Maharashtra News LIVE Updates : खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराची तोडफोड

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2024 03:03 PM
Mahayuti Seat Sharing : मुंबई लोकसभेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक

Mahayuti Seat Sharing : मुंबई लोकसभेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक


मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी बोलावली पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक


दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात शेलार साधणार माजी नगरसेवकांशी संवाद


*2 दिवसांत लोकसभेची यादी जाहीर होण्याची शक्यता ; त्यामुळे बैठकीला महत्त्व


लोकसभेसाठी भाजप मुंबईत नवे चेहरे उतरवण्याच्या तयारीत असल्याने बैठकीला महत्व

Shirdi News : शिर्डी सलग सुट्यांमुळे शिर्डीत भक्तांची मांदियाळी

Shirdi News : सलग सुट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची रीघ लागली असून गर्दीने साईनगरी फुलून गेली आहे..महाशिवरात्र, शनिवार आणि उद्या रविवार या सलग सुट्यांमुळे भाविकांनी साईंच्या दर्शनाला गर्दी केली आहे. देशभरातील आलेल्या साईभक्तांच्या निवास भोजन आणी दर्शनाची व्यवस्था साईसंस्थानकडून करण्यात येत आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्गसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 3860 कोटी रुपयांचा निधी

Sindhudurg News : कणकवली येथील अद्ययावत असलेल्या शासकीय विश्रामगुहाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासोबत कणकवली तालुक्यातील फोंडा येथील विश्रामगृहाचा देखील शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात जिल्ह्यातील पाच विश्रामगृहांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आणि ऑफलाईन उदघाटन करण्यात आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 3860 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेला विकसित भारत उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Byculla Todfod : अरविंद सावंतांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराची तोडफोड
Byculla Todfod : खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराची तोडफोड

 

उद्घाटनाच्या आदल्या दिवशी  भायखळा येथील समाज मंदिराची तोडफोड 

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे आज उद्घाटन होते 

 

 मात्र भायखळा येथे उभारण्यात आलेल्या या  समाज मंदिराची काल तोडफोड करण्यात आली

 

यामध्ये या समाज मंदिराचे कुलूप तोडून नुकसान करण्यात आले असून  काचा सुद्धा फोडण्यात आले आहेत

 

हे काम आज्ञातानी केला असून  केला असून ही तोडफोड का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे 

 

या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे

 
GONDIA HUNGER STRIKE : पोलीस पाटील भरतीमध्ये मोठा घोळ झाल्याचा अपात्र उमेदवारांचा आरोप
Gondia News : गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील भरती करण्यात आली होती. मात्र या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करून अनेक उमेदवारांनी आंदोलन केली होती. याबाबत उत्तरपत्रिका आणि लेखी गुण याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी त्यासाठी आंदोलने करण्यात आले होते. याची दखल उपविभागीय अधिकारी यांनी घेतली होती परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्याने अर्जुनी मोरगाव आणि इतर पोलीस पाटील भरतीतील उमेदवारांनी घोळ झाल्याचा आरोप करून सीसीटीव्ही फुटेज लेखी परीक्षेच्या गुणाची तपासणी करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं परत त्यापैकी आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे या सर्व अपात्र पोलीस पाटील भरती चे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केला आहे. या भरतीची निष्पक्षच तपासणी करण्यात यावी असे मागणी केली उमेदवारांनी केली आहे.
Electricity Workers : वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा

Electricity Workers : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला. संप स्थगित करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत संप स्थगित करण्याचा निर्णय झाला.

Buldhana News : अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात, निवडणुकांपूर्वी अतिक्रमण मुक्त बुलढाणा शहर करण्याचा निर्धार

Buldhana News : स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्यासाठी बुलढाणा शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात सुरू आहे. बुलढाणा शहरातील रस्त्याचे कडेला बसलेली छोटी मोठी दुकाने काढण्याचा सपाटा नगर पालिकेने सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि इतर ठिकाणची जी अतिक्रमणे  बसलेली आहेत ती काढण्यात येत आहेत. फेरीवाले कपडे वाले चहा टपरी अशा सर्व दुकाने उठवून शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार नगर पालिकेने केला आहे.

Cashew Farmers in Trouble : कोकणातील काजू उत्पादक शेतकरी अडचणीत

Agriculture News : कोकणातील काजू बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने काजू आयातीवर बंदी घालावी किंवा आयात शुल्क वाढवावे, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे काजूला 200 रुपये हमीभाव देण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांना फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून काजू लागवडीकरीता प्रवृत्त केले, त्यांना शासनाने आर्थिक संकटातून बाहेर काढावे, अशा मागण्या केल्या जात आहेत. गेले काही महिने काजूला चांगला हमीभाव मिळावा, अशी मागणी कोकणातील शेतकरी आणि फळबागायतदार संघाच्यावतीने केली जात आहे. कोकणात सध्या ‘काजू बी’च्या हमीभावाचा विषय ऐरणीवर आला आहे. खरं तर ‘काजू बी’च्या एका किलोचे उत्पादन खर्च मूल्य 129 रुपये 50 पैसे असल्याचे अनुमान कृषी विद्यापीठाने काढले आहे. परंतु सध्या बाजारात एक किलो काजूला 100 ते 110 रुपये मूल्य मिळत आहे. त्यामुळे काजू बागायतदार शेतकऱ्यांचे आर्थिक समिकरणच बिघडून गेले आहे. काजूला दर मिळत नसेल, तर काजू बागा सांभाळायच्या कशा, कुटुंब चालवायचे तरी कसे, असे प्रश्न त्यांना पडले आहेत.

Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठका 

Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठका 


बारामतीत 17 आणि 18 तारखेला लोकसभा मतदारसंघातील सगळ्या पक्षाचे आमदार, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 


भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील , राष्ट्रवादीकडून प्रदीप गारटकर राहणार उपस्थित 


आमदार पदाधिकाऱ्यांमधील वाद टाळण्यासाठी समन्वय बैठका


हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर आहेत 


सगळे एकत्रित काम करण्यासाठी बैठक 


19 आणि 20 तारखेला शिरूर लोकसभेची समन्वय बैठक

Gadchiroli News : हर हर महादेवच्या गजरात विदर्भाची काशी मार्कंडादेव यात्रेला सुरुवात

Gadchiroli News : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील महाशिवरात्री यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. हर हर महादेवच्या गजरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असून दक्षिण वाहिनी वैनगंगा नदी मंदिरस्थळी उत्तर वाहिनी झाली असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. पहाटे 4 वाजता स्थानिक खासदार आणि आमदार यांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले आहे. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध मनोरंजनाची साधने, दुकाने लागलेली आहेत.

CM Shinde in Dapoli : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दापोली दौऱ्यावर

CM Shinde Dapoli Daura : कोकणात महायुतीतील मित्र पक्षांमध्ये सुरू असलेली धुसफूस आणि सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दापोली दौरा महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दापोली दौऱ्यावरती येत आहेत. त्यामुळे देखील या दौऱ्याला महत्त्व आहे. दरम्यान दापोलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील होणार आहे. सध्या कोकणात महायुतीत सुरू असलेले  आरोप - प्रत्यारोप, नाराजीचा सुर पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोलीतील जाहीर सभेतून शिवसेनेतील कार्यकर्त्यांसह मित्र पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? हे देखील लक्षनीय असेल. त्यामुळे त्यांचं दापोलीत होणारं  भाषण देखील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल.

Washim Shiv-Parvati Vivah : महाशिवरात्री निमित्त शिव-पार्वतीचा विवाह सोहळा

Washim News : महाशिवरात्री  निमित्त वाशीमच्या  पुरातन  पद्मेश्वर   संस्थेमध्ये मध्य रात्री  शिव-पार्वती  विवाह  पार पडला. या विवाह सोहळ्या पूर्वी हळदी सोहळा पार पडला. याच निमित्ताने पद्मेश्वर संस्थेत वाशीम शहरातील नागरिकांनी मोठ्या संखेने  या सोहळ्यात हजेरी लावली.  पद्मेश्वर  संस्थेत आकर्षक मंडप सजावट करण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. वाशीम शहरात  भगवान शंकराची लग्न वरात काढण्यात आली. यावेळी टाळ, मृदंग  वारकरी आणि संबळच्या वाद्यावर उपस्थितांनी चांगलाच ठेका धरला होता.  

Supriya Sule Janata Darbar : बारामतीत सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार सुरू 

Baramati News : खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती येथील भिगवन चौकात सुरू केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यालयात सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार सुरू आहे. या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम होणार आहे. या नंतर सुप्रिया सुळे सुपे गावाला भेट देणार असून नीरा येथे पदयात्रा करणार आहेत. त्यानंतर भोर येथील सभेला हजेरी लावणार आहेत.

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला आग

Bhopal Fire : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. 





Bhopal Fire : भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग

Bhopal Fire : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आज लागल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. 





