Mahadev Jankar : काँग्रेस (congress) आणि भाजप (Bjp) या पक्षाच्या नादाला लागू नका असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं. ते पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एका कार्यक्रमात बोलत होते. हे मोठे पक्ष दिल्लीतून राज्य कारभार करतात आणि आपल्याला संपवून टाकतात. एकवेळ एकनाथ शिंदेच्या पक्षाला मदत करा, पवारांच्या पक्षाला मदत करा पण भाजप आणि काँग्रेसला मदत करु नका असे जानकर म्हणाले.


भाजप असो वा काँग्रेस हे आपल्या फार हिताचे नाहीत


काँग्रेस आणि भाजप हे मोठे पक्ष आहेत. यांचा सगळा कारभार दिल्लीतून चालतो. हे पक्ष आपल्याला गिळून टाकण्याचं काम करतात. भाजप असो वा काँग्रेस हे आपल्या फार हिताचे नसल्याचे महादवे जानकर यावेळी म्हणाले. जानकर हे सध्या भाजपचे मित्रपक्ष आहेत. मात्र, भाजपच्या विरोधातच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तळात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.


भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला मंत्रीमंडळात संधी नाही


महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही भाजपसोबत लढवली होती. मात्र 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी राज्यात एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळं भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. यामध्ये मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला मंत्रीमंडळात संधी देण्यात आली नाही. यावरुन देखील जानकरांनी वेळोवेळी भाजपवर टीका केली आहे. भाजपने मंत्रीमंडळात मित्र पक्षांना स्थान दिलं नाही. त्यामुळे मित्र पक्ष नाराज आहेत. खासकरून राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर हे मंत्री न बनविल्याने नाराज आहेत. त्याची सल त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.


मागील काही दिवसापूर्वी जानकरांनी आम्ही भाजपात असतो तर मंत्री झालो असतो. मात्र आता असा बंदोबस्त करू की, आमच्या शिवाय सरकार बनवताना त्यांना विचार करावा लागेल असे वक्तव्य केलं होतं. माझा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनणार आहे. मला मुंबईत घरं मिळालं, आता दिल्लीत पक्षाचं ऑफिस मिळणार आहे, असंही जानकर म्हणाले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Ganeshotsav 2022: बाळासाहेब पाटील, महादेव जानकर दगडूशेठच्या दरबारात; जनतेच्या सेवेसाठी मागितलं बळ