Maharashtra News LIVE Updates : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; वरळीच्या जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा
दहीहंडीनंतर आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून वरळीच्या जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन
भाजपकडून वरळीत ठाकरे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी सुरु
विटी-दांडू, लगोरी, लेझिम, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव, पंजा लढवणे व ढोलताशा अशा १६ देशी खेळांचे आयोजन
मंत्री लोढांकडून 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभा'चे आयोजन
२६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील विविध मैदानावर होणार स्पर्धा
२ लाखांपेक्षा जास्त खेळाडूंकडून स्पर्धांसाठी नोंदणी
स्पर्धांची सुरुवात आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून करणार
Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या माना येथे प्रियकराने केली विवाहीत प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची घटना काल घडलीय. शोभना गजानन लांडे असं मृत महिलेचं नाव आहेय. तर अनिल तायडे असं आरोपीचे नाव आहेय. या घटनेनंतर आरोपीने स्वत:वर वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. जखमी प्रियकरावर अकोल्यात उपचार सुरूयेत. याप्रकरणी आरोपी अनिल तायडेविरोधात माना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
NCP Political Crisis : राष्ट्रवादी आमदार प्रकरणी आज पुन्हा सुनावणी
आज शरद पवार गटातील जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची होणार फेरसाक्ष
जयंत पाटील यांच्यानंतर अमोल कोल्हे यांची होणार फेरसाक्ष
Mumbai News: उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची महत्वपूर्ण बैठक
उद्याच्या महाविकास आघाडी बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार
या बैठकीत काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल.
आतापर्यंत 30 जागांचं वाटप झालंय, त्यात जो पक्ष जागा जिंकून येतो ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला
उरलेल्या 18 जागांवर चर्चा अपेक्षित
ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला, तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता
Manoj Jarange : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत.. आज त्यांच्या यात्रेचा पाचवा दिवस आहे. 26 जानेवारीला ही यात्रा मुंबईत दाखल होईल. आम्ही मुंबई बंद करण्यासाठी निघालो नसल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय. तर वाहन बंदीच्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीये.
Saamana Editorial on Bharat Jodo Nyay Yatra : मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) अनेक ठिकाणी भाजपकडून (BJP) विरोध होताना दिसतोय. आसामध्ये (Asam) राहुल गांधींना आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. यावरुन बराच वादही झाला. याच वादावर सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) सरकारचा समाचार घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ने पहिल्या दहा दिवसांतच भाजपच्या तंबूत घबराट निर्माण केली आहे. त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या यात्रेवरील मार्गात आसाममधील भाजप सरकारकडून दररोज काटे पेरण्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला.
Manoj Jarange Yatra: मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. ही आरक्षण यात्रा आज खराडी बायपासवरुन निघून तळेगावमार्गे लोणावळा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि याच ठिकाणी मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे. दरम्यान अवघ्या दोन दिवसात जरांगे मुंबईत पोहोचणार असून सरकार हे आंदोलन कसे हाताळेे याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस निर्णय आला नसल्याने आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय.
Aditi Tatkare: प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हात मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री नको म्हणून शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केला होता. मात्र अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री नसल्या तरी यंदा प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण त्याच करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे उदय सामंत हे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत.
Ayodhya Ram Mandir Rush: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीरामाच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि आजही अयोध्येत रामभक्तांची गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. मंदिर खुलं होण्याआधीच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडीत भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. दर्शनासाठी मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी रामाचं दर्शन घेतलं. काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण झाली होती. भाविकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागली. दरम्यान गर्दीचं योग्य नियोजन न केल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले होते. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 8 हजार अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय. तर लखनौमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्यात.
Rohit Pawar ED Inqury : आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलीए.. शिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय
Amravati News: अमरावती : डॉ. मिलिंद बारहाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी, विद्यापीठाचे नववे कुलगुरू म्हणून स्वीकारणार पदभार
राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत - यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत - करण्यात आली आहे
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक
Rohan Bopanna & Matt Ebden: मुंबई : भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्नानं इतिहास रचला आहे. रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल गाठली आहे. 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. रोहन आणि मॅटनं आपल्या या विजयासोबतच आणखी एक विक्रम रचला आहे. रोहन आणि मॅट मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -