Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानावर दगडफेक

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा आज पाचवा दिवस आहे. प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jun 2022 08:23 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह...More

आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानावर दगडफेक

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. गनिमीकाव्याने शिवसैनिकांकडून हल्ला करणाऱ्या शिवसैनिकाला दंगल नियंत्रण पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे गटाशी संधान साधणार्‍या आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकांकडून दगड फेक झाल्याचं समजत आहे. अचानक झालेली दगड फेक लक्षात घेता त्या ठिकाणी असलेल्या दंगल नियंत्रण पथकाने एका शिवसैनीकाला ताब्यात घेतलं.