Maharashtra News LIVE Updates : महायुतीची बैठक संपली! अमित शाह यांची शिंदे-पवारांसोबत बंद दाराआड चर्चा; मविआ नेत्यांचीही बैठक अद्याप सुरुच

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2024 02:02 PM
Sanjay Raut : संजय राऊतांना पुन्हा दिलासा; दादा भुसे बदनामी खटला प्रकरणी पुढची सुनावणी 30 मार्चला होणार

Nashik News : मंत्री दादा भुसे बदनामी खटला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना पुन्हा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील पुढची सुनावणी 30 मार्चला होणार आहे.


-  मालेगाव न्यायालयाच्या निकालाविरोधात संजय राऊतांनी जिल्हा न्यायालयात केले होते अपील...

- विरोधी पक्षाकडून करण्यात आला लेखी युक्तीवाद...

- लेखी युक्तीवादाला उत्तर देण्यासाठी राऊतांच्या वकिलांनी मागीतली वेळ..

- जिल्हा न्यायालयाने मागणी केली मान्य..

- मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात यापूर्वी दुसऱ्या  वर्तमानपत्रात देखील अशा आशयाची बातमी छापून आली..

- त्यामुळे राऊत यांनी छापलेल्या बातमीमुळे बदनामी होऊ शकत नाही..वकिलांचा दावा

- कंपनी लॉ क्रिमिनलकडे देखील एक वाद प्रलंबीत आहे..

- त्यामुळे हा खटला चालूच शकत नाही..

- खा.राऊत यांचे वकील मधुकर काळे यांचा दावा..

- पुढच्या तारखेला म्हणणे ऐकण्याचे कोर्टाने केले मान्य
Beed Network Problem : मोबाईचे टॉवर नसल्याने ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्कार, सुरूर्डी ग्रामपंचायतीचा ठराव
Beed News : आष्टी तालुक्यातील सुरूर्डी येथे गेल्या वीस वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील कोणत्याचं कंपनीचे टॉवर परिसरात बसवण्यात आलेलं नाही, त्यामुळे गावात मोबाईलला रेंज नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तात्काळ टॉवर बसून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर, दुसरीकडे जोपर्यंत गावात मोबाईलला रेंज मिळत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे.
Chhagan Bhujbal Live : आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील : छगन भुजबळ

महायुतीत भाजप मोठा पक्ष आहे. चर्चा सुरु असून आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.


Amit Shah Meeting : शाहांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत वेगळी बैठक

Amit Shah Meeting : अमित शाहांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत वेगळी चर्चा केली. राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या जागा देण्यात येणार आहेत, यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शाहांनी चर्चा केली. त्यानंतर या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

Parbhani News : राष्ट्रवादी परभणी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली

Parbhani News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परभणी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, तेव्हा 38 हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता, तो पराभव हा वंचितच्या उमेदवारामुळे झाला होता. त्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला तब्बल दीड लाख मतं पडली होती. त्यामुळे, आत्ता महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी द्या, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीत करण्यात आली आहे.

Mahayuti Meeting : महायुतीची बैठक संपली! अमित शाह यांची शिंदे-पवारांसोबत बंद दाराआड चर्चा

Amit Shah, Eknath Shinde Ajit Pawar Meeting : महायुतीची बैठक संपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांसोबत बंद दाराआड चर्चा झाली. जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईतील बीकेसी येथे ही बैठक पार पडली.

Mahayuti Seat Sharing Formula : बीकेसीमध्ये शाह-शिंदे-पवार यांच्यात बैठक

Mahayuti Seat Sharing Formula : बीकेसी जिओ वर्ल्ड सेंटरमधे अमित शाह, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यात बीकेसी येथे बैठक सुरू आहे. बंद दाराआड जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mahayuti Seat Sharing Formula : महायुतीच्या जागावाटपावर अमित शाहांची बैठक

Lok Sabha Election : महायुतीच्या जागावाटपावर अमित शाह यांची मुंबईत बैठक सुरु आहे. अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणिस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक सुरु आहे.

MVA Meeting Start : महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात

MVA Meeting Start : महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात


 उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात यांच्यासह संजय राऊत जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख उपस्थित आहेत


 प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं असून अद्याप  प्रकाश आंबेडकर या बैठकीला पोहोचलेले नाहीत


 मात्र त्याआधी   महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये बैठक होत असून  काही महत्त्वाच्या आणि अडचणीच्या ठरणाऱ्या जागांवर वरिष्ठ नेत्यांच्या समवेत अंतिम चर्चा केली जात आहे

Raj Thackeray : राज ठाकरे वर्सोवात, जेसीबीवरून केली जाणार पुष्पवृष्टी

Raj Thackeray in Varsova : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकसभा मतदार संघातील पाहणी आढावा दौऱ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सुरुवात केली पाहणी आढाव्या दौऱ्याचा हा त्यांचा आजचा दुसरा दिवस असून मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आज आढावा घेणार आहेत. जुहू चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते आजच्या या दौऱ्याची सुरुवात केले असून त्यानंतर अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव, जोगेश्वरी, दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या मतदारसंघात जाऊन विधानसभा निहाय आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. या आढावा बैठकीदरम्यान ते विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष आणि उपशाखा अध्यक्ष यांच्याशी संवाद साधून मतदार संघातील मनसेची नेमकी स्थिती काय आहे याबाबत अहवाल मागवणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मनसेकडून शालिनी ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांना सव्वा लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती.

Navi Mumbai Anita Shetty in BJP : माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी मुंबई : माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश


भाजपचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश


अनिता शेट्टीचा काँग्रेसला रामराम


अनिता शेट्टी नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका


माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या अनिता शेट्टी पत्नी

Lok Sabha Election 2024 : अभयसिंह जगताप शरद पवारांच्या भेटीला

Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघ इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर अभयसिंह जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, माढा लोकसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळेच या शरद पवारांची भेट घेतली. लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. महादेव जानकर यांचा विचार जरी होत असला जर ते महाविकास आघाडी कडून उभे राहणार नसतील तर माझ्या उमेदवारीचा विचार व्हावा असं मी शरद पवारांना सांगितला आहे. मी या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघ फिरलो आहे शरद पवार यांना दिली आहे पदाधिकाऱ्यांसोबत आता आम्ही चर्चा केली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय शरद पवार घेतील, असं ही त्यांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी

Maratha Reservation Hearing : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी


डॉ. जयश्री पाटील यांनी 10 टक्के मराठा आरक्षणाला विरोध करत दाखल केलीय दिवाणी रिट याचिका


गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीनं न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठापुढे आज याचिका तातडीच्या सुनावणीसाठी सादर करण्यात आली


विनोद पाटील यांच्यावतीनं मराठा आरक्षणाला समर्थन देत दाखल करण्यात आलंय कॅवेट


तर हे आरक्षण कोर्टात टिकेल, राज्य सरकारचा दावा

Santosh Bangar : पिकविमा प्रश्नावरून आमदार संतोष बांगर आक्रमक

Higoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर या काळात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत होते पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करून सुद्धा पिक विमा मिळत नसल्याने आज आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी अधीक्षकांना पिक विमा प्रश्नावरून चांगलेच धारेवर धरले होते. जर पुढील चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर, माझ्या एवढं वाईट कोणी नाही असा सज्जड दम यावेळी आमदार बांगर यांनी कृषी अध्यक्ष यांना दिला आहे चार दिवसात पैसे मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आक्रमक होईल असा इशारा आमदार बांगर यांनी यावेळी दिला आहे .

MVA Meeting : महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची वरळीतील फोर सिझन हॉटेलला दुपारी एक वाजता बैठक होणार आहे


या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील संजय राऊत अनिल देशमुख सुद्धा उपस्थित राहणार आहेत


 प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा बैठकीचा निमंत्रण दिलं असल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची माहिती


मात्र प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार का? हे पाहावं लागणार आहे कारण वंचित बहुजन आघाडी संदर्भातच आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे

SSC Board Exam News : बोर्डाचे पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार

कोल्हापूर : बोर्डाचे पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार


निकाल लांबण्याची भीती


अंशतः अनुदानित शिक्षकांनी आपल्या मागण्यासाठी टाकला बहिष्कार


दहावी बारावीचे पेपर तापसणीवर बहिष्कार


शासन अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा


 

Supriya Sule : बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी केले जनता दरबाराचे आयोजन

Baramati News : बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष  कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी बारामती शहरी आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांची जनता दरबाराला हजेरी लावली.  या आधी फक्त अजित पवार बारामतीत जनता दरबार घ्यायचे केंद्राची कामे सुप्रिया सुळे सोडवत असत. परंतु पक्षात फूट पडली आणि सुप्रिया सुळे देखील बारामतीत जनता दरबार घेऊ लागला आहेत.


