Maharashtra News LIVE Updates : अरविंद केजरीवालांना 10 दिवसांची ईडी कोठडी, कोर्टाचा निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2024 07:39 PM
Nashik : सिटीलिंक बस वाहकांचा संप अखेर मागे

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला सिटी लिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. ३१ मार्च पर्यंत थकीत वेतन अदा केले जाणार असल्याचं सिटीलिंक प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.  

Arwind Kejriwal : अरविंद केजरीवालांना ईडी कोठडी

Arwind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलीये. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित

बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या जागांवर शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवली जाणार, अशी माहिती मिळत आहे. या नऊ संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  


जागा आणि संभाव्य उमेदवार 


बारामती - सुप्रिया सुळे 
माढा - महादेव जानकर (रासप) 
सातारा - बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील 
शिरुर - अमोल कोल्हे
नगर दक्षिण - निलेश लंके 
बीड - बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे 
वर्धा - अमर काळे

शरद पवार गट निवडणूक आयोगात तक्रार दाखल करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगात तक्रार दाखल केली जाणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून अजूनही घड्याळ चिन्ह वापरलं जात असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वापरत आहेत अस लिहिलं जात नसल्याने तक्रार करण्यात येणार आहे. तक्रार दाखल करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड दिल्लीत पोहोचले आहेत. 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार चिन्ह वापरताना सूचना लिहिण्याचे निर्देश दिले होते. त्याचे पालन केल जात नसल्याने आव्हाड यांच्याकडून तक्रार करण्यात येणार आहे. 

इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी अतिरिक्त  मुंबई महापालिका (प्रकल्प) पी वेलरासू यांची नियुक्ती सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकरोड रेल्वेस्टेशन जवळ गोदान एक्स्प्रेसच्या मागील बोगीला आग

नाशिकरोड रेल्वेस्टेशन जवळ गोदान एक्स्प्रेसच्या मागील बोगीला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईहून गोरखपूरकडे ही गोदान एक्स्प्रेस जात होती. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची धावपळ उडाली. बाकी डब्यांपासून बोगी बाजूला करत अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 

साहेब जे बोलतात, नेहमी त्याच्या विरुद्ध घडते असा इतिहास, अमोल मिटकरींचा शरद पवारांना टोला

आमच्या पक्षात आणखी इनकमिंग होईल, तुम्हाला आणखी काही नेते आमच्याकडे येत असल्याचे दिसतील, दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत येणार, असे संकेत शरद पवार यांनी दिले. यावर आमदार अमोल मिटकरींनी शुभेच्छा देत म्हटले की साहेब 'जे' बोलतात नेहमी त्याच्या विरुद्ध घडत असतं, असा आजवरचा इतिहास राहिलाय, असा टोला अमोल मिटकरींनी शरद पवारांना लगावला आहे. 

संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार


पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी


राऊत यांनी मोदींची तुलना औरंगझेबाशी करून एका मोठ्या समाजाच्या धार्मित भावना दुखावल्याचा आरोप


तसेच संजय राऊत हे समाजात जातीय तेढ निर्माण करू पाहत असल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी


मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांची तक्रार

इडीने अरविंद केजरीवाल यांना मागितली 10 दिवसांची कोठडी

इडीने अरविंद केजरीवाल यांची १० दिवसांची कोठडी मागितली


राऊज एवेन्यू न्यायालयात ED चा युक्तीवाद


पंचनामा करून अरविंद केजरीवाल यांना अटक


अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची माहिती नातेवाईकांना दिली आहे


कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अरविंद केजरीवाल यांना अटक


दिल्ली दारू घोटाळ्याचे अरविंद केजरीवाल सुत्रधार


त्यांच्याच नेतृ्त्वात दिल्लीचे दारू धोरण तयार करण्यात आलं


अरविंद केजरीवाल यांनी खास लोकांना मदत केली…


याचं प्रकरणात मनिष सिसोदिया यांना अटक केली


गोवा निवडणूकीत दिल्ली दारू घोटाळ्याचा पैसा वापरण्यात आला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 27 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 27 मार्च रोजी म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेस पक्षांना अजूनही त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र शक्यता आहे की विकास ठाकरे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल. काँग्रेसचा उमेदवार नितीन गडकरी यांच्या एक दिवस आधी म्हणजे 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

प्रवीण परदेशींनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, धाराशिवच्या जागेसाठी इच्छुक

प्रवीण परदेशी यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 


प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी आहेत इच्छुक

वेळ पडली तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्यास तयार : विजय शिवतारे

विजय शिवतारे
* मी निवडणूक लढण्यावर ठाम. 
* शंभुराजे देसाईंना मी माझी भुमिका सांगितलीय.  त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालायच ठरवलय. 
* मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगितले मात्र त्यांनी महायुतीत ही जागा अजित पवारांना सुटल्याचे सांगितले.
* सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत , त्यामुळे महायुतीचे नुकसान होण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्य बाणावर  निवडणूक जिंकून दाखवेन. 
*  वेळ पडली तर भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्यास तयार. 
* माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली तरी मी निवडणूक लढविणार.  
* अजित पवारांनी पुरंदरच्या लोकांचे नुकसान केलेय.  पवार विरोधातील मते मला मिळणार.

