Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jan 2024 11:05 PM
Latur News : लातूरमध्ये 2 लाख 30 हजार दिव्यातून साकारली श्रीरामचा प्रतिमा, नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी

अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह आहे. त्याच पार्श्वभूमीवर लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून श्रीरामाची भव्य प्रतिमा साकारण्यात आलीये. तब्बल 2 लाख 30 हजार दिव्यांच्या माध्यमातून ही प्रतिमा साकारण्यात आलीये. मागील एका महिन्यापासून ही प्रतिमा साकारण्याचे काम सुरु होते. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे काम सुरु करण्यात आले. सध्या या कलाकृतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आलीये. 

Bhiwandi News : भिवंडीत 22 तारखेला मांस मच्छीची दुकानं बंद, आयुक्तांचे आदेश; पुण्यातही मटण, चिकन विक्री बंद, व्यावसायिकांचा निर्णय

Bhiwandi News : राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या एकच उत्साहाचा विषय आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचलीये. त्याच पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये मांस आणि मच्छीची विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेत. यासंदर्भातले एक परिपत्रक देखील त्यांनी जारी केले आहे. भिवंडीसह पुण्यातही 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

विकासकामांकरिता शेकडो एकर कांदळवनाची कत्तल करता आणि एका तिवरासाठी बांधकाम थांबवता? हायकोर्टाची नाराजी

विमानतळासाठी शेकडो एकर कांदळवनाची कत्तल चालते, पण एका तिवराच्या झाडासाठी इमारतीचं बांधकाम थांबवता? नवी मुंबई प्रशासन मेगा प्रकल्प पूर्ण करण्यास नेहमीच आग्रही असतं. प्रस्तावित विमानतळाच्या बांधकामात सखल भागाचा अडथळा आल्यास तिथल्या अनेक एकर तिवरांची कत्तल करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली जाते. हा जनहिताच्या प्रकल्पासाठी परवानगी द्या, अशी विनवणी केली जाते. मात्र एक तिवराचं झाड बाधित होऊ शकतं म्हणून निवासी इमारतीच्या बांधकामाला परवानगी दिली जात नाही?, ही भूमिका योग्य नाही असा संताप मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेबाबत व्यक्त केला.

Rohit Pawar : 24 ऐवजी 22 तारखेला चौकशीला बोलवा, ईडीच्या समन्सनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar :  ईडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना समन्स बजावण्यात आलं आहे. त्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलीये. त्यांनी यावेळी ईडीला विनंती केलीये. त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 24 ऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं.तशी माझी तयारी आहे.

Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील, पण काही जण ऐकायलाच तयार नाही, अजित पवारांचा मनोज जरांगेंवर निशाणा 

Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशीलच आहे. पण काही जण ऐकायला तयार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला. तसेच पुन्हा एकदा अजित पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावर आहे. त्यातच मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करतील. 

पक्षाने संधी दिली तर कळवा-मुंब्रा मतदार संघातून आमदारकी लढणार- माजी नगरसेवक नजीब मुल्ला

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे खंदे समर्थक समजले जाणारे नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादीच्या दादा गटाला समर्थन दिले आहे. नजीब मुल्ला हे आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असल्याचे राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्यापूर्वीच ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के नजीब मुल्ला यांच्या मागील वाढदिवसानिमित्त म्हणाले होते. दरम्यान आता त्यांनी देखील पक्षाने संधी दिली तर आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. 

छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवर नक्षत्रवाडी जवळ भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवर नक्षत्रवाडी जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. माहितीनुसार,  धुळे सोलापूर हायवे वरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. त्यावेळी हा अपघात झाला. उतारावरून ट्रक खाली उतरत असताना ट्रकने 3 कार, 7 दुचाकी आणि 1 रिक्षा चिरडल्या. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच अरुंद रस्ता आणि त्यात काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीत झालेली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. 

Virar News : विरारमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा

Virar News : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी सध्या राज्यभर "डीप क्लीन ड्राईव्ह" स्वच्छतेची मोहीम सुरु आहे. स्वतः मुख्यमंत्री यात सहभाग घेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्राच्या जवळच्या विरारमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहे. विरार पूर्वेकडील कोपरी गाव येथील आदर्श बेकरीच्या समोर गेल्या पाच दिवसांपासून मोठ मोठे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा एकाच ठिकाणी पडून राहिल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. वसई विरारमध्ये शहराची स्वच्छता करण्यासाठी विविध यंत्रणा आहेत. त्यासाठी महापालिकेकडून करोडो रुपये खर्चही केला जात आहे. तरी देखील शहराची स्वच्छता होताना दिसत नाही. हजारो कर्मचारी दररोज शहरात स्वच्छता करतात. मात्र, काही ठिकाणी कच-याचे साठलेले ढिगारे दिसून येतात. स्वच्छता कर भरून देखील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत.

Bhiwandi News : भिवंडीची पुढील तीस वर्षांसाठी पाण्याची चिंता मिटली, 100 एमएलटी पाणीपुरवठा योजनेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

Bhiwandi News :  भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शासनाकडून 426 कोटी रुपयांची 100 एमएलटी पाणीपुरवठा योजनेला मंजूरी देण्यात आलीये. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मध्ये या योजनेला मूर्त स्वरुप देण्यात आले. पंतप्रधान मोदी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. तसेच भिवंडी शहरातील ताडाळी येथील हनुमान मंदिर प्रांगणात हा शुभारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

Jalgaon News : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जळगावमध्ये तीन हजार किलोचा बुंदी प्रसाद 

Jalgaon News : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यामध्ये तीन हजार किलो बुंदी प्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले असून बुंदी बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी प्रत्येक सामान्य व्यक्तीला अयोध्येला जाणं शक्य नसले तरी गावागावांत त्याचा प्रसाद पोहोचविण्यासाठी श्रीराम भक्तांच्या सोबत भाजपाचे कार्यकर्ते अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर आणि भाजप कार्यकर्ते आश्विन सोनवणे यांनी तीन हजार किलो बुंदीचा प्रसाद वाटपाचे नियोजन केले असून, त्यासाठी बुंदी बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. स्वतः आश्विन सोनवणे हे या बुंदी बनविण्याच्या कामासह वाटपाच्या नियोजनात जातीने लक्ष ठेऊन आहेत.


 

Ram Mandir : महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय 

Ram Mandir :  महाराष्ट्रतही 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीये. सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरामुळे मूर्तिकारांकडे श्रीरामांच्या मूर्तीच्या मागणीत मोठी वाढ

Ram Mandir Ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला विराजमान होणार असल्याने हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. राज्यभरात अनेक सार्वजनिक मंडळांकडून ढोल ताशाच्या तालावर वाजत गाजत श्रीरामाची भव्य मिरवणूक काढली जाणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तिकारांकडे श्रीरामांच्या मूर्तीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार वरूण भोईर यांच्याकडे अगदी 3 फुटापासून ते 13 फुटांपर्यतच्या मूर्ती सध्या साकारल्या जात असून त्यांचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. 

Kishori Pednekar : रोहित पवारांपाठोपाठ किशोरी पेडणेकरही ईडीच्या रडारवर, कथित  बॉडी बॅग प्रकरणांत समन्स 

Kishori Pednekar : ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीकडून समन्स बजाविण्यात आलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Rohit Pawar : रोहित पवार यांना ईडीची नोटीस,  24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश 

Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. 

Sharad Pawar : निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय - शरद पवार 

Sharad Pawar :  सोलापुरातील कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय. श्री राम यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे. मात्र या राज्यकर्त्यांना त्याबद्दल महत्व वाटत नाही. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, महागाई वाढली आहे, महिलांचे प्रश्न कायम आहेत, असं शरद पवारांनी म्हटलं. 

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत रामललाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांपत्याला

Ram Mandir Ayodhya : 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामललाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांपत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दांपत्य देखील आहेत. विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. विठ्ठल कांबळे हे पेश्याने टीचर असून आरएसएसचे रायगड जिल्हा सेक्रेटरी आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे काढण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती. मात्र, त्यांनाच निमंत्रण येईल आणि ते देखील थेट रामललाच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. त्यामुळे आयुष्याचे सार्थ झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी व्यक्त केली.

Ram Mandir Ayodhya : बदलती आयोध्या नगरी! अयोध्यामध्ये रामभक्तांच्या सेवेत राहण्यासाठी पहिली डॉर्मेटरी आणि भव्य फूडकोर्ट व्यवस्था 

Ram Mandir Ayodhya : येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जर तुम्ही अयोध्येत येणार असाल किंवा तुम्ही आलाय असाल आणि जर तुम्हाला राहण्याची सोय होत नसेल तर याच अयोध्येत पहिली डॉर्मेटरी सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त 650 रुपये देऊन तुम्ही जवळपास सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहात. अरुंधती फूड अँड हॉस्पिटल सर्विसेसच्या माध्यमातून या डॉर्मेटरीबरोबर अयोध्यामध्ये सर्वात मोठं फूड कोर्ट तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 350 पेक्षा अधिक या फूड कोर्टमध्ये भोजनासाठी बसू शकतात. मुंबई, दिल्ली, लखनऊ प्रमाणे अयोध्येत मोठ्या शहरांप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळेच मागील वर्षभरात अयोध्या पूर्णपणे बदललेली पाहायला मिळतेय. 


 

Ram Mandir Ayodhya : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल 

Ram Mandir Ayodhya : अयोध्यामध्ये कडाक्याची थंडी असून अगदी आठ ते दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान मागील दोन दिवसांपासून पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या राम भक्तांना या थंडीत काहीशी ऊब मिळावी यासाठी खास अयोध्या नगर निगमकडून हिटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये, मुख्य रस्त्यांवर मंदिराजवळ अशा प्रकारचे हीटर लावण्यात आले आहेत. जिथे राम भक्त थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि ऊब मिळावी यासाठी हिटरभोवती गर्दी करतायत. 

Palghar News : वाढवण बंदर संदर्भातल्या जनसुनावणीच्या सभा मंडपाबाहेर स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Palghar News : वाढवण बंदर संदर्भातल्या जनसुनावणीच्या सभा मंडपाबाहेर स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढवण बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी सुनावणीसाठी सरकारने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून लोक आणल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. बंदराचं समर्थन करण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यांमधून नागरिक बोलवल्याचाही स्थानिक भूमिपुत्रांचा आरोप आहे.

Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं पहिलं रूप

Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीरामांची येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होतेय. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं पहिलं रूप समोर आलं आहे. 


 



Ram Mandir Ayodhya : दिल्लीतील शंभरहून अधिक शीख बांधवांकडून अयोध्येत राम भक्तांची सेवा; लंगर लावून लाखो राम भक्तांना भोजनाचा लाभ

Ram Mandir Ayodhya : श्रीराम जन्मभूमी अयोध्येत सर्व जाती-धर्माचे राम भक्त ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, अयोध्येत दाखल होत आहेत. आता या राम भक्तांच्या सेवेमध्ये शीख समुदायसुद्धा मागे नाही. दिल्लीहून आलेल्या शीख बांधवांनी सकाळपासून रात्रीपर्यंत लाखो राम भक्तांसाठी लंगर सुरू केला आहे. हा प्रसाद सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत अयोध्येमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत वाटला जाणार असून देशभरातून येणाऱ्या राम भक्तांची भूक भागवली जाणार आहे. शंभरहून अधिक शीख बांधव हे दिल्लीतून या सेवेसाठी आयोध्येत आले आहेत. 

Thane News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शिलेदाराचा भावी आमदार म्हणून उल्लेख...
Thane News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाणे शहरात काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांना तर काही कार्यकर्त्यांनी अजिदादा गटाला समर्थन दिले. यामधीलच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे शिलेदार माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव अनेकदा चर्चेत आले आहे. नजीब मुल्ला आमदारकीचे परफेक्ट मटेरियल आहे असा उल्लेख माजी महापौर प्रवक्ते नरेश मस्के यांनी केला होता. अशातच ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर नजीब मुल्लांच्या वाढदिवसानिमित्त यंदा अजिदादा गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र, यात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा मजकूर 'डॅशिंग दमदार भावी आमदार' हा बॅनर अजितदादा गटाकडून नव्हे तर शिंदे गटाकडून लावण्यात आला आहे. 

 

 
Nandurbar News : नंदुरबारमधून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 2000 समाज बांधव मुंबईकडे कूच करणार....

Nandurbar News : मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला असून मराठा आरक्षण घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी इथून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. या मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातूनही 2000 मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. 20 जानेवारीला सकाळी नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. हे समाज बांधव 26 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. या संदर्भात माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नंदुरबार शहरात पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. त्या वाहनांनी तर काही समाज बांधव सायकलीने मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांच्या वतीने देण्यात आली आहे.

Nashik News : बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; अपघातात 1 जण ठार..

Nashik News : नाशिकच्या मनमाड-मालेगाव रोडवरील चोंढी घाटाच्या पायथ्याशी एका अवघड वळणावर भरधाव बस आणि कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर बसमधील 7 ते 8 प्रवाशी जखमी झाले आहेत. ही बस मनमाडहून नंदुरबारकड़ जात असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगावच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Ahmednagar News : आमदार राम शिंदेंचे आमदार रोहित पवारांना प्रत्युत्तर

Ahmednagar News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. दरम्यान राज्यात सुरू असलेल्या स्वच्छता मोहीमेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर टीका केली होती, केवळ फोटोसाठी आणि व्हिडीओसाठी स्वच्छता केली जात असल्याचे त्यांनी म्हटलं होतं यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी फोटो सेशन करावं, हातात पोछा घ्यावा, स्वच्छता करावी, त्यांना कुणी अडवले आहे...पंतप्रधान मोदींनी सर्वांना आवाहन केलं आहे या अभियानात सहभागी व्हा म्हणून पण एवढ्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलला विराजमान होत आहेत सर्वच उत्साही आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छता केली जातेय पण विरोधकांनी अशा पद्धतीने बोलणे गैर आहे असं राम शिंदे म्हणाले.

Mumbai Crime News: मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराचा प्रेयसीवर धारदार शस्त्रानं हल्ला

Mumbai Crime News: मुंबई मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रेयसीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. प्रेयसीवरील हल्ल्यानंतर प्रियकराने स्वतःवरही हल्ला करून जखमी करून घेतले आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Vadodara Boat Accident: वडोदरा दुर्घटनेत 12 विद्यार्थ्यांचा करुण अंत, गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत जाहीर

Vadodara Boat Accident: गुजरातमधील वडोदरामध्ये बोट तलावात उलटून झालेल्या भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय.. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. क्षमतेपेक्षा जास्त जण बोटीत बसल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. 

Nagpur Fire : नागपुरात सेमिनरी हिल परिसरात एका घराला भीषण आग

Nagpur Fire : नागपुरात सेमिनरी हिल परिसरात एका घराला भीषण आग लागली. या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगी लागली तेव्हा घरात 7 वर्षाची बहिण आणि 2 लहान भाऊ होते. मात्र बहिण तातडीने घराबाहेर आल्याने सुदैवानं तिचा जीव वाचला. मात्र दोन भावांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. 

Buldana : रविकांत तुपकरांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात


Buldana : रविकांत तुपकरांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात



बुलढाण्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक

मलकापूर रेल्वे स्थानकात सरकारविरोधात घोषणाबाजी

रेल्वे रोखण्यासाठी शेतकरी आक्रमक

Rajan Salvi ACB Raids: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ACBकडून साळवींच्या घराची तब्बल दहा तास झाडाझडती


Rajan Salvi ACB Raids: मोठी राजकीय बातमी म्हणजे, ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या एसीबी चौकशीची. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीनं साळवींच्या घराची तब्बल दहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात आली.. संपूर्ण चौकशीवेळी राजन साळवींच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. ठाकरेंसोबत असलेल्यांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केलाय.


Ram Mandir Pran Pratishtha: प्रभू श्रीरामाची मूर्ती नव्या मंदिरात स्थानापन्न

Ram Mandir Pran Pratishtha: प्रभू श्रीरामाची मूर्ती नव्या मंदिरात स्थानापन्न, मंदिरात विधीवत पूजा करुन मुर्तीची झाली स्थापना, स्थानापन्न झालेल्या  रामाच्या मूर्तीची दृश्ये माझाच्या हाती.

Buldana News: बुलढाण्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

Buldana News: बुलढाण्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक

मलकापूर रेल्वे स्थानकात सरकारविरोधात घोषणाबाजी

रेल्वे रोखण्यासाठी शेतकरी रेल्वे आक्रमक


रविकांत तुपकरांना कालच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

CM Eknath Shinde in Mumbai: दावोसमधील चार दिवसांच्या जागतिक आर्थिक परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतले

CM Eknath Shinde in Mumbai: दावोसमध्ये चार दिवस जागतिक आर्थिक परिषद पार पडली. या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंतही सहभागी झाले होते. चार दिवसांचा दावोस दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय.  यावेळी दावोसमध्ये जवळपास 4 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. 

PM Narendra Modi Solapur Visit Today LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा

PM Narendra Modi Solapur Visit Today LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारी इथे साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


PM Narendra Modi Solapur Visit Today : सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देश-विदेशातील दिग्गजांना रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. देशभरातील रामभक्तांना आता फक्त रामललाच्या भेटीची ओढ लागली आहे. देशातील प्रत्येकाच्या मनी रामललाच्या दर्शनाची आस आहे. यापूर्वी गुरुवारी, 18 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.