Maharashtra News LIVE Updates:शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान

Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jan 2024 11:16 PM
एकाच दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात, 19 जानेवारीला शरद पवारही दौऱ्यावर

नाशिक आणि मुंबई दौऱ्यानंतर पुढच्याच आठवड्यात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येतायत. सोलापूर शहरात 19 जानेवारी रोजी त्यांचा रोड शो आणि रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी  सांगोला आणि मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. 

Rahul Narvekar : मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाहीये, ठाकरे गटाच्या याचिकेनंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया 

Rahul Narvekar :  मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसारच निकाल दिला. भारतातील कोणत्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीये. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलीये. त्यावर आता राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया समोर आलीये. 

MLA Disqualification Case : शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेसंदर्भात शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. भरत गोगावले यांनी  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान दिलंय. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणा-या टाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आलाय. 

PM Modi Solapur Visit : एकाच महिन्यात दुसरा महाराष्ट्र दौरा, पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापुरात 

PM Modi Solapur Visit :  देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरातील रे नगर येथे 365 एकर जागेवर या प्रकल्प उभारण्यात आलाय. यावेळी पंतप्रधान मोदी हे सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचे वाटप करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या  या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. 

MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीच्या अपात्रतेसंदर्भात या आठवड्यापासून सुनावणी होणार 

MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांकडे  राष्ट्रवादीच्या अपात्रतेसंदर्भात या आठवड्यापासून सुनावणी असून दोन्ही गटाकडून फेरसाध नोंदवली जाणार आहे. अजित पवार गटाकडून भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष होईल आणि शरद पवार गटाकडून जितेंद्र आवड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष होणार आहे. 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात, रश्मी ठाकरे मैदानात, विदर्भापासून सुरु होणार 'स्त्री शक्ती संवाद यात्रा'

Thackeray Group : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु करण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाची महिला आघाडी देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येतेय. पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती संवाद यात्रा आयोजित करण्यात आलीये. मंगळवार 16 जानेवारी रोजी विदर्भापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यामध्ये विदर्भातील महिलांशी संवाद साधला जाईल. 

Uday Samant : महाराष्ट्राला एक एक रुपयांचा हिशोब देणार; आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्राला एक एक रुपयांचा हिशोब दिला जाईल, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दावोसला जे शिष्टमंडळ गेलंय ते स्वत:च्या खर्चानं गेलं आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 

Uday Samant : महाराष्ट्राला एक एक रुपयांचा हिशोब देणार; आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्राला एक एक रुपयांचा हिशोब दिला जाईल, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दावोसला जे शिष्टमंडळ गेलंय ते स्वत:च्या खर्चानं गेलं आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 

Amit Shah sister Death : अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचं मुंबईत निधन 

Amit Shah sister Death :  अमित शाह यांची मोठी बहिणी रजूबेन यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी मुंबईत येऊन बहिणीची भेट घेतली होती. पण आज त्यांनी गिरगावातील रिलायन्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


 

Rahul Narwekar:  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात  याचिका दाखल

Rahul Narwekar:  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात  याचिका दाखल केली आहे. आज दुपारी 2  वाजता ठाकरे गटाकडून याचिका करण्यात दाखल करण्यात आली. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळ सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असल्याचा दावा करत  याचिका दाखल केली. ऑनलाईन पद्धतीने याचिका दाखल केली. 

Sambhaji Nagar News:  मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर

Sambhaji Nagar News:  मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून आंदोलनाची माहिती जमा करण्यास सुरुवात  केली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षक यांनी पत्र लिहिले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आंदोलनाला जाणाऱ्यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. 

Hasan Mushrif :  राजेंद्र यड्रावर एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाहीत- मुश्रीफ

Hasan Mushrif :  महायुतीच्या मेळाव्यात बोलताना घटक पक्षाच्या नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. याबाबत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी घटक पक्षांच्या नेत्यांची समजूत काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिलीय. तर एकनाथ शिंदेंना समर्थन देणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावर शिंदेंना सोडून जाणार नाहीत, असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केलीय.

शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींनी घेतली राज ठाकरेंची भेट

Raj Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलिबाग येथे सदिच्छा भेट घेतली.

Beed News:  बीडच्या परळीत किरकोळ कारणावरुन दोन गटांत तुफान राडा, मारहाणीप्रकरणी 30 जणांविरोधात गुन्हा दाखल

Beed News:  परळीच्या बाजारपेठेत क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीये. या हाणामारीत मोठ्याप्रमाणात दुकानातील साहित्याची नुकसान झालंय. याप्रकरणी आता 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या वादाला धार्मिक किनारही मिळालीये.

