Maharashtra Live Update: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Raju Waghmare: काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश
Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपमधून तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी दोघांनी काल उमेदवारी मागे घेतली. परंतु शिवाजीराव जाधव मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातर आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचं शिवाजीराव जाधव यांनी सांगितलं. तसंच निवडणुकीत पराभव झाल्यास राजकारण सोडून वकिलीची प्रॅक्टिस करेन, असं जाधव यांनी सांगितलं.
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल करावे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. बदल न केल्यास राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच त्यांच्याही पक्षांची वाताहत होईल असंही त्यांनी म्हंटलय.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतल्या जात असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी 'वर्षा'वरील मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे आणि उपसचिव नितीन दळवी यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळतेय. वर्षावर होत असलेल्या राजकीय बैठका हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे, अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली होती.
Gudi Padwa 2024 : एपीएमसी मार्केट मध्ये इतर दिवशी कामात व्यस्त असलेले व्यापारी माथाडी कामगार आज गुढीपाडव्याच्या निमीत्ताने एकत्र येऊन मार्केट मध्ये गुढी उभारत भव्य शोभायात्रेचे आयोजन केले. ह्या शोभायात्रा मध्ये व्यापारी माथाडी कामगार एकत्र येऊन नवीन वर्षाचा आनंद साजरा करत उत्साहात गुढी उभारली. विशेष म्हणजे शोभायात्रा मध्ये माथाडी कामगारांची मुले देखील सहभागी होत पारंपारिक वेशभूषा करत ढोल वाजवत आनंद साजरा केलेला पाहायला मिळाला.
Gudi Padwa 2024 : पनवेल शहरात गुडीपाढव्या निमित्ताने आयोजित केलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने पनवेल वाशीयांनी सहभाग घेतला होता. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पारंपारिक वेशभूषेत लोकांनी शोभायात्रेचा आनंद घेतला. या शोभायात्रेत तरूणांबरोबर विद्यार्थीही सामील झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वातंत्रसेनांनींची वेशभुषा केली होती. ढोलताशा, लेजीम, हालगीच्या आवाजात पनवेल शहरात ही शोभायात्रा फिरविण्यात आली. सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती या शोभायात्रेत होती.
Hinglo Lok Sabha Election 2024 : हिंगोली : हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपमधून तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी दोघांनी काल उमेदवारी मागे घेतली. परंतु शिवाजीराव जाधव मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातर आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचं शिवाजीराव जाधव यांनी सांगितलं. तसंच निवडणुकीत पराभव झाल्यास राजकारण सोडून वकिलीची प्रॅक्टिस करेन, असं जाधव यांनी सांगितलं.
Gudi Padwa Melava 2024 : आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात, आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस! आजपासून सुरु होणाऱ्या वर्षाला क्रोधीनाम संवत्सर असं म्हटलं जातं. शालीवाहन शके 1946 ची सुरुवात आजपासून झालीय. आजच्या दिवशी घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मुंबई, उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
MNS Gudi Padwa Melava 2024 : मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणारेय. या मेळाव्याची तयारी अंतीम टप्प्यात आलीये.. स्टेजच्या शेजारी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आलेत..तर आसन व्यवस्थेची तयारीही अंतिम टप्प्यात आलीये..गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीसोबत लोकसभा निवडणूक लढणार अशा चर्चा होत्या. त्यापार्श्वभूमीवर या मेळाव्यात राज ठाकरे बोलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -