Maharashtra News LIVE Updates : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच काश्मीरमध्ये

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2024 02:39 PM
Sujay Vikhe on Amol Kolhe : सुजय विखेंची अमोल कोल्हे यांच्यावर टीका

Sujay Vikhe on Amol Kolhe : महाविकास आघाडीकडे अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारच नाही , त्यामुळे ते तुम्ही या तुम्ही या असं म्हणत आहे... कुणाला जर रिकाम्या जागा भरायचे असतील तर ते जाऊ शकतात असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुजय विखेंचे राजकीय विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना तुतारी हाती घेण्याबाबत ऑफर दिली होती. याबाबत विचारले असता, खासदार सुजय विखे यांनी अमोल कोल्हे यांच्यावरही निशाणा साधला आहे. अमोल कोल्हे यांच्या निमंत्रणाला मी फारशी किंमत देत नाही त्यांच्याकडे उमेदवारच नाही त्यामुळे ते इतरांना निमंत्रण देत आहेत त्यांचे स्थानिक आमदार आम्ही राज्यातच समाधानी आहोत असं वारंवार म्हणत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

Gondia News : बहुजनाच्या भल्यासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली : अजित पवार

Gondia News : अजित पवार -


बहुजनाच्या भल्यासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली


शेतकऱ्यांसाठी काल डिड हजार कोटींचा निधीला वर्ग केला


पूर्वी विदर्भाला विकासनिधी येत नव्हता, हे अजित पवार यांनी गोंदियाच्या सभेत मान्य केले


भविष्यात साडेआठ लाख शेतकऱ्यांचे विद्युत पम्प सौर उर्जेवर आणण्याचा निर्णय घेतला


येत्या दोन ते तीन दिवसात लोकसभेचा जागावाटप पूर्ण होईल


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार म्हणून काम करत आहे

Maval News : ठाकरेंचे मावळ लोकसभेचे उमेदवार शरद पवारांच्या भेटीला, भेटीनंतर संजोग वाघरेंची श्रीरंग बारणेंविरोधात डरकाळी

Maharashtra Political News : पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असणाऱ्या संजोग वाघेरेंना उद्धव ठाकरेंनी मावळची उमेदवारी घोषित केली आहे. शरद पवारांच्या शब्दावरचं ठाकरेंनी वाघेरेंवर विश्वास टाकल्याचे बोलले जाते. म्हणूनच उमेदवारी मिळताच वाघेरे थेट शरद पवारांच्या भेटीला पोहचलेत. पवारांचा आशीर्वाद घेताच वाघेरेंनी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंविरोधात डरकाळी फोडली आहे.

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अरुणाचल प्रदेशात 60 विधानसभा जागा लढवणार

NCP in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशात 60 विधानसभा जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत घोषणा


एनडीए घटक पक्षच पण अरुणाचल प्रदेशात वेगळी चूल


60 विधानसभा जागा लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

PM Modi Live : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच काश्मीरमध्ये

PM Modi Live : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच काश्मीरमध्ये पोहोचले आहेत.





Hingoli News : पाण्यासाठी बिऱ्हाड आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Hingoli News : हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेलगत असलेला ईसापुर धरण जवळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पाच ते सहा गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावतेय  धरण उशाला असताना सुद्धा शेतीसाठी पाणी वापरता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे तर याच ईसापुर धरणातील पाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नांदेडला नेले जाते आहे. कालव्यातून  सुद्धा धरणाचे पाणी नांदेडला पळवले जाते आहे. या धरणाच्या जवळपास असलेल्या पाच ते सहा गावांना कुठलाही फायदा होत नाही, त्यामुळे या नागरिकांनी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू केलं आहे. ईसापुर धरणातून शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता द्यावी आणि या माध्यमातून या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे.

Kolhapur Crime News : चोरीतील 79 हजार रुपयांचे 13 मोबाईल पोलिसांकडून जप्त, एकाला अटक

Kolhapur News :  कोल्हापुरातील पाच बंगला परिसरातील मोबाईल शॉपी शॉपीच्या शटरचे कुलूप तोडून मोबाईल लंपास करणारा सराई चोरटा राज उर्फ रविराज महेश कसबेकर याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील 79 हजार रुपयांचे 13 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. शाहूपुरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाने परिख पुल परिसरातून कसबेकरला अटक केली असून अवघ्या 24 तासात या चोरीचा छडा लावला आहे.