Beed : परळी रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा आढळला मृतदेह

Beed : बीडच्या परळीतील रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह आढळून आलाय. सदरील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून सुभाष दुधाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पुणे डिव्हिजन मध्ये कार्यरत होते. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही. आज सकाळी रेल्वे रुळावर दुधाळ यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Beed : परळी रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा आढळला मृतदेह

Beed : बीडच्या परळीतील रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह आढळून आलाय. सदरील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून सुभाष दुधाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पुणे डिव्हिजन मध्ये कार्यरत होते. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही. आज सकाळी रेल्वे रुळावर दुधाळ यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Beed Crime News : परळी रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा आढळला मृतदेह आत्महत्या असल्याची माहिती

Beed Murder : बीडच्या परळीतील रेल्वे लोहमार्गावर सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह आढळून आलाय. सदरील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून सुभाष दुधाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पुणे डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही. आज सकाळी रेल्वे रुळावर दुधाळ यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Uddhav Thackeray in Yavatmal : उद्धव ठाकरे दोन दिवस यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर
Yavatmal News : उद्धव ठाकरे यांचे 12 आणि 13 मार्चला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात पदाधिकारी बैठक आणि संवाद मेळावे होणार आहेत. 12 मार्चला राळेगाव येथे दुपारी 12  वाजता तर पुसद येथे सायंकाळी 6 वाजता संवाद मेळावा घेणार आहे. 12 मार्चला माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या घरी मुक्काम राहणार आहे. तसेच  13 मार्चला वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे 12 वाजता  तर सायंकाळी 6 वाजता वाशीम येथे मेळावा घेणार आहेत. शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी यांचा हा मतदारसंघ असून या चारही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
Thane Track Accident : ताबा सुटल्याने ट्रक डिव्हायडरवर धडकला, कॅडबरी सिग्नलजवळील घटना

Thane News : ठाण्यातील कॅडबरी सिग्नलकडून माजिवाडाकडे जाणाऱ्या सर्विस रोडवरती उत्सव हॉटेलच्या जवळ, विवियाना मॉलच्या बाजूला सकाळी 06:42 वाजताच्या सुमारास पडगा ते हिरानंदानी, घोडबंदर रोड येथे माल:- सुमारे 4 ते 5 ब्रास वाळू घेऊन जाणारा एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटून सर्विस रोडमधील डिव्हायडरला धडकल्याने ट्रक पलटी होऊन अपघात झाला होता. कोणालाही दुखापत नाही. या घटनास्थळी अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनास्थळी वाळूचा ट्रक पलटी झाल्यामुळे सर्विस रोड वरती पडलेली वाळू जे.सी.बी. मशीनच्या मदतीने बाजूला करण्याचे काम सुरु, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मार्फत रोडवरती सांडलेल्या ऑईलवरती माती पसरविण्यात आली आहे. या घटनास्थळी विवियाना मॉल सर्विस रोड मागील एक तासापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Politics : दिल्लीमध्ये पुन्हा महायुतीची बैठक पार पडणार, या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता

Politics : महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत अद्याप अंतिम तोडगा निघाला नाही


दिल्लीमध्ये दोन दिवसानंतर पुन्हा एक महायुतीची बैठक पार पडणार


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पार पडणाऱ्या या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता


एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात घेण्यासाठी प्रयत्नशील


शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा चांगल्या प्रकारे सुरू असल्याची विश्वसनी सूत्रांची माहिती

Congress : प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे जागावाटप रखडल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा

MVA : महाविकास विकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची 4 लोकसभा जागा सोडायला तयार आहे.


मात्र तरी प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या नावाने बाहेर अपप्रचार करत असल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे ...


काँग्रेस वर्किंग कमिटीने जागावाटप बोलणीचे सर्वस्वी अधिकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला असतांना प्रकाश आंबेडकर दिल्लीच्या नेत्याकडे बोट दाखवत असल्याने महाविकस आघाडीचा जागावाटपाचा पेच कायम.


प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे जागावाटप रखडल्याचे काँग्रेस नेत्यांचा दावा .

Warbha Crime News : वर्ध्यात भूसंपादन विभागातील अपहार प्रकरणात 6 जणांना अटक

Warbha Crime News : वर्ध्यात लघुसिंचन आणि कालवे भूसंपादन विभागात झालेल्या तब्बल 2 कोटी 64 लाख 13 हजार 735 रुपयांच्या अपहार प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या अपहार प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यात आता आर्थिक गुन्हे शाखेने उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना अटक केली आहे. या प्रकरणात बोगस व खोटे कागदपत्र तयार करून अधिकाराचा गैरवापर करण्यात आलाय. बनावट लाभार्थी दाखवून शासकीय रक्कम वळविण्यात आली. यातील एजंट नितेश येसनकर याला 29 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती त्याला 9 मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणी आणखी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींची संख्या सहा झाली आहे. नितेश येसनकर, प्रफुल देवढे, निशांत किटे, नितीन कुथे, आकाश शहारकर अशी एकूण पाच आरोपीची नावे आहे.   उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या हिंगोली येथील बंगल्यावर झडती दरम्यान 3 लाख 59 हजार रुपये रोख आणि 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने आढळून आलेय.

