Maharashtra News LIVE Updates : बर्निंग 'ट्रक'चा थरार! ट्रकने अचानक घेतला पेट, नाशिकच्या लेखानगर परिसरातील घटना
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Baramati News : बारामती शहरातील सिटी इन चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा एक आगळावेगळा फलक लागला आहे.. या फलकावर निर्धार महाविजयाचा असा संदेश नमूद करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणुक लढवतील अशी शक्यता आहे.. त्यामुळं एका कार्यकर्त्यानं लावलेला हा फलक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरलाय.
SBI News : स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खरा यांनी निवडणूक रोखे प्रश्नी सरकारला खूष करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जी बोटचेपी भूमिका घेतली आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने ज्या पध्दतीने स्टेट बँकेला फटकारले, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतिमेला जो धक्का पोहोचला. सोबतच बॅंकेवर विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह उभे राहिले, ते लक्षात घेता स्टेट बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर यांनी त्वरीत पायउतार व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात येत आहे
Fadnavis In Karnataka : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर
लोकसभेच्या अनुषगांने मंगलोर मध्ये क्लस्टर बैठकीला लावणार हजेरी
लोकसभेचा आढावा घेण्यासाठी एक दिवसाचा दौरा
GST Dept New 522 Jobs : वस्तू आणि सेवा कर विभागात नवीन 522 पदांना मान्यता देण्याचा सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच वस्तू कर व सेवा कर विभागाच्या 12 हजार 259 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील मान्यता देण्यात आली. नवीन पदांमध्ये 9 पदे अपर राज्य कर आयुक्त, 30 राज्य कर सह आयुक्त, 36 राज्य कर उपायुक्त, 143 सहायक राज्य कर आयुक्त, 275 राज्य कर अधिकारी, 27 राज्य कर निरिक्षक आणि 2 स्वीय सहायक लघुलेखक गट-अ अशा पदांचा समावेश आहे. राज्याच्या कर संकलनाचा हिस्सा देशाच्या 15 टक्के आहे. तसेच महसुलामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. राज्याच्या एकूण महसुलात जीएसटीचा हिस्सा 68 टक्के असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज भासत होती.
BJP Candidates in Maharashtra : भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू
दिल्लीतील भाजप मुख्यालयात बैठक सुरु आहे
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत प्रथम महाराष्ट्र राज्यांच्या उमेदवारावर निर्णय घेण्यात येणार आहे
काही जागांबाबत निर्णय नक्की झाला आहे
त्यानंतर कर्नाटकमधील लोकसभा उमेदवारांच्या नावावर निर्णय घेण्यात येणार
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत सहभागी होणार आहेत
Nashik News : नाशिकच्या लेखानगर परिसरात उड्डाण पुलावर ट्रकने घेतला अचानक पेट
- मुंबई आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
- चालकाचा ताबा सुटून डिव्हायडरवर ट्रक आदळल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
- घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब आणि अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल
- आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
- घटनेत चालक आणि वाहक सुखरूप
Sunil Shelke : अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंकेचा महाविकास आघाडी बळी घेतेय, असा आरोप निलेश लंकेंचे जवळचे मित्र आणि आमदार सुनील शेळके यांनी केलाय. लंकेना दक्षिण नगरमधून लोकसभा लढायची अजिबात इच्छा नाही. पण रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला, त्यामुळं जाणीवपूर्वक त्यांना मविआकडून आग्रह केला जातोय, असा दावा शेळकेंनी केलाय. शेळकेंना नुकतंच शरद पवारांनी सज्जड दम दिला होता, मात्र आता या प्रकरणाला सोडून मी पुढं जाणार आहे, पण मी पवार साहेबांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Ambajhari Improvement : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नागपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती... तेव्हा अंबाझरी तलावाचा ओव्हर फ्लो होऊन अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. लोकांचा लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता नागपूर महानगरपालिकेने अंबाझरी तलावातून ओव्हरफ्लो होऊन पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी अनेक उपाययोजना सुरू केले आहे.. त्या अंतर्गत अंबाझरी तलावाच्या सांडव्याच्या मजबुतीकरणाचे काम सिंचन विभागाकडून केले जात आहे... तसेच अंबाझरी तलावाच्या सांडव्यावरून बाहेर पडणारे पाणी पुन्हा नाग नदीतून वाहत असताना विवेकानंद स्मारकाच्या जवळ नाग नदीच्या पुलाची रुंदी वाढवण्याचे निर्णय ही घेण्यात आले आहे. शिवाय नागपूर शहरात वाहणाऱ्या नाग नदीचे गाळ ही काढले जात आहे.. तसेच नाग नदीचे खोलीकरण केले जात आहे.. तसेच नदीच्या पात्र भोवतीचे अतिक्रमण काढले जात आहेत.
जालना : जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून,या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय दुपारी साडेबारा च्या आंतराष्ट्रीय नंबर वरून अज्ञात व्यक्तीने फोन करून गोरंट्याल यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली, या प्रकरणी गोरंट्याल यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय.