 
Wardha Crime News : पिस्तुलचा धाक दाखवून दहशत निर्माण करत असलेल्या आरोपीला अटक 

Wardha Crime News : वर्ध्यामध्ये तारफैल परिसरात गावठी पिस्टलचा धाक दाखवून दहशत निर्माण करत असलेल्या आरोपीस शिताफीने अटक करण्यात आली. पोलिसांनी पंधरा गुन्हे दाखल आणि दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या आरोपीसह सहकाऱ्याला अटक केली. दोन गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅक्झिनसह दहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेन ही कारवाई केली.


 
Sangli Turmeric Price : सांगलीत हळदीला क्विंटलला  ४१ हजार १०१ रूपयांचा मिळाला सर्वोच्च  दर 
Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत  हळदीला क्विंटलला 41 हजार 101 रूपयांचा  दर  सौद्यामध्ये मिळाला. सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासात हा सर्वोच्च दर मिळाला आहे. सध्या नवीन हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रामुख्याने राजापुरी हळदीची आवक आहे. विजयकुमार आमगोंडा पाटील मजलेकर यांच्या अडत दुकानामध्ये काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील सायबान भूपती पुजारी  या शेतकर्‍यांच्या हळदीला 41 हजार 101 रूपये प्रति क्विंटलने मागणी झाली. श्रीकृष्ण कार्पोरेशनने ही हळद उच्चाकी दराने खरेदी केली. सांगली बाजारात विक्रीसाठी  12  हजार  900 क्विंटल हळदीची आवक झाली असून आतापर्यंत 9 लाख 7114 क्विंटल आवक झाली आहे.  सौद्यामध्ये हळदीला किमान 12 हजार 900 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून प्रतवारीनुसार सरासरी दर  27  हजार रूपये आहे. यंदा हळदीला दर चांगला मिळत असून उच्चाकी दराचा फायदा हळद उत्पादक शेतकर्‍यांना होत आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील सर्वात मोठी कारवाई, आंबोलीतील 27 अनाधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त

Sindhudurg News : सिंधुदुर्गात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आंबोलीत करण्यातआली आहे. आंबोलीतील 27 अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. आंबोली येथील कबुलायतदार जमिनीत बाहेरच्या लोकांनी अतिक्रमण करून बांधलेल्या 27 इमारती महसूल आणि वन विभागाने संयुक्त कारवाई करीत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. या इमारती हटवाव्यात म्हणून आंबोली ग्रामस्थांनी गेले 21 दिवस लाक्षणिक उपोषण केले होते, त्यांच्या उपोषणाला यश आले आहे.

Solapur Accident : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात

Solapur News : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद


सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर जवळ विचित्र अपघात


भरधाव बोलेरो वाहनाची सुरक्षाकठड्याला धडक, मंगळवारी सकाळच्या दरम्यान  घडली घटना


वाहनाच्या धडकेत कामाला जाण्यासाठी निघालेला दीपक माने हा युवक जागीच ठार तर दोन जण जखमी


सदर घटनेत वाहन चालक ही गंभीर स्वरूपात जखमी 


अपघाताची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

RFO Strike : फॉरेस्ट रेंजर अधिकाऱ्यांनी 11 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन

Nagpur News : फॉरेस्ट रेंजर ऑफिसरने वन्यजीव यांच्या सुरक्षेला महत्व द्यायचे? की मनरेगा योजना राबवण्याला प्राधान्य द्यायचे? असे प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या बळजबरीला कंटाळून फॉरेस्ट रेंजर अधिकाऱ्यांनी 11 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. या आधीच फॉरेस्ट रेंजर असोसिएशन ने मनरेगा अभिसरण योजने संदर्भात राज्य सरकारला काही सूचना सुचवल्या होत्या. मात्र  राज्य सरकारने त्यांच्या सूचनांना विचार न घेतल्याने या विरोधात वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांनी 11 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक दिलीय.

Vidarbhvadi in Lok Sabha 2024 : विदर्भवादी संघटनाही उतरणार लोकसभेच्या मैदानात, विदर्भातील 10 लोकसभेच्या जागा विदर्भवादी लढवणार

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विदर्भवादी संघटनाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या विदर्भवादी संघटनांना एकत्रित करुन विदर्भात तिसरी आघाडी तयार होतेय. विदर्भवादी विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. यांच्या जाहीरनाम्यात वेगळा विदर्भ हा विषय असणार आहे. त्यांना आपल्या आघाडीमध्ये सहभागी करणार असल्याची माहिती जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार यांनी दिली आहे..

Nagpur MNS Todfod : मनसे कार्यकर्त्यांची मनपा कार्यालयात तोडफोड

Nagpur News : नागरी समस्या आणि मराठी पाट्यांच्या विषयावर मनपा अधिकारी वेळ मागूनही वेळ देत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयात तोडफोड केली. मनपाच्या आशीनगर झोन कार्यालयातील सह आयुक्त यांना पत्र देऊन देखील वेळ देत नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्याची तोडफोड केली. तोडफोड प्रकरणी शाखा अध्यक्ष सुबोध गडपायले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस उद्या पालघर दौऱ्यावर

Governor Ramesh Bais : राज्याचे राज्यपाल रमेश बैस उद्या पालघर जिल्हा दौऱ्यावर असून ते खोमारपाडा या गावाला भेट देणार आहेत

Yeola Crop Fire : येवल्यात उसाला लागली आग 6 एकर ऊस जळून खाक

Nashik News : वीज मंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका नाशिकच्या येवला येथील एका शेतकऱ्याला बसला असून विद्युत तारा शेतात पडल्यामुळे तब्बल 6 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे वेगाने आग पसरत गेली आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Nashik News : कत्तलीसाठी नेणाऱ्या 27 गोवंश जनावरांना जीवनदान

Nashik News : नाशिकच्या निफाड येथून धरणगाव वीर मार्गे गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती बजरंग दल आणि गोरक्षकांना मिळताच लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील धरणगाव वीर येथील चौफुलीवर सहा वाहने अडवून तपासणी केली. या वाहनात 27 गोवंश जातीची जनावरे बांधलेली, जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. लासलगाव पोलिसांनी वाहन चालकांकडे जनावरांच्या खरेदी विक्रीची आणि वाहनाची कागदपत्रे मागितली असता आढळून न आल्याने पोलिसांनी 27 गोवंश आणि 6 वाहने, असा एकूण 18 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकारणी लासलगाव पोलीस ठाण्यात 7 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी गोवंश जनावरांवर उपचार करून जनावरे गोशाळेत पाठवण्यात आली.

Advay Hiray News Update : अद्वय हिरेंच्या जामिनावर आज सुनावणी

Malegaon News : रेणुका सुत गिरणी कर्ज आणि जिल्हा बँकेच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कस्टडीत असलेले शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या जामिनावर आज मालेगाव सेशन कोर्ट येथे सुनावणी होणार आहे. अद्वय हिरे यांनी जामिनासाठी यापुर्वी मालेगाव सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 4 मार्चला सुनावणी होणार होती, मात्र पोलिसांचा जबाब न आल्याने तसेच पोलीस तपासी अधिकारीच कोर्टात हजर न राहिल्याने ती सुनावणी आज ( 6 फेब्रुवारी ) पार पडणार आहे. आजच्या सुनावणीत अद्वय हिरे यांना जामीन मिळतो की पून्हा कस्टडीत वाढ होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

CM Eknathn Shinde Hingoli Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

Hingoli News : गेल्या अनेक दिवसापासून सतत लांबणीवर पडत असलेला शासन आपला दारी हा कार्यक्रम अखेर 10 मार्चला घेण्याचा ठरलं आहे. या कार्यक्रमासाठी रामलीला मैदान हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाने आज रामलीला मैदानाची पाहणी केली आहे आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्री उपस्थित राहणार असून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेले पंधरा ते वीस हजार लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमासाठी 300 ते 400 बसेसची व्यवस्था केली जाणार असून वाढते तापमान लक्षात घेता टेंटची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.

PM Modi Under Water Metro Inauguration : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोलकात्यात अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन

PM Modi Kolkata Visit : पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोलकात्यात अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:15 वाजता पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.