Paper Leak : जालना जिल्ह्यातील एका क्लास चालकाच्या संवादाची क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली. या क्लिपमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या सही आरोपींची नावे आहेत. 2017 सालापासून ही टोळी वेगवेगळ्या नोकर भरती परीक्षेतील पेपर लीक करणं, भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार करणं, अशी कामं करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महाराष्ट्रातील जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये ही टोळी कार्यरत असल्याचं समोर आलं आहे. या क्लिपवरुन नेमका घोटाळा कसा होतो, याचं धक्कादायक वास्तव एबीपीच्या हाती लागलं आहे.  


नोकर भरती परीक्षेतील पेपर दोन पद्धतीने लीक होत असल्याचं समोर आलं आहे. एक म्हणजे, स्कॅनिंग उत्तर पत्रिका पूर्णपणे स्कॅन करून बाहेर आणायची आणि दुसरी पद्धत म्हणजे, पेपर आदल्या दिवशी फोडायचा. जे उमेदवार पैसे देऊन या क्लास चालकांच्या बरोबर आहेत. त्यांना कुठेतरी एखाद्या हॉलमध्ये बोलून घ्यायचं आणि त्यांच्याकडून उत्तर पत्रिका घोकून घ्यायची.  


 या टोळीला यावेळी म्हाडाच्या परीक्षेसाठी पन्नास उमेदवारांचं उद्दिष्ट  देण्यात आलेलं होतं. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे दर होते. या क्लिप मधल्या संवाद अनुसार महाराष्ट्रामध्ये 14 वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचे पन्नास एजंट वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. या क्लिपमध्ये परभणी, औरंगाबाद, बुलढाणा आणि परळी इथल्या वेगवेगळ्या एजंटचा उल्लेख आहे. या पद्धतीने पैसे जमा करून काही एजंटांनी मोठी संपत्ती जमा केली आहे. म्हाडा साठी यावेळेला एक लाख तीस हजार रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला होता


राज्य सरकारने सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी पाच कंपन्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी आरोग्य भरतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यासा कंपनीचा या क्लिप मध्ये उल्लेख आहे. प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये घेत होते. 2017 सालापासून कमीत कमी चारशे उमेदवारांना वेगवेगळ्या भरतीमध्ये या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळाली आहे. म्हाडाच्या भरती प्रक्रिया मधला जी ए सॉफ्टवेअर कंपनी जो डॉक्टर प्रतिश देशमुख चालवायचा त्याचाही या क्लिपमध्ये उल्लेख आहे. 


कुठे कुठे बोगस उमेदवार भरले..?
पोलीस भरती, टीटीई, आरोग्यसेवेची भरती, म्हाडाची भरती