Bharat Jodo Yatra : तुम्हाला जर सांगितलं कि, उद्या नोकरीवर जॉईन व्हायचं आहे, अन दुसरीकडे तुम्हाला एका महत्वाच्या इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचं आहे? तर तुम्ही काय निवडाल? तर बहुतांश विद्यार्थी नोकरीवर रुजू होण्याचे स्वीकारतील. मात्र या सगळ्यांना अपवाद ठरलीय ती नाशिकची (Nashik) अतिशा पैठणकर (Atisha Paithankar). अतीशाने चालून आलेली नोकरी धुडकावत भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाली आहे. कन्याकुमारीपासून ते आतापर्यंत अतिशा हि भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असून सध्या सोशल मीडियावर राहुल गांधीसोबतचा (Rahul Gandhi) तिचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
काँग्रेसने (Congress) दोन महिन्यापूर्वी सुरु केलेल्या देशव्यापी भारत जोडो यात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही यात्रा महाराष्ट्रात आहे. दरम्यान या यात्रेत सुरवातीपासून असलेल्या नाशिकच्या युवतीची चर्चा होत आहे. आतिषा पैठणकर असे या तरुणीचे नाव असून ती नाशिक शहरातील नाशिकरोड या भागात राहणारी आहे. मात्र तिच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीमुळे ती अधिकच चर्चेत आली आहे. अतिषाला एअर इंडियात तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर नोकरी मिळाली होती. मात्र या नोकरीवर पाणी फेरीत तिने आधी यात्रा आणि नंतर नोकरी असे उद्दिष्ट ठेवत भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे.
अतिषा ही गेल्या वर्षांपासून नाशिक शहरात काँग्रेसचे काम करते. शिक्षित असल्याने ती नोकरीच्या शोधात होती. अशातच तिला इअर इंडियामध्ये नोकरीची संधी मिळाली. मात्र ज्या दिवशी अतिषाची रुजू होण्याची तारीख होती, त्याच दिवशी भारत जोडो यात्रेचा प्रारंभ होता.अशावेळी कुणालाही नोकरी मिळणं हे आयुष्यातील सर्वात मोठं ध्येय असत. नोकरीवर रुजू होण्यासाठी ती 6 सप्टेंबरला कोलकाता येथे जायला निघाली होती. मात्र, मुंबई विमानतळावर आल्यावर तिला नोकरी की भारत जोडो यापैकी कशाची निवड करायची? याबाबत ती द्विधा मन:स्थितीत होती. मात्र अतिषाने या ध्येयाला बाजूला ठेवून देशव्यापी यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांना ही बाब कळाल्यानंतर त्यांच्या रोषाचा सामनाही तिला करावा लागला.मात्र, एक महिन्यात परत येऊन पुन्हा नोकरी करेल, असा शब्द तिने दिला. यानंतर आई वडिलांनी दिलेल्या होकारानंतर आतिषाने थेट कन्याकुमारी गाठले.
दरम्यान अतिषाने कन्याकुमारी येथे जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. त्यानंतर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर आता भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं स्वागतानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा अकोला, बुलढाणा, नांदेड, वाशिम आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जात आहे. याच सुमारास अतिषाने राहुल गांधींसोबत संवाद साधत काही अंतर चालली. या दरम्यानचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनतर अतिषाचे भारत जोडो यात्रेत सहभाग कसा झाला, हे लोकांसमोर आल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
युवा वर्गाशी संवाद ही आयुष्यभराची शिदोरी
नोकरी हे अनेकांचं स्वप्न असत, मात्र नोकरी यानंतरही करता येईल. समाजाला जागृत करणं महत्वाचं आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत सहभाग होऊन राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असल्याचे अतिषाने सांगितले. शिवाय भाषण ठोकून समाजात बदल घडत नसतो, तर त्यासाठी रस्त्यावर उतराव लागतं, समाजापर्यंत पोहचाव लागत. दरम्यान सात तारखेला नोकरीवर रुजू न्हवता, तिने कन्याकुमारीच्या ट्रेन पकडली. त्यानंतर भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. आतापर्यंत हजारो किलोमीटर अंतर तिने कापले असून तिच्या पायाला फोड देखील आल्याचे तिने सांगितले. सामान्यांपासून ते युवा वर्गांपर्यत सर्वच लोक यंत्रासह भागी असून त्यांच्याशी सवांद साधल्यानंतर मन हलकं होत आहे, शिवाय भारत जोडो यात्रा आयुष्यभरासाठीची पुंजी असल्याचे अतिषाने सांगितले.