Maharashtra News LIVE Updates : जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, त्यात मनोज जरागेंनी राजकीय पक्षांची धाकधूक वाढवली

Maharashtra LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर....

मोसीन शेख Last Updated: 24 Mar 2024 03:48 PM
मोठी बातमी : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता?

मोठी बातमी : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता?


https://marathi.abplive.com/news/politics/bachchu-kadu-on-mahayuti-possibility-of-bachchu-kadu-will-getting-out-from-mahayuti-alliance-maharashtra-politics-eknath-shinde-devendra-fadnavis-marathi-news-1267415

Pankaja Munde : काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करू नका; पंकजा मुंडेंचा पोलिसांना पत्र

Pankaja Munde :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असतानाच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. पंकजा मुंडे यांचा ताफा जात असतांना काही तरुणांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत पाज जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, याबाबत पंकजा मुंडे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना पत्र लिहून या मुलांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी विनंती केली आहे. 

Pankaja Munde : काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करू नका; पंकजा मुंडेंचा पोलिसांना पत्र

Pankaja Munde :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असतानाच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. पंकजा मुंडे यांचा ताफा जात असतांना काही तरुणांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत पाज जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, याबाबत पंकजा मुंडे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना पत्र लिहून या मुलांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी विनंती केली आहे. 

Pankaja Munde : मनोज जरांगेंची लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका योग्यचं: पंकजा मुंडे

Pankaja Munde On Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांनी बोलवलेल्या बैठकीत मराठा समाजातून एक अप्स्कः उमेदवार उभा करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय योग्यच असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. अत्यंत साध्या पनातून उभा राहिलेल्या आंदोलन आणि त्यातून मनोज जरंगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतहार्य असून, यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही हे सांगितले होते. ते आज पुन्हा सिद्ध झाले, शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु, अजित पवारांच्या बंगल्यावर बैठक; जागावाटपावर चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या उपस्थित बैठक होत आहे. बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी पाहायला मिळत आहे.  काल झालेल्या अमित शाह यांच्या बैठकीतील विषयावर आज पक्षातील नेते चर्चा करतील आणि अंतिम निर्णय घेतील.  सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत. 

सोलापुरात भाजपला मोठा धक्का, माजी आमदाराच्या भावाचा ठाकरे गटात प्रवेश...

Solapur : ऐन लोकसभा निवडणुकीत सोलापुरातील माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील यांच्या बंधुने ठाकरे गटात प्रवेश केलाय. भाजपचे प्रशांत पाटील यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. "मागील 10 वर्षापासून आम्ही भाजपासाठी काम करतोय, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवलेले आहे." अशी प्रतिक्रिया प्रशांत पाटील बिराजदार यांनी ठाकरे गटात प्रवेश करताना दिली.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत यशवंत सेना 15 जागांवर निवडणूक लढवणार

Lok Sabha Election 2024 : यशवंत सेना राज्यातील 15 जागांवर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करणार आहेत. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत यशवंत सेनेकडून (Yashwant Sena) याबाबत घोषणा करण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी अहमदनगरच्या चौंडीत यशवंत सेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. अद्याप राज्यात लोकसभेत धनगर समाजाच्या एकालाही उमेदवारी न दिल्याने यशवंत सेना आक्रमक झाली असून, यशवंत सेना राज्यातील 15 जागांवर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करणार आहेत. 

Lok Sabha Election: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोळेंना काँग्रेसची उमेदवारी

Lok Sabha Election Update : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी रात्री उशिरा जाहीर झाली. यात भंडारा येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे ते सुपुत्र आहेत. युक्रेन इथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं असून, कोरोना काळात त्यांनी रुग्णसेवा करीत एक महत्त्वाचं योगदान दिलं. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभा होत असल्यानं मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.

Ravindra Dhangekar: उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिल्यांदाच रवींद्र धंगेकर शरद पवारांच्या भेटीला

Pune Lok Sabha Constituency : पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज पुन्हा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. यावेळी मोहन जोशी आणि इतर काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे पुणे लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा धंगेकर शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. 

Nitesh Karale : नितेश कराळे पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

Lok Sabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघातून (Wardha Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी आज पुन्हा शरद पवारांची भेट घेतली आहे. मागील आठवड्यात देखील कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी मागच्या आठवड्यात दिली होती. त्यामुळे आजच्या भेटीत काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

Holi Festival: अमरावतीत युवतींनी केली सरकारच्या धोरणांची होळी

Amravati Holi News : होळी सणाच्या (Holi Festival) पार्श्वभूमीवर अमरावतीतील (Amravati) मोझरी येथील युवती संवादच्या कार्यक्रमात महिला भगिनींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी केली. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही होळी पेटवण्यात आली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचारांच्या तोफा धडधडत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या मनातील भावना काँग्रेसच्या युवतीनी व्यक्त केल्या. यावेळी महिलांनी होळीमध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचारांच्या, संविधान रक्षणासाठी सतत जागृत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केला. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमधील जागावाटपावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाची धाकधूक वाढली आहे. मनोज जरांगे यांच्याकडून आज कोणती घोषणा होती आणि त्याचे राजकीय पडसाद कसे उमटतात हे पाहणे महत्वाचे आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.