Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.
22 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक झाली होती, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. परळीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध केला. यादरम्यान, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसच समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.
काय आहे प्रकरण -
मुंबईमध्ये राज ठाकरे यांना ऑक्टोबर 2008 ला अटक करण्यात आले होते या घटनेचा परिणाम राज्यभर उमटला होता. या अटकेच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड झाली होती. बसेसवर दगडफेक झाली होती, असाच प्रकार परळी मध्ये सुद्धा घडला होता. धर्मापुरी पॉईंट येथेसुद्धा एसटी बसेसवर दगडफेक झाली होती, ज्यामध्ये एसटीचे नुकसान झाले होते.या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे.. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व चिथावणीखोर वक्तव्य करण्यात या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते परळी पोलीस ठाणे सुद्धा या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
'माझा लढा विठ्ठलाशी नाही, त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे...', शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलेले राज ठाकरे पुन्हा करिष्मा करणार का?
Raj thackeray video : अमरावतीसारखा प्रयत्न महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही, राज ठाकरे यांचा इशारा
Raj Thackeray : ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो : राज ठाकरे
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं : राज ठाकरे