Maharashtra News LIVE Updates : अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Dhule News : हिंदू संस्कृतीत महत्त्वाच्या समजल्या जाणार्या सणांपैकी एक होलिकोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीसाठी लागणार्या विविध साहित्याने बाजारपेठ सजू लागली आहे. डोलचीसह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकार्या आणि रंग बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मुखवटेही विक्रीसाठी आले आहेत.
धुळे जिल्हा हा त्याच्या अनोख्या पद्धतीने होळी खेळण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची हा चर्चेचा विषय असतो. डोलची म्हणजे पत्र्यापासून तयार केलेलं भांडं असतं. होळी खेळताना यात पाणी भरुन एकमेकांच्या पाठीवर वार करतात. पाण्याचा सपासप वार उघड्या शरीरावर बसल्याने अंगाची लाहीलाही होते. परंतु, खेळणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी होत नाही, उलट दुप्पट उत्साहाने ते एकमेकांवर डोलचीमध्ये पाणी उडवतात. धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला डोलचीचा वापर करुन पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात. पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही डोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे
पंकजा मुंडे दोन दिवसापासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सकाळीच नारायणगड येथे जाऊन नगर नारायणाचे दर्शन घेतलं यावेळी प्रीतम मुंडे देखील त्यांच्यासोबत होत्या.. राजकीय नेत्यांकडून सध्या विकासकेंद्रीत राजकारणाची अपेक्षा आहे गेल्या काही दिवसापासून विकासाचे मुद्दे नाही तर जातीय मुद्द्यावर जास्त चर्चा होत आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.. राजकारणामध्ये सोशल इंजिनिअरिंग महत्त्वाचं असतं आणि याच सोशल इंजिनिअरिंगचा आशीर्वाद मला मुंडे साहेबांनी दिला आहे निवडणुकीमध्ये आम्ही फक्त गप्पा मारणार नाहीत तर विकास करून दाखव असं म्हणत एकाच वेळी रेल्वेसाठी 4 हजार 800 कोटी रुपये मिळवून दिले तर नितीन गडकरी यांनी देखील बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे तयार केले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामाची गती प्रचंड वाढलेली आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत तर प्रीतम मुंडे ने देखील आता पंकजा मुंडे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली असून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत
बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा आज इंदापूर शहरांमध्ये बाजार समितीच्या आवारात भव्य मेळावा होत असून या मेळाव्याला शरद पवार, मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, याबरोबर आप आणि इतर घटक पक्षाचे देखील सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली असून शरद पवार इंदापूरकरांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. रोहित पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार, सक्षणा सलगर देखील यावेळी उपस्थित आहेत.
अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवेल असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तसेच राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार असून त्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भाजप केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये बोलावलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमरावतीत आज दुपारी 3 वाजता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा...
अमरावती लोकसभेसाठी माविआतुन काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर असून ठाकरे गट आपल्या उमेदवारीवर ठाम..
अमरावती लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी.
काँग्रेस कडून बळवंत वानखडे यांची उमेदवारी घोषित
अनेक वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे...
नवी दिल्लीत आज संध्याकाळी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महायुतीतला जागावाटपाचा तिढा आज सुटेल अशी चिन्ह आहेत.या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचा जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले असून ते केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. राज्यात महायुतीच्या तीन ते चार जागांवरून तिढा असल्याने अद्याप जागावाटप जाहीर झालं नाही.
- सोलापुरातील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल.
- आपचे शहराध्यक्ष निहाल किरनल्ली, युवा आघाडी अध्यक्ष निलेश संगेपागसह इतर 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना ईडीने अटक केल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.
- आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने आचारसंहिता लागू असताना जमावबंदीचा भंग केल्याने करण्यात आले गुन्हे दाखल
- सदर बझार पोलीस ठाण्यात कलम 37 आणि 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.
Pune News : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठीचा विकास निधी पर्वती विधानसभा मतदारसंघात वळवण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करताना मुंबई उच्च न्यायालयाने कसब्याला तातडीने विका निधी देण्याचे शुक्रवारी आदेश दिलेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचा दहा कोटींचा निधी शेजारच्या पर्वती मतदारसंघात वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील वर्षी घेतला होता. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कसब्याता कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार आहेत तर पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ आमदार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढावी अशा सूचना पक्षश्रेष्ठीनी नाना पटोले यांना दिल्या आहेत. मात्र नाना पटोले यांच्या उपस्थितीत साकोली येथे पार पडलेल्या बैठकीत नाना पटोले यांनी स्वतः निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिले. यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनीच लोकसभा निवडणूक लढून काँग्रेस पक्ष मजबूत करावा अशी मागणी केली. नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले की, उमेदवार काँग्रेस पक्षाचाच असेल, त्याला निवडून आणणे हे आमचे लक्ष आहे.
यावर कार्यकर्ते नाराज झाले असून गोंदिया जिल्ह्यातील सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठकरेले यांनी नाना पटोले यांना पत्र पाठवले आहे. एकतर तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक लढवावी नाहीतर माझा सहसचिव पदाचा राजीनामा स्वीकार करावा अशी मागणी पत्रातून केली आहे.
शिवानी वडेट्टीवार यांना चंद्रपूरची तिकीट मिळावी, यासाठी विजय वडेट्टीवार देखील शिवानी वडेट्टीवार यांच्या सोबत दिल्लीत तळ ठोकून आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -