Maharashtra News LIVE Updates : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला - निवडणूक आयोग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Feb 2024 07:33 PM
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित रवार गटाला - निवडणूक आयोग

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित रवार गटाला - निवडणूक आयोग

Maharashtra News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती

Maharashtra News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही सदस्यांची बैठक उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. नाटकाच्या नावाखाली रामाचा अपमान करण्यात आला याचा निषेध म्हणून सभा लावणार उधळून लावणार असा इशारा देण्यात आला. 

Pune News : आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर; जोधपूर येथील AIIMC मध्ये उपचार सुरु

Pune News : आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर झाली आहे. आसाराम बापूंवर 13 जानेवारीपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोधपूर येथील AIIMC मध्ये आसाराम बापूंवर उपचार केले जात आहेत. योग वेदांत समितीने आज पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे. सध्या ते कार्डियाक ICU मध्ये आहेत. 

Maharashtra News : बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाच्या नॅशनल पार्कमधील जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Maharashtra News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प लवकरात सुरू होणार आहे. बोरिवली- ठाणे दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार आहे. बोरिवली-ठाणे भुयारी (बोगदा) मार्गाच्या नॅशनल पार्कमधील जागेची पाहणी आज स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबर अधिकारी वर्गाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, नॅशनल पार्क परिसरातील पहिल्या टप्प्यातील साधारणपणे 400 ते 500 झोपड्या या मार्गामुळे बाधित होणार असल्याने स्थानिकांकडून नॅशनल पार्कमधील जागा पाहणीला विरोध करण्यात आला. बोरिवलीच्या नॅशनल पार्क परिसरात ज्या ठिकाणी या भुयारी मार्गाला सुरुवात होणार आहे येथील झोपड्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय या कामाला सुरुवात करू नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. मात्र, येथील झोपड्या या म्हाडा, एसआरए तसेच खाजगी जागेवर असल्यामुळे या सर्व यंत्रणांना एकत्रित बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी झोपडीधारकांना दिले. यामुळे झोपडीधारकांचा विरोध आता मावळला आहे. बोरिवली ठाणे हे दीड तासाचे अंतर भुयारी मार्गामुळे वीस मिनिटांवर येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच इंधन बचत देखील होणार आहे.

Chandrapur News : शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून सहलीसाठी नेत असताना ट्रॅक्टरचा अपघात

Chandrapur News : शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून सहलीसाठी नेत असताना ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने 13 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकाने वरिष्ठांची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. मूल तालुक्यातील मोरवाही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील या विद्यार्थ्यांना काल कन्हाळगाव येथे सहलीसाठी नेण्यात आलं होतं. मात्र, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने चिखली गावाजवळ अपघात झाला ज्यामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला. विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून सहलीसाठी नेणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra News Live Updates : दिशादर्शक फलकाला आदळून चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू तर दोन जखमी; फलक हटवण्याची मागणी

Maharashtra News Live Updates : नवी मुंबईतील एनआरआय जवळ असलेल्या नेरुळ जेट्टी मार्गावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या दिशादर्शक फलकाला सहा फ्लेमिंगो पक्षी आदळले असून यामुळे 4 फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला असून 2 जखमी आहेत. नेरुळ जेट्टी अद्याप वापरात नसून आजूबाजूला पाणथळ क्षेत्र असल्याने हजारो फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी येतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचा हा फ्लाईंग झोन असताना देखील सिडको मार्फत उभारण्यात आलेल्या नेरुळ जेट्टीचा दिशादर्शक फलक उंचीवर उभारण्यात आल्याने हा अपघात घडलाय. एकीकडे नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करायचे मात्र, दुसरीकडे फ्लेमिंगोच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करायचं अशी टीका पक्षी प्रेमी व्यक्त करत आहेत. या दुर्घटनेनंतर नेरुळ जेट्टीचा दिशादर्शक फलक तात्काळ काढण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.

Jalgaon News : विमुक्त जातीमधील अ प्रवर्गात अनेक खोटे जात वैधता प्रमाणपत्र

Jalgaon News : विमुक्त जातीमधील अ प्रवर्गात अनेक खोटे जात वैधता प्रमाणपत्र काही अधिकारी आणि लाभार्थी यांच्या संगनमताने मिळविले जात आहेत. त्याचा फटका मूळ गरजू लाभार्थ्यांना बसत असल्याने अशा प्रकारचे जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या आणि मिळविणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, त्यांचे दाखले रद्द करण्यात यावे आणि जात वैधता पडताळणी समिती राज्यभर नेमण्यात यावी या सगळ्याची एस आय टी चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी विमुक्त जातीमधील अ प्रवर्गातील गोर सेनेसह अनेक संघटनाच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील पहूर या ठिकाणी जळगाव औरंगाबाद रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी एक कार चालक आणि आंदोलक यांच्यामधे किरकोळ वाद झाल्यानंतर काही आंदोलकांनी वाद घालणाऱ्या कार चालकाची कार फोडल्याचं समोर आलं आहे. वेळीच काही कार्यकर्ते आणि पोलिस धावून आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. 

Ahmednagar News : अहमदनगरच्या साई मिडास टच कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Ahmednagar News : अहमदनगरच्या सावेडी भागातील साई मिडास टच या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत एचडीबी फायनान्स, स्वास्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी होम जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती कळताच अहमदनगर महापालिका आणि एमआयडीसी येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी हजर होत आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. आतापर्यंत अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. आग वाढण्यापूर्वीच स्वास्तिक होममध्ये असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अद्यापही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Akola News : अकोल्यातील ए-मार्ट' शॉपमधे चोरीची घटना; घटना शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये कैद

Maharashtra News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या ए-मार्ट' शॉपमधे आज पहाटे चारच्या सुमारास चोरीची घटना घडलीय. शटर वाकवून आत घुसून दोन चोरांनी गल्ल्यातील रक्कम चोरी केली आहे, ही घटना शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये. अवघ्या 16 मिनिटांत या चोरटयांनी गल्ल्यातील रकमेवर हात साफ केलाय. या प्रकरणी अधिक तपास अकोला शहर पोलीस करीत आहेत. चोरीची नेमकी रक्कम कळू शकली नाहीये.

Maharashtra News Live Updates : कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांची झुंबड; पेटी आणि शिष्यवृत्ती अर्जासाठी भररस्त्यावर रांगा

Maharashtra News Live Updates : कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांना शासनाच्या वतीनं मोफत किचन सेट आणि कामगार किट वाटप सुरू झालेलं आहे. त्याच्या अर्जासाठी भंडाऱ्याच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतायत. विशेष म्हणजे, हे कार्यालय भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या वर्दळीच्या राज्य मार्गावर असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अशात हे कामगार किट मिळविण्यासाठी लागणारा अर्ज प्राप्त करणे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र या कार्यालयात सादर करण्यासाठी अगदी सकाळपासून या कार्यालयात पोहोचत असल्यानं महिला आणि पुरुष कामगारांची कार्यालयासमोरील मार्गावर गर्दी बघायला मिळत आहे.

Maharashtra News : 70 वर्षांत जे मिळालं नाही ते कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी मुंबईत वकिलांशी चर्चा करणार : मनोज जरांगे

Maharashtra News : 70 वर्षांत जे मिळालं नाही ते कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी मुंबईत वकिलांशी चर्चा करणार असं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तसेच, इतर बाबींवरही संवाद होईल असंही ते म्हणाले. काही जणांना काही मिळालं नाही म्हणून जगभरात होत आहे. सुपारी घेऊन पक्षाला मोठे मानणारे स्वतःला शहाणे समजणारे माझ्यावर टीका करत आहेत. त्यांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी समाज एक झालेला आहे समाजाची नाराजी घेऊ नका तुम्हाला जड जाईल. छगन भुजबळांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, स्वतःला उच्च समजून गोरगरिबांना पायदळी तुडवण्याचा तो प्रयत्न करत आहे सामान्य ज्ञान ओबीसींचा तो अपमान करत आहे. खरंच ओबीसींचा नेता असेल तर त्यांनी न्हावी बांधवांची माफी मागावी असं जरांगे म्हणाले. प्रकाश शेंडगे यांच्या नवीन पक्षावर बोलताना जरांगे म्हणाले, चांगली गोष्ट लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे करायला पाहिजे.