Aaditya Thackeray : आधी ५० खोके होते आता हे ५० लोक घेऊन जाताय; आदित्य ठाकरेंचा घणाघात


Aaditya Thackeray :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील एका दौऱ्यासाठी 28 तासांत 40 कोटी खर्च केले होते, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, आज गोड गोड बोलायचं दिवस आहे. पण त्यात सत्य सुद्धा बोललं पाहिजे. १ वर्ष झालं रस्त्याचा घोटाळा सुद्धा समोर आणला होता. आज हे घटनाबाह्य मुख्यमंत्री दाओस दौऱ्याला ५० लोक घेऊन जात आहेत. आधी ५० खोके होते आता हे ५० लोक घेऊन जाताय, असेही ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. 


Virar Firing: विरारमध्ये अज्ञात इसमाकडून घरावर गोळीबार

Virar Firing: विरारमध्ये अज्ञात इसमाकडून घरावर गोळीबार करण्यात आला आहे.  गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आबे.  ही फायरिंग वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विरार पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे

बाहेरून येणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या ठाण्यात, वेळीच सावध व्हा : राज ठाकरे

Raj Thackeray : पनवेलमधील भाषा बदलली आहे. उद्या अलिबागची भाषा बदलेल. तुम्ही हिंदी बोलायला लागाल. ठाणे जिल्हा जगात एक नंबर आहे. जिथे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ठाणे जिल्ह्यात 7 महानगर पालिका आहेत. येवढी लोकसंख्या वाढली आहे. सगळे हातातून गेल्यावर कपाळावर पश्चातापामुळं हात मारायची वेळ येईल.

बाहेरून येणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या ठाण्यात, वेळीच सावध व्हा : राज ठाकरे

Raj Thackeray : पनवेलमधील भाषा बदलली आहे. उद्या अलिबागची भाषा बदलेल. तुम्ही हिंदी बोलायला लागाल. ठाणे जिल्हा जगात एक नंबर आहे. जिथे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ठाणे जिल्ह्यात 7 महानगर पालिका आहेत. येवढी लोकसंख्या वाढली आहे. सगळे हातातून गेल्यावर कपाळावर पश्चातापामुळं हात मारायची वेळ येईल.

कुंपणच शेत खातंय, नेत्यांचेच पैसे लावले जातायेत : राज ठाकरे

Raj Thackeray : जमिन एकदा गेली की परत येणार नाही. कुंपणच शेत खात आहे. नेत्यांचेच पैसे लावले जातात. फक्त दुसरी नावे पुढे केली जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

आपण आपल्या जमिनी वाचवल्या पाहिजेत, राज्यात जे चांगलं ते घेतलं जात आहे : राज ठाकरे

Raj Thackeray : आपण आपल्या जमिनी शांतपणे वाचवल्या पाहिजेत. कालांतराने माझे शब्द आठवतील. राज्यात जे चांगले आहे ते घेतले जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

RSS Meeting:  भाजपची आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक, लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरीची बैठक

RSS Meeting:  भाजपची आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयात बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे बैठकीला उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरीची बैठक आहे

Vasai News:  श्वानाला वाचवताना गाडी थेट  नाल्यात कोसळली, वसईच्या गास सनसिटी रस्त्यावरील दुर्घटना

Vasai News:  श्वानाला वाचवताना गाडी थेट  नाल्यात कोसळली. वसईच्या गास सनसिटी रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. दोन तरुणांना किरकोळ दुखापत झाली आहे.  सकाळच्या सुमारास जेसीबीच्या मदतीने  गाडी नाल्यातून  बाहेर काढली. 

Nashik Makar Sankranti:  येवल्यात मकर संक्रांती निमित्त पतंगोत्सव, 'एबीपी माझा'चा पतंग गगनभरारी घेणार

Nashik Makar Sankranti:  नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांती निमित्त तीन दिवसीय पतंगोत्सवाला काल सुरुवात झालीय. या महोत्सवात  'एबीपी माझा'चाही पतंग आकाशात उंच उडणार आहे.येवल्यातील भावसार पतंग स्टॉल वरती एबीपी माझाचा पतंग अनेकांच लक्ष वेधून घेत आहे. 

Nagpur Bridge Close: नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे नागपुरातील अनेक उड्डाणपूल बंद, कोणताही अपघात होऊ नये म्हणून निर्णय

Nagpur Bridge Close:  मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे शहरातील अनेक उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. उड्डाणपुलावरून वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे दुखापत वा अपघात होऊ नये,गळा कापू नये यासाठी नागपूर शहरातील अनेक उड्डाणपूल आज दिवसभरासाठी बंद करण्यात आले आहे.

Matoshree Attack :  उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रुमला फोन

Matoshree Attack :  मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला कॉल आला आहे.  ट्रेनमधील ४-५ जण उर्दूत बोलत असल्याची माहिती  समोर आली आहे.  कंट्रोल रुमला फोन करणाऱ्यानं संभाषण ऐकलं  आहे. 

 Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात शिवसेना  ठाकरे गट सुप्रीम कोर्टात
 Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात शिवसेना  ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेले आहे. ठाकरे गटाकडून आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे.  दुपारी 12 वाजता ठाकरे गटाकडून याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळ सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला, असे ठाकरे गटाच मत आहे. 

