Maharashtra News LIVE Updates 21th March 2024 : उद्धव ठाकरेंची मिरजेत सायंकाळी जन संवाद सभा, सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा होण्याचा चंद्रहार पाटील यांना विश्वास

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Mar 2024 09:12 PM
अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे. 

रामदास आठवले यांच्या वाहनाचा साताऱ्यात अपघात

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा साताऱ्यात अपघात झाला आहे. दरम्यान, आम्ही सुखरुप असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, राम सातपुते सागर बंगल्यावर; नगर, माढा आणि साताऱ्याचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर अहमदनगरमधून देखील खासदार सुजय विखे-पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही मतदारसंघातील नाराज झालेल्या नेत्यांची सागर बंगल्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर नाराज नेत्यांची समजूत काढताना दिसत आहेत. 

जयंत पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात थोड्याच वेळात जयंत पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराजांची गळाभेट

Uddhav Thackeray Meets Shahu Maharaj :  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज छत्रपतींची न्यू पॅलेस येथे भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शाहू महाराज यांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धारच केला आहे. 

Yavatmal : जवाहरनगर मुरझडी गावातील ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

Yavatmal : यवतमाळपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जवाहरनगर(मुरझडी) या गावातील ग्रामस्थांनी येत्या 26 एप्रिल ला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकला असून सर्वपक्षीय नेत्यांना प्रचारासाठी गावात बंदी घालण्यात आली आहे. मागील 35 वर्षा पासून जवाहर नगर (मुरझडी) या गावात राहत आहे. व घराचे टॅक्स पावती सुध्दा भरत आहे. जवाहर नगर (मुरझडी) या गावाल 2 वेळा सरकारी योजना घरकुल मिळालेले आहे. असे असतानाही गावातील काही भाग हा अतिक्रमण मध्ये येत असल्याने प्रसनाने ग्रामस्थांना नोटीस पाठविण्यात आल्या आहे. आता शेतमालकाकडून घरकुल योजना ही शेताच्या हद्दीत बांधण्यात आले आता घर खाली करून दया असा दबाव आणीत आहे. त्यामुळे शासन जो पर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूकिवर बहिष्कार चे शस्त्र ग्रामस्थांनी उगारले आहे.

Dharashiv Crime : धाराशिवच्या विद्यार्थिनीने पुण्यात स्वतःला पेटवून घेत संपविले जीवन, छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य

Dharashiv Crime : धाराशिवच्या विद्यार्थिनीने पुण्यात स्वतःला पेटवून घेत संपविले जीवन


कँटीनच्या कर्मचाऱ्याकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून इंजिनिअरिंगच्या तरुणीने संपविले आयुष्य......


रेणुका बालाजी साळखें असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.


रेणुका भारती विद्यापीठात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होती.  


होस्टेलच्या कँटीनमधील कर्मचाऱ्याच्या छेडछाडीला आणि रूममधील सोबती असणाऱ्या जोडीदार मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून रेणुकाने रूमच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली... दरम्यान, तिला रुग्णालय दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर भाजल्याने रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचे वडील बालाजी साळुंखे यांनी पोलिसात तक्रार दिली.


 

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अनंतराव थोपटे यांचा भेटीला 

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अनंतराव थोपटे यांचा भेटीला 


अनंतराव थोपटे यांच्या भोर येतील निवासस्थानी सुनील तटकरे भेटीसाठी थोडयाच वेळात दाखल होणार


शरद पवार, विजय शिवतारे यांच्या नंतर आता सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने सुनील तटकरे अनंतराव थोपटे यांच्याशी बातचीत करणार

Political News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका 

Political News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका 


शिवसेना लोकसभा पार्श्वभूमीवर  निरीक्षक,खासदार आमदार, नेते आणि उप नेत्यांची बैठक संपली


लोकसभा निवडणुकीची रणनीती, निरीक्षकांचा अहवाल ठरलेला जागावाटप फॉर्मुला व इतर विषयावर चर्चा झाली


वरळी दोन येथे ही बैठक पार पडली


आज एकूण चार बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत 


दोन बैठकानंतर शिवसेना  लोकसभा निरीक्षक,जिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख  इतर पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडेल.

