Chhagan Bhujbal : समाजकारण राजकारणात काही लोक पुढे होऊन काम करत असतात त्यांना सुरक्षा पुरविली जात असते. अशावेळी सुरक्षा काढणे योग्य नाही. याचा पुनर्विचार शासनाने करावा असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुचविले आहे. त्याचबरोबर सुरक्षा काढली, या बाबत काहीही बोलणार नाही, आरोप करणार नाही,  मात्र गृहमंत्री असताना हल्ला झाला, त्यावेळी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्या बाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) काकासाहेब नगर, रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत, संचलित ‘कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा 40 वा गळीत हंगाम शुभारंभ छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, समाजकारण राजकारणात काही लोक पुढे होऊन काम करत असतात त्यांना सुरक्षा पुरविली जात असते. अशावेळी सुरक्षा काढणे योग्य नाही. याचा पुनर्विचार शासनाने करावा. गृहमंत्री असताना हल्ला झाल्याची घटना घडली होती. ज्यांना सुरक्षेची खरी गरज आहे, त्यांना नक्की सुरक्षा द्यावी नाही तर, देऊ नये. आम्ही दाउद वगैरेना कित्येकांना अंगावर घेतल, मात्र सद्यस्थितीत ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्या बाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी यावेळी भुजबळांनी केली.  


महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची देखील सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली आहे. निफाड येथील कार्यक्रमात त्यांनी सुरक्षा काढल्यानंतर राजकीय वाटचालीतील जुनी आठवण शेअर केली आहे. याबाबत सुरक्षा गेल्यानंतर भुजबळ यांनी घडलेला प्रसंग जाहीर कार्यक्रमात सांगितला आहे. दिवस येतात, जातात आमच्यावरही संकट येतात आम्ही संयमाने घेतो पण आता आमची सिक्युरिटी काढली, सकाळी विचारले पोलीस कुठे, तर गेले, म्हणे असं भुजबळ म्हणाले.


गोपीनाथ मुंढेनी दिली सुरक्षा 
दरम्यान छगन भुजबळ यांची सुरक्षा काढल्यानंतर भुजबळ यांनी घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर मला गोपीनाथ मुंढेनी सुरक्षा दिली होती, अशीही आठवण भुजबळ यांनी सांगितली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील रानवड येथील साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी छगन भुजबळ यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांनी मला सुरक्षा पुरविल्याची आठवण सांगितली. भुजबळ पुढे म्हणाले, सामाजिक आणि राजकीय जीवनात जे लोक वावरतात त्यांचे मित्रापेक्षा शत्रू जास्त असतात, म्हणून त्यांना सुरक्षा दिली जाते. बदल होणारच, थोडे दिवस जातात पण महाराष्ट्र कधी झुकणार नाही, असं म्हणत भुजबळ यांची सुरक्षा काढल्यानंतर भुजबळांनी पहिल्यांदाच असा खुलासा केला आहे.


नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर म्हणाले...  
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढू नये, कारण सर्वांचे लक्ष बघण्याचे नाशिक कडे चांगले आहे. या मध्ये फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. नवीन पोलिस अधीक्षक हे आताच आले आहेत. त्यांना काम करण्यासाठी थोडा वेळ द्यावा, त्यामुळे ते यावर नक्कीच आवर घालतील. तसेच पोलिसांचं संख्या बळ कमी असल्याने देखील अस होत. पोलिसांना गाड्या नाही, जुने SP होते, त्यांनी त्या गाड्या ठेऊन घेतल्या. सरकार बदलले आणि SP त्या गाड्या जातांना घेऊन गेले आणि खटारा गाड्या ठेऊन गेल्याचा असा आरोप भुजबळांनी एसपीवर केला आहे.