मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत काहीशी कमी झाली असली तरी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार सुरु आहेत. राज्यात सोमवारी ओमायक्रॉनच्या 125 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आह. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 1860 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 959 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी सर्वाधिक जास्त रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. त्यानंतर मिरा भाईंदरचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 29 रुग्ण सापडतात. मुंबईत आज केवळ तीन ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील आज सापडलेली ओमायक्रॉन रुग्णसंख्या
• पणे मनपा– 40
• मीरा भाईदांर- 29
• नागपूर- 26
• औरंगाबाद- 14
• अमरावती- 7
• मंबई- 3
• भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी 1
राज्यात 33 हजार रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 64 हजार 217 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,21,24,824 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 29 हजारांना रुग्णांना डिस्चार्ज, तर 31 हजार कोरोनाबाधितांची भर
- Mumbai Corona Update : आजही मुंबईतील रुग्णसंख्येत घट, 5 हजार 956 नवे कोरोनाबाधित
- 'मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha