Maharashtra News LIVE Updates 1st April : पंतप्रधान मोदी लाईव्ह, RBI च्या 90 व्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Apr 2024 02:58 PM
Sai Baba Palakhi : साईबाबांच्या नागपूर ते शिर्डी पालखी सोहळ्याचे सेलूत जल्लोषात स्वागत

Wardha News : वर्ध्याच्या सेलू येथील सुशिलादेवी पांडे कन्या विद्यालयात नागपूर ते शिर्डी पालखी पदयात्रा व रथयात्रेचे आगमन झाले. साई पालखी परिवाराच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त "वारी स्वर्गसुखाची" हा साई पालखी महोत्सव-२०२४ दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलाय. नागपूर येथील साई चॅरिटेबल ट्रस्टच्या विदर्भातील मानाच्या पालखीचे हे १७ वे वर्षे आहे. नागपूर ते शिर्डी अशा पालखी पदयात्रेचे  वर्धा जिल्ह्यात आगमन झाले.  येथे रक्तान शिबीर व रेहकी येथील ओम साई बाल भजन मंडळाच्या सादरीकरणाने परिसरात भक्तिमय वातावरण झाले.

Bhadara News : भंडाऱ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनं प्रचाराचा नारळ फोडला, मतदारांच्या भेटी घेत मागितला मतांचा आशीर्वाद

Bhadara News : भंडारा - गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आजपासून प्रचाराला प्रारंभ केला आहे. शहरातील भृशुंड गणेश मंदिरात पूजा करून प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. पायदळ रॅली च्या माध्यमातून त्यांनी मतदारांना मतांच्या रुपात आशीर्वाद मागितला. ठिकठिकाणी त्यांचं महिलांनी औक्षवन करून आशीर्वाद दिलेत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील आणि संघटनेतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

PM Narendra Modi Live : आरबीआयच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी लाईव्ह

PM Narendra Modi Live : आरबीआयच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह बोलत आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


एबीपी माझा लाईव्ह टीव्ही :


 



 

PM Modi LIVE : RBI च्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं, RBI च्या स्थापना दिनानिमित्त मी RBI च्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. देशाला नवी दिशा दाखविण्याचे काम आरबीआयने केले आहे. देशाच्या विकासात आरबीआय महत्त्वाची आहे.



Nilesh Lanke : निलेश लंके मोहटादेवी गडावर पोहोचले

अहमदनगर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मविआचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांचे मोहटादेवी गडावर आगमन


मविआ उमेदवार निलेश लंके मोहटादेवी गडावर दर्शन घेऊन करणार प्रचाराला सुरुवात


मोहटादेवी गडापासून निलेश लंके काढणार "स्वाभिमान जनसंवाद यात्रा"


जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून निलेश लंकेंच्या  प्रचाराची तोफ धडकणार


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, निवडणूक प्रभारी अंकुश काकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती


मोहटादेवीचे दर्शन घेऊन गडाच्या पायथ्याशी घेणार जाहीर सभा

Nitin Gadkari : उत्तर नागपूर मधून यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ

Nitin Gadkari : उत्तर नागपूर मधून यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना केला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी फक्त उत्तर नागपूरमध्येच गेल्या वेळेला भाजप पिछाडीवर होतं. तिच पिछाडी भरून काढण्यासाठी यंदा उत्तर नागपूरवर भाजपने खास लक्ष केंद्रित केलं असून आज गडकरी उत्तर नागपूर आतील मैदानात उतरले आहेत. मी नागपूरचा असून नागपूर माझं कुटुंब आहे. मी कधीही जात, धर्म, पंथ असा भेद केला नाही आणि त्यामुळेच नागपूरमध्ये सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात आणि हीच माझी राजकीय पुंजी असल्याचे मत, नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. उत्तर नागपूर मधील मागील वेळची पिछाडी मोठ्या मताधिक्याने यंदा भरून काढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Kirit Somaiya : चोरी पकडी गयी है, अनिल परब यांना जेल होणार : सोमय्या

Ratnagiri News : चोरी पकडी गयी है, अनिल परब यांना जेल होणार, असा पुनरुच्चार किरीट सोमया यांनी केला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या आज रत्नागिरीमध्ये आले आहेत. यावेळी ते जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी अनिल परब यांना जेल होणार, असा पुनरुच्चार केला आहे.

BJP Meeting in Mumbai : आज मुंबई भाजपची महत्वाची बैठक

BJP Meeting in Mumbai : मुंबई भाजपची आज दुपारी 2 वाजता महत्वाची बैठक


मुंबई भाजपच्या निवडणुक प्रमुखांची आज दुपारी बैठक


महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक


भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते राहणार उपस्थित


मुंबईतल्या 6 लोकसभा मतदार संघाचा घेणार आढावा

Buldhana News : बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षासह 25 जणांवर गुन्हे दाखल, आचारसंहितेत आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल

बुलढाणा : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली, सोबतच काँग्रेस पक्षाला 800 कोटी रुपयांपेक्षाचा दंड आकारण्यात आला याचा निषेध करण्यासाठी रविवारी बुलढाण्यात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली होती. त्यामुळे बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 25 जणांवर कलम 188 आणि 135 नुसार गुन्हे दाखल केले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा, तातडीने दिल्लीकडे रवाना

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने जळगाव जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. गेल्या अनेक दिवसपासून एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच ते रविवारी रात्री अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा झाल्या आहेत.


या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांच्या शी फोन वर विचारणा केली असताना त्यांनी म्हटल आहे की शरद पवार यांच्या सोबत बैठक आहे त्याच बरोबर सुप्रीम कोर्टात देखील काम असल्याने आपण दिल्ली निघालो आहे. भाजपा मध्ये जाणार असल्यास आपल्याला नक्की कळविनार असल्याचं ही खडसे यांनी म्हटलं आहे. मात्र गेल्या काही दिवसात एकनाथ खडसे यांच्या हालचाली पाहता त्यांच्या विषयी राजकीय क्षेत्रात मात्र विविध चर्चा रंगू लागल्या आहे.

 

Prakash Ambedkar : अकोल्यात वंचितला समर्थन देण्याची काँग्रेसची तयारी

Maharashtra Politics : अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकर यांना समर्थन देण्याची काँग्रेसची तयारी..


प्रकाश आंबेडकरांनी यांनी काँग्रेसला 7 जागेवर समर्थन देण्याची तयारी आधीच दाखल्या नंतर ..


अकोल्याच्या जागेला घेऊन  काँग्रेस गटात हालचाली सुरु झाल्या आहे ..


नागपूर व कोल्हापूर जागेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन दिले आहे, आंबेडरकारचे समर्थन कोणत्या जागेवर हवे यासाठी उर्वरित 5 जागेची यादी आज काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले  प्रकाश आंबेडकर यांना देणार आहे

Sangli NCB Action : ड्रग्ज तयार करण्यासाठी लाखो रुपयांचे केमिकल जप्त

सांगली : तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे साडे अकरा लाखाचे केमिकल जप्त केले. हे केमिकल कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील ड्रग्ज कारवाईशी संबंधित असून तेथील संशयितानीच ठेवले होते. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथक आणि तासगाव पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत संशयीत द्रव पदार्थ क्लोरोफॉर्मने भरलेले एकूण २८० कि.ग्रॉम वजनाचे एकूण १५ बॅरेल आणि संशयित द्वव पदार्थ असलेले ४० लिटर क्षमतेचे एकूण १२ कॅन असा एकूण ११,३६, ३७০ रुपयांचा संशयित द्रव पदार्थ जप्त केला आहे.


मुंबई गुन्हे शाखेने दि. 23 मार्च रोजी इरळी येथे कारवाई करत मोठा ड्रग्जसाठा जप्त केला होता. या कारवाईत प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिदे (रा. बलगवडे ता. तासगांव ), प्रसाद मोहिते ( रा. माजर्ड ता. तासगांव) आणि इतर ४ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी  माजर्डे येथील दत्तनगर ते वायफळे जाणारे रोडजवळ बाळासो मोहिते यांच्या घरालगत असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये संशयीत द्रव पदार्थाचा साठा करुन ठेवला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदारांना मिळाली.

 

या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार  यांना कारवाईचे  आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तासगावचे निवासी नायब तहसिदार धनश्री स्वामी, अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक कारंडे,  वॉलचंद कॉलेजच्या रसायन शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक  अनिल  पोवार आणि पंचाना बरोबर घेऊन त्या ठिकाणी कारवाई केली.
Chandrapur Kishore Jorgewar Naraji : चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार निवडणुकीच्या प्रचारापासून पूर्णपणे अलिप्त