Baramati : शिंदे गटाच्या एका ही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांचा गट करणार नाही, आमदार अण्णा बनसोडेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान.

Baramati : विजय शिवतारेंच्या बंडखोरीचे परिणाम राज्यभर उमटणार


शिंदे गटाच्या एका ही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांचा गट करणार नाही,


आमदार अण्णा बनसोडेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान.


बारामती लोकसभेत शिंदे गटाचे विजय शिवतारे बंडखोरीवर ठाम आहेत.


मात्र आता याचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज देऊन शिवतारे ऐकत नसतील तर


आम्ही जिथं शिंदे गटाचे उमेदवार असतील तिथं प्रचार करणार नाही. अ


शी टोकाची भूमिका अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी घोषित केली आहे.


मावळ लोकसभेत खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार न करून,


अजित पवारांचा गट पार्थच्या पवारांचा बदला ही घेऊ इच्छितो. अशीच चर्चा आहे

Vasai  : वसईच्या औद्योगिक वसाहतीला भीषण आग, 10 ते 15 गाळ्यांच नुकसान

Vasai Fire  : वसईच्या एका औद्योगिक वसाहतीला भीषण आग लागली आहे. या आगीत 10 ते 15 गाळ्याच नुकसान झालं आहे. वसई पूर्वेच्या शैलेश इंडस्ट्रिअल इस्टेट मध्ये एका गाळ्याला आज सकाळी 10 च्या सुमारास आग लागली. या आगीत 10 ते 15 गाळ्याच नुकसान झालं आहे. प्लास्टिक आणि लोखंडाचे पार्टस या गाळ्यात बनवले जातात. प्लास्टिकमुळे आगीने रौद्ररूप पकडलं आहे. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. माञ अजूनही धूर प्रचंड आहे. सध्या कुलींगचं काम सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

Ashish Shelar : तिन्ही नेते भेटले, चिंतन मंथन आज झालं, त्यातून अमृत लवकरच बाहेर निघेल - आशिष शेलार

Ashish Shelar : तिन्ही नेते भेटले हा राजकीय संस्कृतपणा आहे - आशिष शेलार


उबाठा सेनेची बोलकी बंद होण्याचा कारण काय - आशिष शेलार


चिंतन मंथन आज झालं त्यातून अमृत लवकरच बाहेर निघेल बैठकीत जे नेते मंथन करत होते ते सांगतील अमृत बाहेर कधी निघेल - आशिष शेलार


उद्धव ठाकरे हे म्हणतात कि ठाकरे ब्रँड महाराष्ट्रमध्ये हवा आहे तर त्यांचे लोक त्यांच्यापासून दूर का गेले? - आशिष शेलार


बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आणि त्यामुळे ठाकरे भाजप चोरटे याचे उत्तर त्यांनीच द्यावं - आशिष शेलार


 त्यांचा पक्ष हा भिकमांगा त्यांनी आधी मतांसाठी  इतर पक्षांना भीक मागितलं  आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मतांसाठी भीक मागत आहेत - आशिष शेलार

Political News : उद्धव ठाकरेंची मिरजेत सायंकाळी जन संवाद सभा, सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा होण्याचा चंद्रहार पाटील यांना विश्वास

 


Political News :  उद्धव ठाकरे आज  शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली  दौऱ्यावर येत आहेत.  मिरजेत सायंकाळी सभा पार पडणार आहे.  या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी ठाकरे कडून चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का याकडे लक्ष असणार आहे. मात्र सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा होण्याचा चंद्रहार पाटील यांना विश्वास आहे.  

Amol Mitkari : भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा, अमोल मिटकरींचा भाजपवर आरोप

Amol Mitkari : राज्यात सध्या अनेक ठिकाणी 'महायुती"तील कुरबुरी वाढल्यायेत. त्यातच आता अकोल्यातही 'महायुती'तील धुसफूस समोर आलीये. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप केलाय. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरींनी भाजपवर केलाय. त्यांचं सन्मानपूर्वक बोलवणं आल्याशिवाय अकोल्यात भाजपचा प्रचार करणार नसल्याचं अमोल मिटकरी म्हणालेय.