BJP Delhi Meeting : भाजप मुख्यालयातमध्यरात्री भाजप नेत्यांची बैठक

नवी दिल्लीत भाजप नेत्यांची बुधवारी भाजप मुख्यालयात बैठक पार पडली. महाराष्ट्रात भाजपनं कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे यावर चर्चा  झाल्याची माहिती मिळतेय. तसंच भाजपच्या निरीक्षकांनी पाठवलेल्या 2 ते 3 उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली. भाजप कोअर कमिटीची बैठक रात्री साधारण 1 वाजेच्या सुमारास संपली. दरम्यान 10 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे नेते भाजप मुख्यालयात उपस्थितीत होते.

Shiv Sena - BJP Issue : शिवसेना आणि भाजपा मधील वाद चव्हाट्यावर

मिरा रोड : मुंबईच्या वेशीवरील मिरा भाईंदरमध्ये राज्यात मिञपक्ष असलेल्या  शिवसेना आणि भाजपामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आज भाईंदरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढण्यात आला आहे.  भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्या मालकीचे चैना या ठिकाणी बीकेसी नावाचे हॉटेल आहे. त्याच परिसरात एमएमआरडीएच्या वतीने सुशोभिकरण सुरु आहे. सुशोभिकरणावरुन शेट्टीच्या हॉटेलसमोरच भिंत बांधली होती.  आमदार प्रताप सरनाईक यांच्या इशा-यावरुन ही भिंत बांधल्याचा  आरोप करत, शेट्टी यांनी भररस्त्यात अर्धनग्न आंदोलन करुन, तुम्हाला मोदी आणि फडणवीस यांन ईडी पासून वाचवलं. तुम्ही माझं हॉटेल तोडलं, लुटून लुटून किती लुटणार असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला होता. आज भाजपाच्या वतीने अरविंद शेट्टींवर झालेल्या अन्यायाविरोधात धडक मोर्चा काढला आहे. यात मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Beed Parli Vaijnath : महाशिवरात्रीनिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात उत्सवाची तयारी पूर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई

Beed News : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग यात्रा उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे.


प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीनिमित्त परळी शहरात यात्रा भरते तसेच मंदिरामध्ये दर्शनासाठी पुरुष आणि महिला यांच्या स्वतंत्र  रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी व्यवस्था करण्यात आली असून निवाऱ्यासाठी मंदिराच्या पायऱ्यावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. यावर्षी पाच ते सहा लाख भाविक महाशिवनिमित्त  दर्शन घेतील अपेक्षित धरून तयारी करण्यात आली आहे.भाविकांसाठी अल्पदरामध्ये 100 रुपयाचा पासची सुविधा देखील देण्यात आली आहे 

Congress Seat Sharing : लोकसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसची बैठक

Congress Meeting : काँग्रेसच्या बैठकीला के सी वेणुगोपाल, रमेश चेंनिथाला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नसीम खान आणि चरण सिंग सप्रा उपस्थित राहणार आहेत 


या बैठकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील व्यवस्थेबद्दल चर्चा केली जाणार आहे 


तसेच लोकसभेच्या जागा वाटप आणि तिकीट संदर्भात चर्चा होण्याची देखील शक्यता आहे 


हॉटेल ललित इथे अमित देशमुख, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हांडोरे, सुनील केदार आधीच आल्याचे सांगण्यात येत आहे,

Sharad Pawar Nashik Tour : शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याची जोरदार तयारी सुरु

Sharad Pawar Nashik Visit : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याची तयारी सुरु

13 मार्चला शरद पवार यांची नाशिकच्या निफाडमध्ये होणार जाहीर सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार अजित पवार गटात सहभागी झालेल्या नाशिक मधून धडाडणार शरद पवारांची तोफ

तुतारी चिन्हांसह शरद पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातुन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

काँग्रेस नेते राहुल गांधी  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पचार 13 आणि 14 मार्च रोजी नाशिक मध्ये असणार आहेत, त्यामुळे दोघांची नाशिकमध्ये भेट घडविण्याचा पदाधिकारीचा प्रयत्न


महाविकास आघाडीच्या दोन दिगग्ज नेत्यांची नाशिकमध्ये भेट होणार का? याबाबत उत्सुकता

CM Shinde in Worli : आपला दवाखाना केंद्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

CM Shinde in Worli : वरळीतील आपला दवाखाना केंद्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पाहणी करण्यात आली. वर्षभरात आपला दवाखान्याच्या माध्यमातून  42 लाख रुग्णांनी रुग्ण सेवा घेतली आहे तर आतापर्यंत 222 दवाखाने संपूर्ण मुंबईमध्ये सुरू करण्यात आले आहेत.