Chandrapur News : चंद्रपूर लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची मानली जात आहे. मात्र असं असताना या निवडणुकीच्या रणधुमाळीतून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे पूर्णपणे अलिप्त आहे. विशेष म्हणजे जोरगेवार हे महायुती सरकारचे समर्थक आहेत, मात्र ते महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारात कुठेही दिसून येत नसल्याने त्यांच्या मनात काय आहे, हा प्रश्न निर्माण झालाय. किशोर जोरगेवार हे एके काळात भाजपमध्ये असताना मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र गेल्या काही वर्षात मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचे संबंध कमालीचे ताणल्या गेल्याने त्यांनी मुनगंटीवार यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. महायुतीच्या उमेदवाराकडून अजून कुठलाच संपर्क झालेला नाही, त्यामुळे मी कुठेच प्रचारात दिसत नाही, असं म्हणत कदाचित माझी गरज नसेल म्हणून त्यांनी मला संपर्क केला नसेल, असा टोला त्यांनी मुनगंटीवारांना लगावलाय. सोबतच धानोरकर कुटुंबाशी खूप आधीपासून संबंध आहेत, त्यामुळे माझ्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या आल्या होत्या, मात्र राजकीय चर्चा झाली नाही, असं म्हणत निवडणुकीत कोणाला मदत करणार या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं.

Beed Accident : लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघातात जागीच ठार
बीड : महिनाभरावर आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई जवळील वाघाळा पाटीजवळ रात्री झाला. लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (ता. रेणापूर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) या तरुणाचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल त्याची राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर - छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. सेवालाल आणि दिपाली हे त्यांच्या मातापित्यांचे दोघेच अपत्य होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वाराती रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली.
Nashik Liquor Seized : २३ लाख १३ हजारांची अवैध दारू जप्त...

देवळा : लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालेगाव पथकाने देवळा येथे सापळा रचून वाहनांची तपासणी करतांना विदेशी मद्याचे तब्बल २०१ बॉक्स जप्त केले. आयशर गाडीची तपासणी केली असता गाडीच्या चोर कप्प्यात हे बॉक्स दडवलेले होते..या कारवाईत आयशर ट्रकसह एकूण २३ लाख १३ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारीख मिळत नव्हती. अखेर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 

PM Modi Sabha in Maharashtra : राज्यात पंतप्रधान मोदींच्या जवळपास 10 सभांचे नियोजन

PM Modi Maharashtra Visit : एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात मोदींच्या सभांचा धडाका


राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचे नियोजन


लवकरच मोदींच्या सभांच्या तारखा जाहीर होणार


मोदींच्या सभांसोबत राज्यात अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्याही होणार सभा

Maharashtra Politics : विनायक मेटे यांच्या लहान भावाची संघटना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता

एकीकडे शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे विनायक मेटे यांच्या लहान भावाची संघटना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता


विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन


पुढील दोन-तीन दिवसात जय शिवसंग्राम ही संघटना महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता


विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहभागा संदर्भातला निर्णय 48 तासात होण्याची शक्यता

Pune Fire : टेम्पो आणि कारला आग

Pune Fire News : रविवारी मध्यराञी दोन वाजता जुना मुंढवा रस्ता, बोराटे वस्ती  येथे इमारती बाहेर उभ्या असलेल्या टेम्पो आणि कारला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून जखमी कोणी नाही. आगीचं कारण संजू शकलेला नाही. 

Nashik Malegaon : रमजान महिन्यात भिंतीवर कुराणाच्या आयात उमटल्याचा दावा

Malegaon News : नाशिकच्या मालेगाव शहरातील नवीन आझाद नगर गल्ली नंबर 3 येथील अल्ताफ रिक्षावाला यांच्या घरातील भिंतीवर मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणातील ओवी म्हणजे आयात उमटल्याचा दावा करण्यात आला. या आयात पाहण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली आहे. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून घरातील भिंती स्वच्छ केल्यानंतर या कुराणाच्या आयात उमटल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : मोहटा देवी गडावरून निलेश लंके यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी गडावरून निलेश लंके "स्वाभिमान जनसंवाद यात्रा" काढत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Raigad Lok Sabha : ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचाराचा शुभारंभ

रायगड : आजपासून रायगडमध्ये लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचाराचा शुभारंभ


पोलादपूर महाड मध्ये आज ठिकठिकाणी गीतेंच्या सभा 


सुनील तटकरे विरुद्ध अनंत गिते असा रंगणार महासंग्राम

Mahadev Jankar : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

Mahadev Jankar : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस,अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे राहणार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी लोकसभेची उमेदवारी मिळवलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परभणी शहरातील शनिवार बाजार येथुन महादेव जानकर यांच्या रॅलीला सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात या रॅलीचे सभेत रूपांतर होईल या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडेही उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे.या सभेच्या स्थळाची परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे.

