदार आहेत का हे पाहावं लागणार आहे. 


नॉट रिचेबल असलेले 6 आमदार? 



  • मंगेश कुडाळकर

  • सदा सरवणकर

  • दादा भुसे

  • दीपक केसरकर

  • दिलीप हांडे

  • संजय राठोड

Shiv Sena LIVE Updates : सरकार कोसळण्याचे ढग आणखी गडद? गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील शिंदे गटात सामील

Shiv Sena LIVE Updates : शिवसेनेतील गळती वाढत चालली आहे. त्यामुळे आता सरकार कोसळण्याचे ढग आणखी गडद होत आहेत. शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहाटीला पोहोचलेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील शिंदे गटात सामील झालेत. 

Eknath Shinde LIVE : शिंदे गटाकडून महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती

Eknath Shinde LIVE : गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या असलेल्या शिंदे सेनेची रणनीती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांच्यातलं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालंय. शिंदे गटानं महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती केली आहे. प्रतोद म्हणून कुणाला काढायचं कुणाला ठेवायचं यावर प्रताप सरनाईक आणि गोगावले यांच्यातलं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालंय.  विशेष म्हणजे शिंदे सेनेच्या निशाण्यावर सुनील प्रभू असल्याचं दिसतंय.

Eknath Shinde LIVE : एकनाथ शिंदे सेनेची रणनीती कॅमेऱ्यात कैद

Eknath Shinde LIVE : गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या असलेल्या शिंदे सेनेची रणनीती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांच्यातलं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालंय. शिंदे गटानं महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोपदी नियुक्ती केली आहे. प्रतोद म्हणून कुणाला काढायचं कुणाला ठेवायचं यावर प्रताप सरनाईक आणि गोगावले यांच्यातलं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालंय.  विशेष म्हणजे शिंदे सेनेच्या निशाण्यावर सुनील प्रभू असल्याचं दिसतंय.

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं, काँग्रेस मंत्री नाराज

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. उद्धव ठाकरेंच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीत शिवेसेनेच्या बंडावर चर्चा झाली. या बंडामागे सेनेच्याच आणखी एका बड्या नेत्याचा हात असण्यावरही चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप आला असून महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अन् शिवसेनेत वादळ आलं.


एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये परवाचा दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत. राज्याच्या राजकारणात यापूर्वी महाराष्ट्रानं न पाहिलेल्या अनेक घडामोडी रात्रभर घडत होत्या. 


शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले. 


राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरतमधून गुवाहाटीकडे


महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं केंद्र आता सूरतमधून आसाममधल्या गुवाहाटीकडे पोहोचलं. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह काल (बुधवारी) सकाळी गुवाहाटीमध्ये पोहोचले. काल दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाच्या आमदारांना विशेष विमानानं सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलं. गुवाहाटीमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे बंडानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेत असल्याचं सांगत त्यांनी भाजपबरोबर जाणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत. सूरतमध्ये भाजपचे मोहीत कंबोज हे एकनाथ शिंदेच्या समर्थक आमदारांसोबत सावलीसारखे वावरत होते. एवढंच नाहीतर सूरतपासून गुवाहाटीपर्यंत या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे मोठे नेते उपस्थित असल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवधनुष्याची साथ सोडत भाजपचं कमळ हाती तर घेणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही, असा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. अशातच सूरतहून गुवाहाटीला गेलेल्या या सर्व आमदारांचा मुक्काम आता गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये झाला आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्याचं लक्ष गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलकडे असणार आहे. 


एकनाथ शिंदे नवा गट स्थापन करणार? 


एकनाथ शिंदेंची पुढची भूमिका काय असणार हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. शिवसेनेसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण असल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. अशातच, बंडं केलं नाही असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी नवा गट स्थापन करण्यासाठी हालचाली केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंना पाहिजे असलेला 37 आमदारांचा  कोटा पुर्ण झाल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी गट स्थापनेसाठी सह्या केल्याचं दिसून आलं आहे. तशा सह्या करत असतानाचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. शिंदेंना गट स्थापन करण्यासाठी 37 आमदारांची गरज होती आणि त्या सर्व आमदारांच्या सह्या घेण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली होती. त्याला शिंदेंच्या गटातील आमदारांनीही दुजोरा दिला. 


आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार : एकनाथ शिंदे 


गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत." तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  


एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल


शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.


शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


राज्यातील सत्ता संघर्षावर काल (बुधवारी) मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. "मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. परंतु, ज्यांना मी मुख्यमंत्रीपदी नको आहे  त्यांनी समोर येऊन सांगा, मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. शिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे, मी पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यावेळी त्यांनी आपण राजीनामा द्यायाल तयार आहे, पण समोर येऊन सांगा. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदर होईल असं म्हटले आहेत.  


उद्धव ठाकरे म्हणाले, " मी संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे आव्हानांना तोडं द्यायला मी तयार आहे. त्यामुळे सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी पद सोडले असते. सुरतला गेलेल्या एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करतो. मला फोनवरून देखील सांगतीले की, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, तर आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवण्यास  तयार आहे, मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


शिवसैनिकांचं भक्तिप्रदर्शन


त्यानंतर बोलताना त्यांनी आजच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर त्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं आणि मातोश्रीवर आपला मुक्काम हलवला. वर्षा निवासस्थानापासून मातोश्रीपर्यंत ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता, त्यावेळी शिवसैनिकांनी साद घातली. मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी शिवसैनिकांची गर्दी जमली होती. शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. 


शिवसैनिक भरडला गेला, उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला


 महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सुनावले होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेय. एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्थाव धुडकावत परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं?


1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचं मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 
3. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.


एकनाथ शिंदेंच्या बंडाला नवं वळण


महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळी वळणं लागत आहेत. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख माघारी परतले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे या वादाला आता नवे वळण लागणार आहे.


ती स्वाक्षरी माझी नाही, बोगस आहे : आमदार नितीन देशमुख


शिवसेना नेते व आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आपली स्वाक्षरी इंग्रजीत असून त्या पत्रावर बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरीलसही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेच्या गॅझेटियरमध्ये आमदार नितीन देशमुखांचं नाव 'नितिन भिकनराव टाले' असं आहे. या पत्रावरील देशमुखांची सही 'नितीन देशमुख' अशी मराठीत असल्याचं दिसत आहे. त्यांना नितीन देशमुख या नावानं ओळखलं जातं. 


दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.