 


 


 


 

Buldhana News : वैध सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उकळी येथील उद्धव मानवतकर या शेतकऱ्याने अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून मध्यरात्री स्वतःच्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्याने पोलिसांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात अवैध सावकारांची नावे लिहिली आहेत. या अवैध सावकाराने दोन दिवसांपूर्वी या शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि आठवडाभरात व्याजासकट घेतलेले कर्ज परत करण्याची तंबी दिली होती याला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोचले असून उत्तरीय तपासणीसाठी शेतकऱ्याचा मृतदेह मेहकर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.


 

 Pune News : राज्यात 11 फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहणार

Pune News : लागोपाठ येत असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे हवेच्या वरच्या थरांत वाऱ्याचा वेग ताशी 270 ते 300 किलोमीटर असल्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. 6 किंवा 7 फेब्रुवारीनंतर थंडीत वाढ होऊन ती 11 फेब्रुवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. आगामी तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे. 

Maharashtra News Live Updates : पुणे शहरातील काही भागांत गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra News Live Updates : पुण्यातील सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील पर्वती येथील पाण्याच्या टाकीचे विद्युत, पंप आणि स्थापत्य विषयीची कामे करायची असल्याने या भागांत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असंही सांगितलं आहे. 

Yavatmal News : आर्णीत अनोखी संक्रांत, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटीलच्या फोटोचं वाण

यवतमाळ : संक्रांतीचं वाण काय द्यावं? हा प्रश्न अनेक महिलांना दरवर्षीच पडतो. वाट्या, चमचे, प्लास्टिक वस्तू सोडून एक अनोखं वाण देण्याचा उपक्रम यवतमाळच्याआर्णी येथे अश्विनी यशवंत देशमुख ह्यांनी महिलांना मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेचे वाण देऊन अनोखा उपक्रम राबवला. मराठा अरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाने  मराठा आरक्षणाचा संघर्ष योध्दा म्हणून संपुर्ण देशात परिचीत झाले. मराठ्यांना एकत्र करून मराठा आरक्षण विचारांचे वाण हा कार्यक्रमपल्या निवासस्थळी आयोजित केला होता. यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि आरती करुन फोटोचे वाण देण्यात आले. यावेळी महिलागण मोठया संख्येने उपस्थीतीत होत्या.

Hingoli Truck Accident : कांद्याची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा 

हिंगोली : कांद्याची वाहतूक करणारा ट्रक हिंगोली परभणी महामार्गावरील हिवरा गावाच्या शिवारात पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज सकाळी साधारण मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास कांद्याची वाहतूक करणारा ट्रक हिंगोली परभणी रोडवरील हिवरा गावाच्या शिवारालगत असलेल्या एका पुलावर अचानकपणे पलटी झाल्यामुळे या रस्त्यावरून सुरू असणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे, जवळपास 6 तास हून आधिक काळ ही वाहतूक ठप्प झालेली आहे. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे एकाही वाहनाला या ठिकाणावरून पुढील प्रवास करणे शक्य नव्हतं परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळाला आहे. सकाळी झालेल्या अपघातामुळे शाळेला जाणारी शाळकरी विद्यार्थी ऑफिसला जाणारे नागरिक यांना बराच काळ या रस्त्यावर ताकत थांबावे लागले आहे, आता वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे

Maharashtra News : राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षाचे नेते आहे. आम्ही समाजासाठी काम करतो : बबनराव तायवाडे

Maharashtra News : राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षाचे नेते आहे. आम्ही समाजासाठी काम करतो. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा आहे. मात्र, यांच्या राजकीय भूमिकेबद्दल आमच्या भूमिकेचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत निर्णय घेतला जाईल. सध्या तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कोणतीही राजकीय मनीषा नाही असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे. आमच्या ओबीसी समाजात चार हजार वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यामुळे थोडी मतभिन्नता असली तरी एकी काय असल्याचे बबनराव तायवाडे म्हणाले. ओबीसी मधील अल्पसंख्यांक जातींना पुढे यायचं असेल तर त्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे. छगन भुजबळ यांनी कुठेही नाभिक समाजाचा अपमान केला नसल्याचेही तायवाडे म्हणाले. 

