Maharashtra News LIVE Updates : कारागृहासमोरच डीजेच्या कर्णकर्कश आवाजात बेधुंद नाच; पोलिसांचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मोसीन शेख Last Updated: 31 Mar 2024 10:33 AM

पार्श्वभूमी

Maharashtra LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये......More

धाराशिव मतदारसंघातून सुरेश बिराजदारांना उमेदवारी देण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

Dharashiv Lok Sabha Constituency : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेश बिराजदार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. या पत्रात धराधिव जिल्ह्याचे सर्व तालुकप्रमुख आणि विधानसभा अध्यक्षांकडून सही या पत्रात करण्यात आली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्ह्यातील सारे प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे की, सुरेश बिराजदार यांना उमेदवारी देण्यात यावी.