Mira Road :  स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो सोबत छेडछाड, सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

Mira Road : स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो सोबत  छेडछाड केल्याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात कलम 153(ए), 295(ए) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम  2005 चे कलम 66(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव मुजाहिद शेख असून त्याने संताच्या फोटो बरोबर छेडछाड करून त्यांच्या चेहऱ्याच्या जागी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटोवर 'स्वामी सत्यानाशी महाराज' असे लिहून फोटो फेसबुक वर प्रसारित केला होता. या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात  असल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  युवा पिढीने कोणाच्याही भावना दुखावतील असे काही करू नये अशी पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी आवहान केले आहे.

Congress : 'मोदी का परिवार' घोषणा आणि पोस्टरविरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार

Congress : 'मोदी का परिवार' घोषणा आणि पोस्टरविरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ दुपारी 3:30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार

Yavatmal : शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या बैठकीला सुरुवात, कार्यकर्त्यांसह पदाधिकारी बैठकीला उपस्थित

Yavatmal : शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या बैठकीला सुरुवात 


यवतमाळ जिल्ह्यातील भावना गवळीच्या गटातील लोकप्रतिनिधी, तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी बैठकीला उपस्थित 


आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात कश्या पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवायची याबाबत बैठक असल्याची माहिती

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार, सातारा लोकसभेतून लढण्याची संधी मिळण्यासाठी आग्रही

Udayanraje Bhosale : सातारा लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून लढण्याची इच्छा बाळगून उदयनराजे भोसले दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आले आहे. साताऱ्याच्या लोकसभेतून लढण्याची संधी मिळावी यासाठी उदयनराजे कमालीचे आग्रही आहेत. या दोन दिवसात त्यांची व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकते.

Ahilyanagar : जिल्हा परिषदेसमोर द्वितीय वर्षश्राद्ध घालून अनोख आंदोलन

Ahilyanagar : दोन वर्ष होऊन देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नसल्याने जिल्हा परिषदेसमोर अनोख आंदोलन...


द्वितीय वर्षश्राद्ध घालून केले अनोख आंदोलन...


सरकारचा निषेध म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वात आंदोलन...


प्रशासक काळात काही नेते आणि प्रशासकीय अधिकारी अनागोंदी कारभार करत असल्याचा आरोप...

Shirdi : शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबार, पोलिसांचा तपास सुरू

Shirdi : शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबार...
शहरात भर दुपारी गोळीबार झाल्याने एकच खळबळ...
शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल..
दोन गोळ्या झाडल्या असल्याचा प्राथमिक अंदाज...
बंदुकीतून झाडलेली एक गोळी हॉटेलच्या रूममध्ये घुसली..
गोळीबार करून आरोपींचे पलायन...
सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही...
शिर्डी शहरातील खाजगी पार्किंगमध्ये घडली घटना...
शिर्डी पोलिसांचा तपास सुरू...
साईभक्तांची सुरक्षा ठेवा अन्यथा आंदोलनाचा पावित्रा हाती घेऊ , शिर्डी ग्रामस्थांचा पोलीस प्रशासनाला इशारा....

Raigad : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचे निधन, कोकणवासीयांवर दुःखाचा डोंगर

Raigad : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचे निधन 


वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर निधन 


दिवंगत बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले


मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या


तिथेच त्यांची आज पहाटे 3 वाजता प्राणज्योत मावळली


नर्गिस अंतुले यांनी पतीला भक्कम साथ देत राजकीय कारकीर्द आणिअल्पसंख्यांक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं


आज त्यांच्या जाण्याने कोकणवासीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,

Congress Press : काँग्रेस पक्षाचा निधी वापरण्यास सक्षम नाही. - काँग्रेस नेते अजय माकन 

Congress Press : काँग्रेस पक्षाचा निधी वापरण्यास सक्षम नाही. - काँग्रेस नेते अजय माकन 


आम्ही प्रसिद्धीसाठी पैसे खर्च करू शकत नाही. ही कसली लोकशाही? 


आमच्यावर 30 ते 35 जुनी केसेस उघडून ते आम्हाला पैसे वापरू देत नाहीत.

Congress Press : कॉंग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करत आहेत : सोनिया गांधी


Congress Press : कॉंग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करत आहेत : सोनिया गांधी


 काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर साधला निशाणा 


लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे


भाजपला इलेक्टोरल बाँड्सचा खूप फायदा झाला आहे. 