Amravati Pravesh Dwar Aandolan : प्रवेशद्वार प्रकरणी अद्यापही तोडगा नाहीच,

Amravati News : प्रवेशद्वार प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नाही, आज तिसरा दिवस आहे. प्रशासनाने तीन दिवसांचा वेळ मागितला, त्यामुळे आज सायंकाळपर्यंत प्रशासन काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पांढरी खानमपूर येथील हजारो बौद्ध समाजाचे लोकं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देत आहेत. बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार अशी भूमिका घेतली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गावात संचारबंदी लावण्यात आली आहे. तरीही बौद्ध समाजाचे हजारो लोकं पायी अमरावती गाठत आयुक्त कार्यालय गाठलं. अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा झाली त्यात आयुक्तांनी तीन दिवसांचा वेळ मागितला, त्यामुळे सगळ्या बौद्ध समाजाने तीन दिवस आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या देत आहे. शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाने आंदोलकांना पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर येताय त्यांच्यासोबत शिष्टमंडळ यांची बैठक होणार त्यात काही तोडगा निघतो हे पाहावे लागेल.

MVA Seat Sharing : मविआचं घोंगड भिजतच! वंचितला किती जागा द्यायच्या यावर मविआ मध्येच दोन गट

Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांना किती जागा द्यायच्यात याच्यावरून महाविकास आघाडीत दोन गट पडले आहेत.. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पाच ते सहा जागा सोडण्याची तयारी आहे. तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत तिनच जागा वंचितला देण्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. आजच्या बैठकीनंतर आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. 14 किंवा 15 मार्चला प्रकाश आंबेडकरांची सांगलीत सभा आहे. त्याआधी निर्णय घ्या असा अल्टिमेटम आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिल्याचं समजतयं. दरम्यान वंचितला महाविकास आघाडीने फक्त दोन जागा दिल्याचं वंचितने मविआला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे सन्मानपूर्वक आमच्याशी वागा असा थेट इशारा वंचित कडून महाविकास आघाडीला देण्यात आलेला आहे. त्यामुळे यावरती दोन दिवसांमध्ये आणखीन नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

Hingoli News : शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे उद्या हिंगोलीत आयोजन

Hingoli News : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्या हिंगोलीत आयोजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदानावर तयारी पाहायला मिळते. एक लाख 60 हजार स्क्वेअर फुटवर भव्य अशा ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून 25000 लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे 300 परिवहन विभागाच्या बसेस आणि 400 ते 500 खाजगी वाहनाचा वापर या लाभार्थ्यांना प्रवासासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर उद्या साधारणतः दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.

Costal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

Costal Road Inauguration : बहुप्रतिक्षित कोस्टल रोडचे अखेर सोमवारी उद्घाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच या मार्गाचे उद्घाटन करणार असून उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आणि सुनील शिंदे यांचे ही नाव कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेने दिले आहे. गेल्या काही महिन्यात या रस्त्याचे उद्घाटन आणि श्रेयवाद यामुळे या उद्घाटन कार्यक्रमाला ठाकरे गटाचे हे नेते उपस्थित राहणार का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

MNS Anniversary : आज मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार

Raj Thackeray MNS Celebration in Nashik : आज मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे

राज ठाकरेंसोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी नाशकात पोहोचले आहेत.


राज ठाकरे लोकसभेबाबत भूमिका मांडणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


 

Pune-Nagpur Greenfield Road : पुणे नागपूर अंतर 6 तासावर 

Pune-Nagpur Road : पुणे नागपूर अंतर सहा तासावर 


आता पुणे नागपूर अंतर होणार अवघ्या तासावर ...


पुणे - अहदनगर - संभाजीनगर नवीन ग्रीनफिल्ड मार्ग तयार होणार...


केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय व सार्वजनिक बांधकाम विभागात यांच्यात झाला करार ...


कराराच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित

PM Modi in Assam : पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्याचा दुसरा दिवस

PM Modi in Assam : पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी आसामला 18 हजार कोटी रुपयांच्या विकास योजनांची भेट देणार आहे. अरुणाचल प्रदेशातील सेला बोगदा देशाला समर्पित करणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.