 
Sangli Crime:  कुपवाडजवळील बामनोलीमध्ये बहिणीच्या प्रियकराचा भावाने केला  खून

Sangli Crime:  कुपवाड जवळील बामनोलीमध्ये बहिणीच्या प्रियकराचा भावाने  खून केला आहे.  अठरा वर्षे युवकाचा भावाने मित्राच्या मदतीने केला  प्रेमप्रकरणातून खून केला आहे. पोटात चाकू भोसकून केला खून केला आहे. बामनोलीच्या दत्तनगर भागामधील मध्यरात्री ही घटना घडली आहे. तीन आरोपींना रात्रीच कुपवाड पोलीसांनी ताब्यात घेतले

Leopard Attack :  बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, अहमदनगरच्या लोणी गावातील घटना

Leopard Attack :  बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात ही घटना घडली आहे. काल संध्याकाळी सहा वाजता घटना घडल्याचा अंदाज आहे.  रात्री दहा वाजता सापडला मुलाचा मृतदेह सापडलाय  घराजवळील शेतात मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे.  अथर्व प्रवीण लहामगे या नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक दिवसापासून बिबट्याचा परीसरात मुक्त संचार आहे

Mumbai Kala Chowki Fire: काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात स्फोट, मोठी आग लागली

Mumbai Kala Chowki Fire: काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटात मोठी आग लागली आहे. सहा  स्फोटांचे आवाज आल्याची स्थानिकांकडून माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. गॅस सिलिंडरचे स्फोट असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे


 





Raosaheb Danve:  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पालघर दौऱ्यावर

Raosaheb Danve:  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पालघर दौऱ्यावर आहेत. दानवेंसाठी  मुंबई ते डहाणू  दोन डब्यांची विशेष एसी ट्रेन सोडली.  डहाणू तालुक्यातील नरेशवाडी येथे होणाऱ्या विकसित भारत या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. 

Bacchu Kadu Meets Manoj Jarange: बच्चू कड यांनी मनोज जरांगेंच्या भेटीत सगे-सोयऱ्यासंदर्भात चर्चा

Bacchu Kadu Meets Manoj Jarange: बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची  भेट घेतली. जरांगेंच्या मुंबई आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार आहेत. जरांगेंच्या मुंबई दौऱ्यानिमित्त भेटीचं आयोजन करण्यात आले.  बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंच्या भेटीत सगेसोयऱ्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या प्रस्तावात बदल सुचवले 

Nagpur Crime News:  नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपुरात गुन्हे दाखल

Nagpur Crime News:  नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपुरात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गच्चीवर डीजे लावून पतंग उडवल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.पाचपावली, कळमना, यशोधरा नगर, गणेशपेठ, इमामवाडा,पारडी या पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे गुन्हे दाखल झाले.

Parbhani Accident:  परभणीच्या पोखर्णी-पाथरी महामार्गावर स्कॉर्पिओ-दुचाकी अपघात

Parbhani Accident:  परभणीच्या पोखर्णी-पाथरी महामार्गावर सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक यांच्या दुचाकी आणि स्कॉर्पिओ मध्ये झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला असून अपघातग्रस्त स्कॉर्पिओ जळुन खाक झाली आहे.. 

Gunratna Sadavarte : जरांगेंच्या 'चलो मुंबई' आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात

Gunratna Sadawarte : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी दिलेल्या चलो मुंबई आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईत मराठा आंदोलनाची हाक देत  मनोज जरांगे सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा समर्थकांना मुंबईत घेऊन येण्याची भाषा करणा-या जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईचीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे


 

Bacchu Kadu Meets Manoj Jarange : बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी घेणार जरांगेंची भेट

Bacchu Kadu Meets Manoj Jarange : बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये ही भेट होणार असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील दौऱ्यानिमित्त या भेटीत चर्चा होणार आहे. 

Aarey Protest: आदिवासी बांधवाचे आरे प्रशासनाविरोधात भीक मागून आंदोलन

Aarey Protest:  एकीकडे राज्य सरकारने रस्ते धुण्याचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं असताना दुसरीकडे आरेतील रस्त्यांची दूरवस्था झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेवरुन प्रशासनाविरोधात हजारो आदिवासी बांधव आज रस्त्यावर उतरले. आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरून आरे प्रशासनाविरोधात भीक मागून आंदोलन पुकारले..

Kurla Festival: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कुर्ला फेस्टिव्हल 2024 चं उद्घाटन

Kurla Festival: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कुर्ला फेस्टिव्हल २०२४ चं उद्घाटन करण्यात आलं. यंदा कुर्ला फेस्टिव्हलचं दुसरं वर्ष आहे.. यावेळी राममंदिर सोहळ्यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates:  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.