Ajit Pawar News : अजित पवार यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्याकडे नागरिकांनी फिरवली पाठ

Gondia News : अजित पवार यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्याकडे नागरिकांनी फिरवली पाठ


गोंदिया जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या कार्यक्रमात अर्ध्या खुर्च्या खाली


उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल मंचावर आलेय, पण अर्ध्या खुर्च्या खाली 


सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी आयोजीत केली अजीत दादांची सभ


सभेची वेळ 11 वाजताची होती, 11.37 वाजता दादा मंचावर आले पण निम्या खुर्च्या खाली 


सभेच्या वेळेवर लोकंच पोहोचली नाही 


प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया जिल्हयातंच दादांच्या सभेतील निम्म्या खुर्च्या खाली

CM Eknath Shinde Costal Road : मुख्यमंत्री शिंदेकडून वरळीत कोस्टल रोडची पाहणी

CM Eknath Shinde Costal Road : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या वरळीत कोस्टल रोडची पाहणी करत आहेत.

Kalyan News : महानगर गॅस पूरवठा 72 तासांसाठी बंद, सीएनजी पंपवर वाहनांच्या रांगा

कल्याण : महानगर गॅस दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तीन दिवस गॅस पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगर गॅस पंप चालकांनी दिली आहे, ही माहिती 
काल रात्रीच्या सुमारास वाऱ्यासारखी पसरली आणि कल्याणमधील सीएनजी पंपावर रिक्षा सीएनजी वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. कल्याणमधील दुर्गाडी चौकात असणारा सीएनजी पंपावर सीएनजी रिक्षाचा सीएनजी वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. महानगरचा गॅस पुरवठा पुढील 72 तास बंद राहण्यासाठी चर्चा या वाहन चालकांमध्ये होती. त्यामुळे रिक्षाचालकांसह वाहनचालकानी सीएनजी पंपावर धाव घेतली. कल्याण-डोंबिवली अंबरनाथ बदलापूर कोणगाव शहरातील पंप बंद झाल्याने कल्याणमधील दुर्गाडी चौकात लांबच लांब राग लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी चालकांनी तीन दिवस महानगर गॅसचा पुरवठा बंद असल्याची माहिती मिळाली आहे.


 

Sharad Pawar : शरद पवार आमचे बाप, ते 10 दादा तयार करू शकतात, पवार समर्थकांनी फुंकली तुतारी

Sharad Pawar : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना शरद पवार आज धक्का देत आहेत. अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते  -शरद पवार सोबत येणार आहेत. बाप-बाप असतो, आमचा बाप 10 दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का? मुळात दादा जनतेचा नव्हे तर स्वतःचा विकास करायला गेलेत. मात्र आम्हाला संविधान वाचवायचा आहे. यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतोय, अशी प्रतिक्रिया लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Malegaon Crime News : साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकलं, घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित

Malegaon Crime News : साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकाला एका तेरा वर्षीय मुलाने साठलेल्या सांडपाण्यात फेकून दिल्याने निष्पाप बालकाचा नाका तोंडात पाणी जाऊन  दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या दातारनगर भागात घडली. या मुलाला पाण्यात फेकून दिल्याची घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली. हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन असे मृत मुलाचे नाव आहे. हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ हस्सान त्याच्या मित्रांसोबत खेळत असतांना ट्या ठिकाणी एक टोपी घातलेला 13 वर्षाचा विधी संघर्षित मुलगा आला आणि त्याने हस्सानला उचलून घेतले व सांडपाण्यात फेकून दिले. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सिसिटीव्हीच्या आधारे संशयित मुलाचा शोध घेत आहे.