Kolhapur News : कोल्हापूर शहरात फाळकूट दादांची दहशत; भर चौकात आईस्क्रीम पार्लरच्या गाडीची तोडफोड

Kolhapur News : कोल्हापूर शहरात फाळकूट दादांची दहशत निर्माण झाली आहे. साई मंदिर परिसरात काठ्या आणि हॉकी स्टिक घेऊन दहशत निर्माण करण्यात आली आहे. भर चौकात आईस्क्रीम पार्लरच्या गाडीची तोडफोड करून दुचाकीचा इंडिकेटर लावण्याच्या कारणावरून तरुणाला केली मारहाण केली आहे. फाळकूट दादांनी दिसेल त्या गाडीवर काठ्या मारण्यास सुरुवात केली. या कारणावरून परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Maharashtra News : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात; लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी दुमदुमली

Maharashtra News : आज षटतिला एकादशी अर्थातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी दुमदमून गेली आहे. कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत महाराष्ट्रभरातून वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून टाळ मृदूंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने इथलं वातावरण भक्तीमय झालं आहे. 300 हून अधिक दिंड्या दाखल झाल्या असून भाविकांनी दर्शनासाठी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासमोर रांगा लावल्या आहेत. दरम्यान या सोहळ्याचे नियोजन करताना प्रशासनाने 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहावे, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्याने प्रशासन तसेच मंदिर संस्थांकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे. पालकमंत्री दादा भूसे यांच्या हस्ते पहाटे 4 वाजता विधिवत महापूजा करण्यात आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे.

Kolhapur News : लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे; अशा मागण्यांसाठी अनोखी सायकल फेरी

Kolhapur News : कोल्हापूर हे आंदोलनाचे शहर म्हणून ओळखलं जातं. या कोल्हापुरात अनेक मोठमोठे आंदोलन झालेत त्यामध्ये सरकार केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडले. मात्र, याच कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलन होतात जी देशभर गाजतात. त्याच कोल्हापुरात नुकतीच एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली ज्याची चर्चासुद्धा आता अख्ख्या कोल्हापुरात रंगली आहे. ही सायकल रॅली निघालीये कोल्हापुरातल्या खासबाग मैदान येथून प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत आणि या रॅलीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेले फलकांमुळे ज्यामध्ये लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच, पाहिजे मटण स्वस्थ झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे अशा अनेक मजेदार मागण्या घेऊन मंगळवार पेठेतल्या चिक्कूमंडळाचे हे गँग थेट प्रयाग चिखलीतल्या पंचगंगा नदीच्या संगमावरती पोहोचले. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली. एकीकडे मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश मात्र सर्वांच्याच भल्याचा होता तो म्हणजे नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळले पाहिजे आणि आपलं आरोग्यसुद्धा जपलं पाहिजे. कोल्हापूर शहरातील खासबाग ते मिरजकर तिकटी, बिनखांभी गणेश मंदिर, महाद्वार रोड करत रॅली शिवाजी पुलावरून मुख्य मार्गावरून प्रयाग चिखलीपर्यंत पोहोचली ही अनोखी सायकल रॅली पाहून अनेकांचे चेहरे अगदी बघण्यालायक झाल्याचं दिसून आलं. या रॅलीत अगदी आबालवृद्ध सहभागी झाले होते.

Maharashtra News : नागपुरात पोलीस उपनिरीक्षकांची गळफास लावून आत्महत्या; पोलीस वसाहतीतील घटना

Maharashtra News : नागपुरात पोलीस उपनिरीक्षकानी गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलीस वसाहतीत ही घटना घटना घडली आहे. दरम्यान, मानिसक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. 34 वर्षीय गोपाळ गोळे असं मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे अकोल्याचे निवासी होते. गोपाल गोळे मागील तीन दिवसांपासून ते कार्यरत असलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात सुद्धा गेले नव्हते. 

Buldhana News : ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई

Buldhana News : "मी ॲक्सिस बँकेतून बोलत आहे.... तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड द्या तुमचं अकाउंट अपडेट करायचे आहे...!" असं फोनवरून सांगून खामगाव येथील एका इसमाला दोन लाख चार हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. यात इंदूर येथील एका महिलेचा समावेश असून भोपाल येथील 22 वर्षीय युवकालाही अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात ही ऑनलाईन फसवणूक झाली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.