अभिनेता गोविंदा उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार? शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, सुत्रांची माहिती

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत....


अभिनेता गोविंदा आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत  आहे.


लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली


काही दिवसांपूर्वी या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.


उत्तर पश्चिम मतदार संघातून  महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर  यांच्या  नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे


गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता, त्याच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या अनुशंगाने गोविंदाच्या नावाची चर्चा आहे.


या आधी गोविंदाने  २००४ मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक  लढवत भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्यांला भगदाड पाडत काॅग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी रोवला होता.


 अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध असून राजकिय डावपेच याचीही जाण असल्याने अमोल किर्तीकर यांच्या विरोधात हा चेहरा चालू शकतो. त्या अनुशंगाने चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळते.


या आधीही या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दिक्षित, नाना पाटेकर, यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय व नानांनी स्पष्ठ नकार दिला. तर माधुरी दिक्षित यांच्याकडून उत्तरच आले नाही.

अरविंद केजरीवालांना अटक, नाशिकमध्ये आम आदमी पार्टी आक्रमक

अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आम आदमी पार्टी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आपकडून मेहेर सिग्नल परिसरात रास्ता रोको आणि टायर जाळत केजरीवालांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टायर जाळणाऱ्या आंदोलकांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद करणार भावजईच्या विरोधात प्रचार

रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद करणार भावजईच्या विरोधात प्रचार


रोहिणी खडसे या शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करणार आहेत. 


मी माझ्या पक्षाच्या विचारधारेवर बांधील आहे आणि ठाम पणे आमचा उमेदवार निवडून अनेल


 रक्षा खडसे ह्या वेगळ्या पक्षात आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे आणि आमच्या पक्षाचा प्रचार केला


रक्षाताईंनी माझ्या आईच्या विरोधात दूध संघाच्या निवडणुकीत विरोधात प्रचार केला होता


प्रत्येक निवडणुकीत रक्षा खडसेंनी आमच्या विरोधातचं विचार केला


त्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेवर बांधील आहोत
मी शरद पवार पक्षाचा उमेदवार रावेर लोकसभेतून निवडून आणणार आणि त्यांचा प्रचार करणार 


रोहिणी खडसे महिला प्रदेशाध्यक्ष यांनी रक्षा खडसे विरोधात प्रचाराला उतरणार आणि आव्हान केले आहे

उदयनराजे भोसले आणि अमित शाह यांची भेट पुन्हा लांबणीवर, दोन दिवसापासून उदयनराजे दिल्लीत

उदयनराजे भोसले - अमित शाह यांची भेट पुन्हा लांबणीवर


अमित शहा यांची भेट लांबणीवर


 उदयनराजे अमित शहा यांना उद्या भेटण्याची शक्यता


आज ही भेट होणार नाही 


गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे भोसले दिल्लीत

ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी

ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी


-अभिजित बांगर मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त तर सौरभ राव ठाणे पालिकेचे आयुक्त 


-या अगोदर सौरभ राव यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार संभाळला आहे.


-ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी स्वीकारला...



-स्मार्ट सिटी मध्ये आणखीन नवीन भर पाडण्याचा नव्या आयुक्तांचा संकल्प

महाराष्ट्र अस्थिर, गेल्या 60 वर्षात अशी परिस्थिती कधी नव्हती : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

आज महाराष्ट्रातील परिस्थिती पहिली तर गेल्या 60 वर्षात जी, नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण पक्षांतर बंदी कायदा फेल झाला असल्याचे मत कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केलं. एक तर हा कायदा काढून टाकावा किंवा हा कायदा जास्त मजबूत करावा. आपण एकाधिकारशाहीकडे वळत आहोत. लोकशाही टिकली पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले. 

सरकारच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

माजलगाव तालुक्यातल्या किट्टी आडगाव येथे आरक्षणाच्या संवाद बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्यासह माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांच्यावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 10 मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर किट्टी आडगाव येथे मराठा बांधवांच्या संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं आणि याच बैठकीत भाषण करताना म्हणून जरांगे पाटील यांनी बिना परवाना बैठक घेऊन सरकारच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचं पोलिसांनी सांगितलं असून म्हणून तरंगे यांच्यासह राधाकृष्ण होके पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी देखील मनोज डांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत आणि त्यातच आता माजलगाव पोलिसांनी देखील जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड आज राज ठाकरेंना भेटणार, भेटीचं कारण गुलदस्त्यात

भाजप आमदार प्रसाद लाड आज राज ठाकरेंना भेटणार आहेत. दुपारी 12 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट होणार आहे. भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. 

उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही : नाना पटोले

उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी सांगलीमध्ये उमेदवारी जाहीर करणे प्रॉब्लेमॅटिक झालं आहे. आघाडी मध्ये असे व्हायला नको असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. चर्चा सुरू असताना त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेलं नाही असं पटोले म्हणाले.  

चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला हंसराज अहिरांची अनुपस्थिती

चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला हंसराज अहिर यांनी फिरवली पाठ


जिल्ह्यातील भाजप आमदार उपस्थित मात्र अहिरांची दांडी


तिकीट कापल्याने अहिर नाराज असल्याचो चर्चा

महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ; भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ

महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ; भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून खबरदारी


आम आदमी पक्षाकडून भाजप कार्यालयासमोर निदर्शने होण्याची शक्यता


दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबई पोलिसांचे पथक तैनात

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 महिन्यापासून गळती, लाखो लिटर पाणी वाया

पालघरमधील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील तीन महिन्यांपासून गळती. गळतीमुळे दिवसाला लाखो लिटर पाणी वाया . मुंबई वडोदरा दृतगती महामार्गाच्या उभारणीच्या वेळी डहाणूतील ऐना येथे जलवाहिनी दबली गेल्याने गळती. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दुर्लक्ष . जिल्ह्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना दुसऱ्या बाजूला पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी .

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटात, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटात..
शिवसेना ठाकरे गटाला धक्का...
रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत मुंबईत झाला प्रवेश सोहळा...
2019 ला काँग्रेस कडून लढवली होती लोकसभेची निवडणूक...
पराभव झाल्यावर ठाकरे गटात प्रवेश करत लढविली होती श्रीरामपूर विधानसभा निवडणूक...
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात प्रवेश....
भाऊसाहेब कांबळे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे लढत होण्याची शक्यता वाढली

मफलरवाला आतमध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आतमध्ये जाईल, केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर नितेश राणेंनी ठाकरेंना डीवचलं

केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर नितेश राणे यांनी ठाकरेना डीवचलं


फेसबुक पोस्ट करत नितेश राणे यांनी  ठाकरेना डीवचलं


मफलरवाला आतमध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आतमध्ये जाईल 

मनोज जरांगेंना संवाद बैठक संवाद बैठक कोर्टाची परवानगी, परळीमध्ये फोडले फटाके; जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 26 जणांवर गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील यांची संवाद बैठक घेण्याचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर परळी मध्ये फटाके फोडले आणि ढोल वाजवले आणि जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून 26 जनावर गुन्हा दाखल..


दोन दिवसांपूर्वी परळी मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं मात्र या संवाद बैठकीला परवानगी देण्यात आली नव्हती मात्र आयोजकांनी कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने या संवाद बैठकीला परवानगी देण्यासंदर्भातला निर्णय झाल्यानंतर परळी शहरांमध्ये ढोल वाजवून या निर्णयाचे स्वागत झाले यावेळी पेढे वाटण्यात आले घोषणा देण्यात आल्या आणि मोठा जमा यावेळी जमवला होता..


जमावबंदीचे उल्लंघन केले तसेच तरुणांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत मोठमोठ्याने वाद्य वाजवले म्हणून परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये 26 जनावर जमाबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अद्यापही उमेदवारांची घोषणा नाही

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र अद्यापही दोघांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेनुसार काही जागेची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने बुलढाण्याची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस एडवोकेट जयश्री शेळके यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

महायुतीच्या जागांचा तिढा दिल्ली दरबारी, अमित शाह प्रमुख नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढणार

महायुतीच्या जागाचा तिढा आता दिल्ली दरबारी


केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतली तिढा न सुटलेल्या जागांची माहिती


महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा एकदा अमित शहा चर्चा करून जागा वाटपाचा पेच सोडवणार - सूत्र


केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी महायुतीच्या जागांचा तिढा सुटणार


सूत्रांची माहिती

महायुतीच्या जागांचा तिढा दिल्ली दरबारी, अमित शाह तिन्ही नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढणार :

महायुतीच्या जागाचा तिढा आता दिल्ली दरबारी


केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतली तिढा न सुटलेल्या जागांची माहिती


महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा एकदा अमित शहा चर्चा करून जागा वाटपाचा पेच सोडवणार - सूत्र


केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी महायुतीच्या जागांचा तिढा सुटणार


सूत्रांची माहिती

अकोल्यात ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, दोन्ही वाहनांना लागली आग, वाहनं जळून खाक

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा गावात ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही वाहनांना आग लागली आहे. आगीत दोन्ही वाहनं जळून खाक. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. आज सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली.



विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम

विजय शिवतारे बारामतीतुन निवडणूक लढविण्यावर ठाम.  आज पुण्यात येऊन उपचार घेणार आणि उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापुरचा दौरा करणार आहेत.

निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले IAS अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकारने नियुक्ती केली होती. निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांना स्वगृही नियुक्ती देता येत नाही असा नियम आहे. असे असतानाही नियुक्ती देण्यात आली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. सतीश रोठे यांनी यासंबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली . विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी व नातेवाईकांनी ऍड सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. एड रोठे यांनी यासंबंधी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चार अनोळखी इसमां विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.