Maharashtra News LIVE Updates: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी मुसक्या बांधून कोल्हापूरात आणलं, कोर्टात सुनावणीला सुरुवात

Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मुकेश चव्हाण Last Updated: 25 Mar 2025 06:31 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकराला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे....More

मुंबई मध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मुंबई मध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मनसे मुंबई शहरात आक्रमक झालेली असताना भाजप ने ही मुंबई उपनगरात या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. घाटकोपर च्या एमजी रोड वर दोन दिवसांपूर्वी एक दुकानदाराला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली होती.या दुकानदाराची आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी या रस्त्यावर फेरफटका मारीत पालिका आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. हा मार्ग घाटकोपर चा महत्त्वाचा रस्ता असताना ही इथे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे, तसेच मोठ्या प्रमाणांत दादागिरी ही वाढली आहे. इथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी फेरीवाले मुंबईत असून नशेचा व्यवसाय ही सुरू आहे. या बाबत मोहीम सुरू केली असून हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे किरीट सोमय्या या वेळी म्हणाले.