Maharashtra News LIVE Updates : महायुती, महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम; राज्यातील प्रत्येक घडामोडीचे अपडेट एका क्लिकवर

Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रसह देशभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट एका क्लिकवर मिळणार. देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Mar 2024 09:28 AM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही अजूनही सुटलेला नाही. मागील दोन दिवसांत अनेक बैठका झाल्या...More

Beed : भाजप आमदाराचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला

Beed : भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पडला असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे गाव चलो अभियान या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा या गावात आले होते.