 

Maharashtra News Live Updates : नागपूर शहरात हत्येची मालिका सुरूच; पाच दिवसांत चार खुनांनी उपराजधानी हादरली

Maharashtra News Live Updates : उपराजधानी नागपूरची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे का?? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेल्या पाच दिवसांत नागपुरात हत्येच्या चार घटना घडल्या आहेत. वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत ऑरेंज नगरमध्ये काल एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याचे उघड झाले. शेख फिरोज उर्फ ​​पक्या असे मृतकाचे नाव आहे. परिसरातील वर्चस्वाबद्दल गुन्हेगारांमध्ये झालेल्या संघर्षातून हा खून झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Ahmednagar News : नाभिक समाजानं मराठा समाजावर बहिष्कार टाकावा : छगन भुजबळ

Ahmednagar News : अहमदनगरमधल्या मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं. नाभिक समाजानं मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं भुजबळ म्हणाले होते. यानंतर जातीजातीत तेढ निर्माण करत असल्याची टीका भुजबळांवर करण्यात आली. टीकेनंतर आता या वक्तव्यावरुन भुजबळांनी सारवासारव केलीय. मी एका गावाविषयी बोललो होतो असं भुजबळ म्हणालेत. 

Maharashtra News : उद्धव ठाकरे फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावर; गुहागर, दापोलीसह मंडणगड भागात करणार दौरा

Maharashtra News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते गुहागर, दापोलीसह मंडणगड भागात करणार दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं 'मिशन कोकण' सुरु होणार आहे. 

Pune News : जंगलातल्या नक्षलवादाला स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही

Maharashtra News Updates : जंगलातल्या नक्षलवादाला स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही. आदिवासी भागातील ग्रामीण तरुण नक्षलवादाकडे यायला तयार नाही. परिणामी नक्षलवाद्यांना नव्या भरतीची (रिक्रुटमेंट) अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवाद्यांनी आता मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लक्ष केंद्रित करत नक्षलवादासाठी नव्या भरतीची मोहीम सुरू केली आहे का?? पुण्यात संतोष शेलारने नुकतंच एटीएससमोर केलेले सरेंडर आणि पोलीस यंत्रणेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गोंदिया या पाच शहरातून नक्षलवाद्यांनी झोपडपट्ट्यांमधून तरुणांचे ब्रेन वॉश करत त्यांना नक्षलवादाकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. गरिबी, अशिक्षण, विविध शासकीय योजनांचे अपयश अशा मुद्द्यांवर तरुणांची माथी भडकवून त्यांना नक्षलवादाकडे ओढले जात असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलविरोधी अभियानाचे स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी दिली आहे. शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी युनिटने 32 संघटनांवर विशेष लक्ष ठेवणे सुरू केल्याचे ही पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यातील तरुणांनी नक्षलवाद्यांच्या या अपप्रचाराला बळी पडू नये आणि नक्षलवादाकडे जाऊ नये असे आव्हानही पोलिसांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधान सर्वोत्कृष्ट असून देशातील सर्व समस्या सोडवण्याची ताकद त्या संविधानामध्ये आहे. त्यामुळे तरुणांनी भारतीय संविधानावर विश्वास ठेवावं असे मतही पोलिसांनी व्यक्त केले आहे.

Nanded News : आम्हाला अटक करा! बँड लावत शेतकरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; नेमकं काय घडलं?

Maharashtra News : अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी वेळेत नेण्यात यावे, अशी मागणी घेऊन गेलेल्या ऊस उत्पादकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हटके आंदोलन करत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी वाजत-गाजत आणि कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात दाखल झाले. संतप्त शेतकरी आणि पोलिसांत शाब्दीक बाचाबाची झाली. तसेच, अटकेसाठी स्वत: शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्या होत्या. 

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांतही थंडीचा जोर कायम; 'या' राज्यांत पावसाची हजेरी

Maharashtra News Live Updates : सध्या सगळीकडेच थंडीचा जोर कायम आहे. उत्तर भारतातही थंडीची लाट कायम आहे. आज अनेक राज्यांमध्ये थंडीसह दाट धुक्याची शक्यता आहे. तर काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांतही थंडी वाढली आह. पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. मैदानी भागातील तापमानातही मोठी घट झाली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पहाटे धुक्यासह थंडी पडेल आणि दुपारी तापमानात वाढ होईल. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.