Maharashtra Political Crisis :  शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यायामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आता शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50  कोटींहून अधिकची ऑफर मिळाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. राजपूत यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्व पक्ष अधिक सावध झाले आहेत.


एवढंच नाही तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचं फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत यांनी केला आहे.  100  कोटी दिले तरीही गद्दारी करणार नाही,  असंही उदयसिंग राजपूत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे.


उदयसिंग राजपूत हे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवसेनेतल्या बंडाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. आमदार फोडण्यासाठी 50  कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एका शिवसेना कार्यकर्त्यासह बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.. त्यात ते ऑफर स्वीकारली नाही. कारण  मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही. मी शिवसेनेतच राहणार आहे. 


शिवसेनेचे मेळावे, आंदोलन


पक्षातील बंडखोरीविरोधात आज शिवसेनेने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईसह पालघर, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणीदेखील बंडखोरीविरोधात आंदोलन झाले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी मुंबईत मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यात बंडखोरांवर निशाणा साधण्यात आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Political Crisis Sanjay Raut : संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर...


Maharashtra Political Crisis: काही पालख्या गुजरातला, तर काही गुवाहटीला, आम्ही मात्र माऊलींसोबत: सचिन अहिर