हा अतिशय गंभीर मुद्दा आहे, लोकशाहीवरचा हल्ला आहे.

Congress Press : कॉंग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करत आहेत : सोनिया गांधी


Congress Press : कॉंग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करत आहेत : सोनिया गांधी


 काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर साधला निशाणा 


लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे


भाजपला इलेक्टोरल बाँड्सचा खूप फायदा झाला आहे. 


हा अतिशय गंभीर मुद्दा आहे, लोकशाहीवरचा हल्ला आहे.

Congress Press : कॉंग्रेसची बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचे आहे - मल्लिकार्जुन खरगे

Congress Press : कॉंग्रेसची बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचे आहे - मल्लिकार्जुन खरगे


बँक खाती गोठवण्याचा कट
 
सरकारला आम्हाला लाचार बनवायचे आहे आणि निवडणुकीत उतरवायचे आहे - खरगे


काँग्रेसचा मोदी सरकारवर मोठा हल्ला


लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक आहेत. 


सत्तेत असलेल्यांची संसाधनांवर मक्तेदारी असावी, माध्यमांवर त्यांची मक्तेदारी असावी, असे होऊ नये, 


आयटीसारख्या घटनात्मक आणि न्यायिक संस्थांवर सत्ताधारी पक्षाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असावे, असे होऊ नये.

Congress Press : कॉंग्रेसची बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचे आहे - मल्लिकार्जुन खरगे

Congress Press : कॉंग्रेसची बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचे आहे - मल्लिकार्जुन खरगे


बँक खाती गोठवण्याचा कट
 
सरकारला आम्हाला लाचार बनवायचे आहे आणि निवडणुकीत उतरवायचे आहे - खरगे


काँग्रेसचा मोदी सरकारवर मोठा हल्ला


लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक आहेत. 


सत्तेत असलेल्यांची संसाधनांवर मक्तेदारी असावी, माध्यमांवर त्यांची मक्तेदारी असावी, असे होऊ नये, 


आयटीसारख्या घटनात्मक आणि न्यायिक संस्थांवर सत्ताधारी पक्षाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असावे, असे होऊ नये.

Congress Press : कॉंग्रेसला फक्त 11 टक्के रोखे, कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत वरिष्ठ नेत्यांचा हल्लाबोल

Congress Press : निवडणुक रोख्यांची 56 टक्के रक्कम भाजपकडे


कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत वरिष्ठ नेत्यांचा हल्लाबोल


निवडणुक रोख्यावरून कॉंग्रेसची मोदी सरकारवर टीका


70 वर्षात असं कधी घडलं नव्हतं  - खरगे


कॉंग्रेसला फक्त 11 टक्के रोखे - खरगे

Vasant Chavan : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जशास तसे उत्तर देणार, वसंतराव चव्हाणांची अशोकराव चव्हाणांवर टीका

Vasant Chavan : माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका


प्रदेश काँग्रेस कमिटीने माझी उमेदवारी निश्चित करून पार्लमेंटरी बोर्डाला शिफारस केली


आज, उद्या नाव अधिकृत घोषित होईल, अजून अधिकृत माझं नाव जाहीर झालं नाही,


तो अशोकराव चव्हाण यांचा निर्णय आहे, शेवटी हा फैसला जनता ठरवेल कोणत्या एकाच्या मनावर नाही


काँग्रेस मधले काही लोक ओबीसीत गेले असतील, असंख्य कार्यकर्ते पक्षात आहेत


निवडणुकीत चार लोक येतात चार लोक जातात,


उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जशास तसे उत्तर देणार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर.


प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा. राज्यात वंचितसोबत येण्यास 'बीआरएस' उत्सुक असल्याची चर्चा. 


'केसीआर' यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला.


अकोल्यातील कृषीनगर भागातील आंबेडकरांच्या 'यशवंत भवन' निवासस्थानी घेतली आंबेडकरांची भेट.


तासभर झाली बंदद्वार चर्चा.


कदीर मौलानांच्या माध्यमातून केसीआर यांनी आंबेडकरांसमोर केला मैत्रीचा हात.


केसीआर तेसंगाणाने मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना केलं होतं आमंत्रित.

Political News : सातारा लोकसभा मतदार संघवरून महायुतीत रस्सीखेच, उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार का?

Political News : सातारा लोकसभा मतदार संघवरून महायुतीत रस्सीखेच


खासदार उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार का?


उदयनराजे यांचा घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार


राजधानी दिल्लीत होणार फैसला..


उदयनराजे घेणार अमित शहा यांची भेट


आताचे दोन दिवस उदयनराजे यांच्या जीवनात महत्त्वाचा

Political News : सातारा लोकसभा मतदार संघवरून महायुतीत रस्सीखेच, उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार का?

Political News : सातारा लोकसभा मतदार संघवरून महायुतीत रस्सीखेच


खासदार उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार का?


उदयनराजे यांचा घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार


राजधानी दिल्लीत होणार फैसला..


उदयनराजे घेणार अमित शहा यांची भेट


आताचे दोन दिवस उदयनराजे यांच्या जीवनात महत्त्वाचा

Political News : राज ठाकरे काही लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

Political News :  देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे काही लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा


- नाशिकसह अनेक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी मुंबईला बोलावले


- लोकसभेच्या जागांबाबत राज घेणार आढावा 


- नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून नाशिकची जागा मनसेला मिळावी अशी केली जाणार मागणी

Political News : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे ताज लँड्स एंड या ठिकाणी बैठक

Political News : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे ताज लँड्स एंड या ठिकाणी बैठक


राज ठाकरे वांद्रे ताज लँड्स एण्डला दाखल

Sangali : आमदार प्रणिती शिंदे यांना मराठा आंदोलकांच्या संतापला सामोरे जावे लागले

Sangali : आज सकाळी पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना कौठाळी गावात मराठा आंदोलकांच्या संतापला सामोरे जावे लागले. यावेळी सोबत असणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी मध्यस्थी करीत मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे हे प्रणिती शिंदे याना सांगायला लावले 

Mahayuti Seat Sharing: मुंबईत शिंदे-फडणवीस- ठाकरेंची महत्त्वाची बैठक; मनसे महायुतीत सहभागी होणार?

Mahayuti Seat Sharing: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक, काल रात्री देखील फडणवीस आणि राज यांच्यात झाली होती चर्चा, मनसे महायुतीमधे सहभागी होण्याबद्दल दोघांमध्ये चर्चा.

Share Market : भारतीय शेअर बाजाराची गगनभरारी, सेन्सेक्स 700, निफ्टी 221 अंकांनी वधारला

Share Market : फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कोणताही बदल न केल्याने भारतीय शेअर बाजाराची गगनभरारी 


सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांची उसळी तर निफ्टी 221 अंकांनी वधारला 


फेडकडून सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर ठेवले गेलेत, सोबतच यंदाच्या वर्षात तीन वेळा व्याजदर कपातीची शक्यता असल्याचं पाॅवेल यांच्याकडून भाष्य 


जागतिक बाजारात प्रति दहा ग्राम सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, सोन्याचे भाव प्रति ग्राम एक हजारहून अधिकनं वाढले 


सोन्याचा दर प्रति तोळा ६६ हजार ७०० च्या घरात 


डाॅलरच्या तुलनेत रुपया ८३.०६ वर उघडला

Gold Rate : जळगावमध्ये सोन्याच्या दरात वाढ, प्रतितोळा एक हजार रुपयांची वाढ

Gold Rate : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर हे 66700 तर जी एस टी सह 68,700 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत


चोवीस तासात सोन्याच्या दरात प्रति तोळा एक हजार रुपयांची वाढ


अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याज दरात कपात


जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्या मधे करण्यास सुरुवात


सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली


चोवीस तासात सोन्याचे दरात प्रतीतोल्याच्या मागे एक हजार रुपयांची वाढ


आगामी काळात अजूनही सोन्याचा दरात वाढ होण्याचे संकेत सोने व्यावसायिकांनी दिले आहे

Congress : काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारी वरून संघर्ष सुरू

Congress : काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारी वरून संघर्ष सुरू आहे.


काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष असताना आमदार प्रतिभा धानोरकर शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचल्या आहेत


काल काँग्रेसची CEC ची बैठक पार पडली, यात चंद्रपूर मतदारसंघाबाबत निर्णय राखून ठेवला आहे


काल प्रतिभा धानोरकर यांनी समाज माध्यमावर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली होती. यामध्ये उमेदवारी आपलीच आहे, विजय आपलाच आहे... थोड धीरानं वागा…. असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं

Sangali : सांगली लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला, उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कारचा काँग्रेसचा निर्णय

Sangali : सांगली लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला 


मिरजेतील आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कारचा काँग्रेसचा निर्णय


मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात आलं होतं निमंत्रण, मात्र काँग्रेसकडून निमंत्रण नाकारले


जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भूमिका.


मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वीकारला निमंत्रण ,
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते  मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता

Sanjay Raut : भिवंडी बाबत आम्ही सगळे एकत्र आलो, तर ती जागा आम्ही भाजप कडून काढून घेऊ - संजय राऊत

Sanjay Raut : काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्र मध्ये शिवसेना आणि  राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत.


सर्व पक्ष येऊन  कत्र येऊन इंडिया आघाडी आहे


आम्ही त्या राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड झारखंड येथे जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील सीट मागता आहे. त्याचे संघर्ष त्यावर अवलंबून असते .


त्यांच्या अस्तित्व कार्यकर्ते त्यावर अवलंबून असतं


भिवंडी बाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा आम्ही भाजप कडून काढून घेऊ


राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागे बाबत दावा करत आहे .

Parbhani : परभणीच्या जिंतुरमधील कौसडीत भूकंपामुळे भिंतीचा भाग कोसळला

Parbhani : परभणीच्या जिंतुरमधील कौसडीत भूकंपामुळे भिंतीचा भाग कोसळला


आज सकाळी परभणी जिल्ह्यात भूकंप झाल्याने अनेक भागात पत्रे हादरले,कुठे खुर्च्या पडल्या तर कुठे भिंतीचा भाग कोसळलाय


परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील इखे गल्लीतील बालासाहेब इखे यांना सकाळी भूकंप जाणवू लागले


घरातील सर्वांना घराबाहेर घेऊन गेले यावेळी त्यांच्या घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला.


घरातील सर्व जण बाहेर गेल्याने कुठलीही हानी झाली नाही.


मात्र इखे यांचे काहीसे नुकसान झाले आहे.

Jalgaon : जळगाव, रावेरच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी; शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघासाठी महायुतीच्या वतीने रक्षा खडसे यांना तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली


जळगाव  लोकसभा मतदार संघात स्मिता वाघ यांना पहिल्या वेळी उमेदवारी मिळाली आहे


या दोन्ही उमेदवारांच्या घोषणेनंतर त्यांच्याच पक्षात त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे.


रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलून मिळावी,


यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षातील विविध पदाचे राजीनामे पक्ष श्रेष्ठी यांच्या कडे दिले आहेत


याच ठिकाणी मुक्ताई नगरचे आ चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला  नाराजी व्यक्त केली आहे

Parbhani : लोकसभा निवडणुकीपूर्वी परभणीत सत्ताधारी राष्ट्रवादी अन शिवसेनेत जोरदार घमासान, बाबाजानी दुर्रानी यांना हद्दपार करण्याची शिवसेनेची मागणी

Parbhani : लोकसभा निवडणुकीपूर्वी परभणीत सत्ताधारी राष्ट्रवादी अन शिवसेनेत जोरदार घमासान 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांना हद्दपार करण्याची शिवसेनेची मागणी 


बाबाजानी दुर्रानी यांनीही केली शिंदे गटाच्या कामाच्या चौकशीची मागणी 

Kolhapur : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई, 40 किलो अफू, एक किलो गांजासह तिघेजण अटकेत

Kolhapur : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई


40 किलो अफू व एक किलो गांजासह तिघेजण अटकेत


लोकसभेची आचारसंहिता जाहीर होतात कोल्हापूर पोलिसांची छापेमारी


5 लाख 21 हजार 400 रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त


पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गायकवाड पेट्रोल पंपाजवळ कारवाई


मनीष मोहनराम या परप्रांतीय तरुणासह मोहन चव्हाण आणि अमीर जमादार या तिघांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 : रामटेकमधील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ होणार?

Lok Sabha Election 2024 : रामटेकमधील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ होणार???


जात वैधता प्रमाणपत्राबाबत काँग्रेसच्या रश्मी बर्वे उर्फ रिना सोनेकर यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे


रश्मी बर्वे यांच्याविरोधात खोटे कागदपत्र तयार करून जात वैधता प्रमाणपत्र मिळविल्याची तक्रार आल्यानंतर झालेल्या चौकशी आणि चौकशीच्या अहवालाच्या आधारावर ही नोटीस बजावण्यात आली आहे...

Congress : काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक

Congress : काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक


दुपारी चार वाजता होणार बैठक


बैठकीमध्ये मध्यप्रदेश आणि तामिळनाडूच्या उमेदवारांच्या नावावरती होणार अंतिम निर्णय


निवडणूक समितीच्या बैठकीच्या पूर्वी महाराष्ट्र आणि इतर राज्यांची उमेदवारांच्या नावांची यादी येण्याची शक्यता

Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे आज शिवतीर्थ निवासस्थानी नेत्यांची 11 वाजता  बैठक

Raj Thackeray : राज ठाकरे यांची दिल्लीवारी झाल्यानंतर आज शिवतीर्थ निवासस्थानी नेत्यांची 11 वाजता  बैठक


बैठकिला नेते पदाधिकारी उपस्थित राहणार


दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे नेत्यांशी आज चर्चा करणार असल्याची माहिती


तसेच प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्या दिवशी मनसेचा मेळावा असणार आहे, याबाबत देखील चर्चा या बैठकीत होणार आहे


नियोजनाविषयी या बैठकीत चर्चा होईल

मुख्य निवडणूक आयुक्त, इतर आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना केंद्र सरकारचा विरोध

Election 2024 : मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना केंद्र सरकारने विरोध केला आहे


आज या प्रकरणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.



सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कायदा मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दिले.


त्यात म्हटले आहे की, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित पॅनलमध्ये न्यायाधीश असणे आवश्यक नाही

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्यातील 24 तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, मराठवाडा विद्यापीठाची घोषणा 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.. मराठवाड्यातील 24 तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा 


दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ


संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ


2023 मध्ये भरलेली फी परत केली जाणार 


दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Pune Crime : पुण्यात वादातून गोळीबार, गुन्हा दाखल

Pune Crime : क्रिकेट वरून झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार


क्रिकेट खेळण्यावरून 2 गटात भांडण


पुण्यातील कात्रज भागातील घटना 


सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी नाही


भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल संध्याकाळी हा प्रकार घडला


या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे 

BJP : भाजपच्या मोर्चा, आघाड्यांची आज मुंबईत बैठक, मिशन 45 साठी भाजप सर्व आघाड्यांना ऍक्टिव्ह करणार

Political : मिशन 45 साठी आता भाजप सर्व आघाड्याना ऍक्टिव्ह करणार


भाजपच्या मोर्चा आणि आघाड्यांची आज मुंबईत बैठक


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावली महत्वाची बैठक


भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या विविध मोर्चा- आघाड्याची 11 वाजता होणार बैठक


उद्योग आघाडी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, वैद्यकीय आघाडी यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जाणार

Nagpur : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर वाहनांची कसून तपासणी

Nagpur : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावरून निघणाऱ्या वाहनांची रात्री पोलिसांनी कसून तपासणी करण्यात आली....


नागपूर विमानतळाचे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत पोलीस आणि निवडणूक शाखेच्या भरारी पथकाकडून चौकशी करण्यात येत होती...


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे..


त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री नागपूर विमानतळांवर विशेष भरारी पथकाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली होती...

Kirit Somaiyya : अनिल परबला दापोली रिसॉर्ट घोटाळाचा हिशोब द्यावाच लागणार - किरीट सोमैया

Kirit Somaiyya :  100 कोटीच्या मानहानीचा दाव्याचा खोट्या धमक्यांना मी घाबरणार नाही - किरीट सोमैया


अनिल परबला दापोली रिसॉर्ट घोटाळाचा हिशोब द्यावाच लागणार - किरीट सोमैया


दापोली येथील साई रिसोर्टच अनधिकृत बांधकाम अनिल परबने केला - किरीट सोमैया


त्यात काळा पैसा अनिल परबने वापरला - किरीट सोमैया


आयकर विभाग, ED, रत्नागिरी पोलीस , पर्यावरण मंत्रालयाची कारवाई सुरु आहे - किरीट सोमैया


 

Udyanraje Bhosale : उदयनराजे भोसले दिल्लीत, अमित शहा देवेंद्र फडणवीस समवेत आज दिल्लीत बैठक 

Udyanraje Bhosale : जागा खेचून आणण्याचा प्रयत्नासाठी उदयनराजे भोसले दिल्लीत


अमित शहा देवेंद्र फडणवीस समवेत आज दिल्लीत बैठक 


सातारची जागा अजितदादा गटाला सोडल्याच्या चर्चेमुळे उदयनराजे अडचणीत 


उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी सर्वच नेत्यांकडून आग्रह 


आज बैठकीत अंतिम निर्णय होणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मिरजेत आज जन संवाद सभा, उमेदवार म्हणून कोणाची घोषणा करणार?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मिरजेत आज जन संवाद सभा;


सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची ठाकरे घोषणा करणार का?


कॉंग्रेसकडून ही सांगली लोकसभेत उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्या नावाची  घोषणा होण्याची शक्यता 


उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली  दौऱ्यावर येत आहेत.


मिरजेत सायंकाळी 5 वाजता सभा पार पडणार आहे.  


या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी ठाकरे कडून चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का याकडे लक्ष असणार आहे

Mumbai : मुंबईत आज 2024 वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद, पुढील 2-3 दिवस तापमान चाळीशी जवळपासच राहणार

Mumbai : मुंबईत आज 2024 वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद 


मुंबईतील कमाल तापमान 38.7 अंश सेल्सिअसवर 


पुढील 2-3 दिवस मुंबईतील तापमान चाळीशी जवळपासच राहणार


कुलाब्यात कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअस 


मुंबईसोबतच ठाणे देखील तापलं, ठाण्यातील कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 


सर्वसाधारणपणे मुंबईतील कमाल तापमान मार्च महिन्यात चाळीस अंश सेल्सिअसच्या जवळपास जाताना दिसत असतं तसं यंदा देखील अनुभवायला मिळत आहे 


पूर्वेकडील प्रवाहामुळे पुढील काही दिवस मुंबईत कमाल तापमानात वाढ होण्याची अपेक्षा आहे 

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध, 22 मार्चपासून सुरुवात

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा केंद्राची माहिती विद्यार्थ्यास ऑनलाईन उपलब्ध 


1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे उपलब्ध 


शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेस दिनांक २२ मार्चपासून सुरुवात होत आहे.


आजपर्यंत पदवी परीक्षेचे १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे वितरित


ऐनवेळेस काही परीक्षा केंद्रात बदल झाल्यास किंवा विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र तात्काळ समजण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे,


परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

Nanded : नांदेडमध्ये 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

Nanded : नांदेड येथे अनेक भागात गुरुवारी सकाळी 6 वाजून 8 ते 9 मिनिटाच्या दरम्यान दहा सेकंद 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून 15 किलोमीटरवर  होते.

Hingoli : हिंगोलीत अनेक ठिकाणी जमीन हादरली, नागरिक भयभीत 

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली


जमीनितुन गूढ आवाज आल्याने नागरिक भयभीत 


6 वाजून 09 मिनिटांनि भूकंपाचा धक्का 


हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि औंढा या तालुक्यातील अनेक गावांना जाणवला धक्का 


ह्या अगोदर जिल्ह्यात अनेक वेळा भुकंपाचे धक्के बसले आजपर्यंत आजचा सर्वात मोठा धक्का

Nanded : नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात सकाळी 6 वाजता भूकंपाचा धक्का

Nanded : नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात मध्ये भूकंपाचा धक्का,


-भूकंपाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता


-6 वाजून 10 मिनिटाला जमीन हादरली


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काही दिवसापूर्वी जाणवला होता धक्का

Parbhani : परभणी शहरासह जिल्ह्यतील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

Parbhani : परभणी शहरासह जिल्ह्यतील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के


सकाळी 6 वाजून 9  मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के


परभणी,पुर्णा,सेलुसह अनेक भागात जाणवले सौम्य धक्के

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.