Wardha Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाचे अमर काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार

Lok Sabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित राहतील अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Wardha Lok Sabha Election 2024 : शरद पवार ग अमर काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार

Lok Sabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित राहतील अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Bhiwandi News : भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी

Bhiwandi News : भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास अचानक यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या कारखान्यामध्ये 48 यंत्रमाग होते आणि हा भला मोठा कारखाना लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. या कारखान्यामध्ये आठ मजूर काम करत होते. पहाटेची वेळ असल्याने पाच मजूर नाश्त्यासाठी कारखान्याच्या बाहेर गेले होते उर्वरित तीन मजूर कारखाना कोसळल्याने ढिगाराखाली गाढले गेले होते. घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी तात्काळ मदतीचा हात लावला आणि भिवंडी अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी पोलीस करीत असून आपत्कालीन विभाग तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून चाचपणी सुरू आहे.

Navneet Rana : नवनीत राणाच्या विजयासाठी भाजपचा मेगा प्लान

Amravati News : अबकी बार 400 पार मध्ये अमरावतीची जागा ही सर्वात जास्त मतांनी निवडून गेली पाहीजे यासाठी अमरावती भाजपाने नवनीत राणासाठी मेगा प्लान आखला आहे. अमरावती भाजपाचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा देखील हजर होत्या. यावेळी भाजप नेत्यांनी एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहिला नाही पाहीजे. सगळ्यांनी नवनीत राणा यांच्या विजयासाठी 26 दिवस-रात्र मेहनत करावी तसंच 4 तारखेला नामांकन दाखल करतांना जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि लोकं हजर राहतील याचं नियोजन करण्यात आले.

Sindhudurg Liquor Seized : 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्र किंवा अन्य राज्यात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आज पहाटेच्या सुमारास गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर गोव्यातून आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काळोखाचा फायदा घेत चालक फरारी होण्यात यशस्वी झाला. भरारी पथकाने 30 लाख रुपये किमतीची दारू आणि 12 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. हि कारवाई आज पहाटे करण्यात आली.

Deepak Kesarkar : दीपक केसरकरांना निवडणुकीच्या काळात शस्त्र जमा करण्याचे आदेश

Sindhudurg News : राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात शस्त्र ( बंदूक / रिवाल्वर  ) जमा करण्याचे आदेश


जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी काढलेल्या आदेशामध्ये मंत्री दीपक केसरकर यांचे देखील नाव

 

सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

 6 जून 2024 म्हणजेच निवडणुका पूर्ण होईपर्यंत केसरकर यांचं शस्त्र राहणार पोलिसांच्या ताब्यात
Nilesh Lanke Swabhiman Yatra : निलेश लंके यांची 'स्वाभिमान जनसंवाद यात्रा'

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार असून, पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी गडावरून निलेश लंके "स्वाभिमान जनसंवाद यात्रा" काढत आहेत. 1 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान ही "स्वाभिमान जनसंवाद यात्रा" निघणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Wada - Manor Road : वाडा-मनोर महामार्ग अवजड वाहतुकीस बंद

पालघर : मनोर वाडा भिवंडी ह्या राज्यमार्गाची दयनीय अवस्था असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला हा पर्यायी मार्ग म्हणून समजला जातो. वाडा मनोर  महामार्गाच्या देहेरजा नदीवरील करळगाव येथील पूल धोकादायक बनल्याने हा राज्य महामार्ग रात्रीपासून अवजड वाहतुकीस बंद करण्यात आला असून भिवंडी वाडा मार्गे येणारी वाहतूक विक्रमगड मार्गे चारोटी अशी वळवण्यात आले आहे. तर मनोर मार्गे वाड्याकडे जाणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे, त्यामुळे मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर उपमार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाला आहे.

Ramtek Lok Sabha Election 2024 : रश्मी बर्वे जातवैद्यता प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज प्रकरणी सुनावणी

Lok Sabha Election 2024 : रामटेकमधून अपात्र ठरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातवैद्यता प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द या दोन्ही प्रकारणावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी होत आहे. रश्मी बर्वे यांनी या संदर्भात तातडीने सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तात्काळ सुनावणी द्यायला नकार दिला. त्यामुळे आज नागपूर खंडपीठाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक न्याय आणि विशेष अर्थसाह्य विभागाच्या 22 मार्च च्या आदेशानुसार जात वैद्यता पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करत ते रद्द केले होते. त्या आधारावर रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला. या दोन्ही निर्णयाला रश्मी बर्वे यांच्याकडून नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले.

RBI : आरबीआयचे आज 90 व्या वर्षात पदार्पण, आरबीआयच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक आज 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईतल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉइंट येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय...  या कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.