Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) अंबड परिसरात झालेल्या उद्योजकाच्या हत्येचा (Murder) उलगडा झाला असून यातील एका संशयितास अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अन्य तिघे फरार असल्याची माहिती आहे. 


नाशिकच्या अंबड औद्योगिक परिसरात असणाऱ्या किर्लोस्कर कंपनीजवळ आज सकाळी उद्योजक नंदकुमार आहेर यांची धारदार शास्राने हत्या करण्यात आली. या घटनेने शहर हादरल. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासांत सिनेस्टाईल हत्येचा उलगडा केला आहे.


दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार नंदकुमार आहेर हे सकाळी कंपनीत आले असता दबा धरून बसलेल्या तीन ते चार जणांच्या टोळीने त्यांच्या गंभीर हल्ला केला. यात आहेर यांचा मृत्यू झाला. या घटनेतील एका संशयिताच्या आईला कंपनीत कामावर असतांना मयत नंदकुमार यांच्याकडून त्रास दिला जात होता. याचाच राग मनात धरत आईच्या मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. आहेर हे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मात्र या घटनेने नाशिकची गुन्हेगारी किती फोफावत चालली आहे, हे यावरून दिसून येते.


असा झाला उलगडा
घटनास्थळी दबा धरून बसलेल्या एकाने नंदकुमार यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. दुसरा आरोपी चॉपर मारायला गेला असता तो घाव तिसऱ्या संशयिताच्या मांडीवर बसला. जखमी संशयित एका रुग्णालयात दाखल झाला असता पोलिसांना टिप मिळाली. त्यानुसार पोलिसांना या हत्येचा सुगावा लागला. या घटनेतील एक संशयित पोलिसांच्या ताब्यात असून इतर तीन संशयित फरार आहेत. ते सर्व जण अल्पवयीन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


दिवसाढवळ्या हत्यांचे सत्र 
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. तर अनेक घटनांत किरकोळ कारणावरून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय या खुनाच्या घटना दिवसाढवळ्या झाल्याचे समोर आले आहे. संबंधित घटनेतील मयत हे कामावर जात होते. गाडीतून उतरत असताना त्यांच्यावर टोळक्याने हल्ला करत पळ काढला. तर दोन दिवसांपूर्वी आडगाव नका परिसरात मैदानावर एका टोळक्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. 


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.