Uddhav Thackeray Daura : उद्धव ठाकरे जनसंवाद दौऱ्यावर

Uddhav Thackeray News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जनसंवाद दौरा करत आहेत. या निमित्ताने उद्धव ठाकरे धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा करत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी औसा, उमरगा, तुळजापूर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा पार पडणार आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली मात्र धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा जिंकता यावी यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून एक प्रकारे लोकसभेच्या प्रचाराची सुरुवातच उद्धव ठाकरे करीत आहेत. औसा येथील विजय मंगल कार्यालय मध्ये उद्धव ठाकरेंची पहिली सभा पार पडेल. सभेच्या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे.

Anil Deshmukh Letter : नागपूर विद्यापीठातील नमो युवा महासंमेलनावर अनिल देशमुखांचा आक्षेप, राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठात परवानगी कशी? राज्यपालांकडे तक्रार

Nagpur University Issue : नागपूर विद्यापीठाच्या जागेवर नमो युवा महासंमेलनाच्या आयोजनावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. विद्यापीठात राजकीय कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी अशी विचारणा देखील पत्रातून करण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.

Maratha Meeting : आज सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची पत्रकार परिषद

Maratha Meeting : एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत.. तर दुसरीकडे मराठा संघटना निवडणूक लक्षात घेता, आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी  आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.  आज दुपारी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची पत्रकार परिषद असून सरकारनं जाहीर केलेल्या 10 टक्के आरक्षणावर भूमिका  आणि जरांगेंची मागणी असलेल्या ओबीसीतून आरक्षणावर भूमिका स्पष्ट करणार आहेत...

Rahul Gandhi in Malegaon : राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर

Nashik News : राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रे निमित्ताने नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा नाना पटोले हे मालेगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आढावा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

Ratnagiri News : माजी खासदार निलेश राणेंनंतर आता शिंदे गटाच्या नेत्याची गुहागरात जाहिर सभा

रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणेंनंतर आता शिंदे गटाच्या नेत्याची गुहागरात जाहिर सभा


शिंदे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम घेणार गृहागरात जाहिर सभा


9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता रामदास कदम यांची गुहागरमध्ये  जाहिर सभा


रामदास कदम आणि अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे जाहिर सभेला उपस्थित राहणार


भास्कर जाधव यांच्या बालेकिल्यात तर भाजपचा एकेकाळचा ग़ड ओळखल्या जाणाऱ्या गुहागरात रामदास कदम काय हल्लाबोल करणार याकडे लक्ष्य

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज गोंदिया दौऱ्यावर, राष्ट्रवादीकडुन कार्यक्रमाची जय्यत तयारी... 

Ajit Pawar Daura : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर आणि अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच गोंदिया जिल्हा दौरा आहे. यावेळी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम देखील उपस्थित राहणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 'मनोहर पर्वाचा' शुभारंभ अजित पवार यांच्याहस्ते करण्यात येत आहे.

Yavatmal News : दोन मित्रांवर काळाचा घाला, दुचाकी म्हशीला धडकल्याने अपघातात दोघे ठार

Yavatmal Accident News : बारावीचा पेपर झाल्यानंतर रात्री उशीर झाल्यामूळे मित्राला दुचाकीने गावी सोडून देण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांवर काळाने झडप घेतली. ही घटना  यवतमाळच्या गणेशपुर हिवरदरा शिवारातील  घडली. रात्रीच्या अंधारात रस्त्याने जात असलेली म्हैशीला अचानक दुचाकीची धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अपघातात घटनास्थळीच दोघांचाही मृत्यू झाला आहे.  गणेश कैलास टेकाम आणि रोहित मरसकोल्हे असे  मृतक विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

Unseasonal Rain : गोंदियात अवकाळी पावसाची दमदार हजेरी, रब्बी हंगामातील पिकांना होणार फायदा
Gondia Rain : गोंदिया जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावली. अर्धा तास पाऊस सुरु असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात ऊन तापल्याने तसेच अपुऱ्या विद्युत पुरवठा अभावी अनेक शेतकऱ्यांचे धानपिक करपत चालले होते. मात्र, आज आलेल्या पावसामुळे या धान पिकाला फायदा होणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.