Maharashtra Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी (Maharashtra Police Constable Bharti) अर्ज मागवण्यात आले आहेत. पोलीस दलात शिपाई (Police Constable Recruitment) आणि चालक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.


18 हजार 331 पदांसाठी पोलीस भरती


महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) मध्ये पोलीस शिपाई (Police Constable) पदाच्या एकूण 17130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील पोलीस शिपाई पदाच्या 14956 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या (Driver Police Constable) 2174 जागा आहेत. एसआरपीएफ पोलीस शिपाई (SRPF Police Constable) पदाच्या 1204 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती.


पोलीस भरतीसाठी 71 तृतीयपंथींचे अर्ज


महाराष्ट्र पोलीस विभागाकडे 18,331 रिक्त पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे अर्ज पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत. पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर तृतीयपंथीयांनीही उमेदवारी अर्ज दाख केले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 68 आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी पाच तृतीयपंथीचे अर्ज आले आहेत. भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती परंतु ऑनलाइन प्रक्रियेत काही गैरसोय झाल्यामुळे ही तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली.


पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही संधी


मुंबई उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) तृतीयपंथीयांनाही (Transgender) पोलीस भरतीत संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस भरतीत (Police Bharti) तृतीयपंथीयांसाठीही संधी मिळणार आहे. न्यायालयाने सरकारला तृतीयपंथीयांसाठी नियमावली सुधारत शारीरिक चाचणीशी संबंधित निकषांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहे. (Transgenders Can Apply For Maharashtra Police Constable Post)


महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या (15 डिसेंबर 2022 पर्यंत प्राप्त झालेले एकूण अर्ज)


पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या 



  • पोलीस शिपाई (Police Constable) पदासाठी 12,25,899 अर्ज आले आहेत. त्यापैकी 2,29,246 महिला आणि 68 तृतीयपंथी आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 14,956 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

  • चालक पोलीस हवालदार (Driver Police Constable) पदासाठी 2,15,132 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी 9,883 महिला आणि 5 तृतीयपंथी आहेत. चालक पोलीस शिपाई पदासाठी 2,174 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.

  • एसआरपीएफ (SRPF) म्हणजे राज्य राखीव पोलीस दल (State Reserve Police Force) भरतीसाठी 3,71,507 पुरुषांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. SRPF दलात 1,201 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

  • पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि एसआरपीएफ या तीनही पदांसाठी प्राप्त झालेले एकूण अर्ज 18,12,538 आहेत. यापैकी 94,245 उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेले नाही. 19 डिसेंबरला डेटा फ्रीज करण्यात येणार आहे.