Karmala News : करमाळा तालुक्यातील गेल्या 41 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी आज ग्रामस्थांनी करमाळा तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या 40 गावांनी यापूर्वीच लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे . यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत. यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून आतापर्यंत वीट येथील रास्ता रोको सह तहसील कार्यालयात वारंवार निवेदने देऊन, बैठका घेऊन आणि गावोगावी जनजागृती सभा घेऊन या समितीने आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
काँग्रेस पक्षातलेच काही लोकं सातत्याने माझा विरोध करत आहे आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा त्यांनी जीव घेतल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसच्या आमदार आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे, इतकंच नाही तर आमच्या पक्षात भाजपच्या पे रोलवर चालणारे काही लोकं आहेत आणि भाजपवाले जे ऑर्डर देतात ते ते ऑर्डर ते फॉलो करतात आणि भाजप मध्ये मी जाणार असल्याच्या वावड्या आमच्याच पक्षातील लोकांनी भाजपच्या सांगण्यावरून पसरवल्या असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय. मात्र मी काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याचा प्रतिभा धानोरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना पुनरुच्चार केलाय.
CAA Implemented : देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA साठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 10 फेब्रुवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली होती. दरम्यान, आता सीएएच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सरकारने याबाबत सोमवारी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. (CAA Rules Notification Modi Govt Centre Announces Implementation of Citizenship Amendment Act)
सोमवार दि.११ मार्च, २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय -संक्षिप्त
बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार
( गृहनिर्माण विभाग)
बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.
( गृहनिर्माण विभाग)
एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी
( नगरविकास )
मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार
( नगरविकास विभाग)
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
( राज्य उत्पादन शुल्क)
जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता
( वित्त विभाग)
राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
(गृह विभाग)
एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने
(कामगार विभाग)
विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
(विधि व न्याय विभाग)
राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प
(नियोजन विभाग)
अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार
( नगरविकास विभाग)
शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक
( महिला व बालकल्याण विभाग)
उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ
( ऊर्जा विभाग)
६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता
( आदिवासी विकास विभाग)
आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
( आदिवासी विकास विभाग)
राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता
( सामाजिक न्याय विभाग)
दिल्लीत जागावाटपासंदर्भात होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी दुपारनंतर दिल्लीला जाणार आहेत.
दिल्लीत जागावाटपासंदर्भात होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी दुपारनंतर दिल्लीला जाणार आहेत.
मागे जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा शिवसेनेने जिंकलेले सर्व 18 जागा आम्हाला मिळाले पाहिजे ही आमची मागणी होती. राज्यात अद्याप महायुतीचे जागा जाहीर झाले नाहीत, नाशिक सह शिवसेनेच्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा मोठा दावा
- शांतिगिरी महाराज संत आहेत आम्ही देखील त्यांचा आदर करतो. आमच्या उमेदवारी बाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. आचारसंहिता लागल्यावर एक दोन दिवसात उमेदवारी जाहीर होतील
काल आमदार रवींद्र वायकर यांचा प्रवेश शिवसेनेत झाला. नेहमी प्रमाणे स्वतःच्या चुका दुसऱ्यावर लादण्याचे काम त्याचा मालक आणि संजय राजाराम राऊत करत आहे. रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधील सदस्य. थेट मातोश्रीच्या वहिनींच्या संपर्कात असलेले सदस्य. मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या कंपनीचे पार्टनर. रवींद्र वायकर जेव्हा स्वतः अडचणीत आले आणि उद्धव ठाकरेंकडे गेले तेव्हा त्यांना काय उत्तर देण्यात आले. जे उत्तर सरनाईक आणि यशवंत जाधव यांना दिले तेच उत्तर वायकर यांना दिले.
तुम्ही तुमचे बघून घ्या आम्हाला यात टाकू नका. आता कुठलाही स्वाभिमान असलेला शिवसैनिक ज्याला हे कळत जेवढी ताकद उद्धवजी स्वतःच्या मुलाला दिशा सालीयन केसमध्ये वाचवण्यासाठी लावतात, आपल्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी लावतात तेवढी ताकद ते शिवसैनिकाना वाचवण्यासाठी वापरत नाहीत. याची जाणीव आणि अनुभव त्यांना असल्यामुळे त्यांनी आपल्या भवितव्यासाठी आपल्या मतदारांसाठी योग्य तो निर्णय घेतला.
संजय राऊतने भाजप आणि शिंदे साहेबाबद्दल आग पाखड करण्यापेक्षा तुझा मालक हा ज्या पद्धतीने युज अँड थ्रो पॉलिसी वापरतो. एखाद्याला वापरायचे आणि सोडून द्यायचे यामुळे निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला सोडून जातात हे तुम्हाला कधी कळणार?
मुंबई दिनांक ११: वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज देण्यात आल्या. या सदनिका लॉटरी पद्धतीने देण्यात येत असून आज ६ शासकीय कर्मचाऱ्यांना सह्याद्री अतिथीगृह येथे प्रतिकात्मकरित्या या चाव्या देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते
यावेळी प्रभा जाधव, मनीषा मोरे, सुरेखा जाधव, सचिन कोळवणकर, जितेंद्र नाईक, प्रमोद कासले या शासकीय कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. याप्रसंगी अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदींची उपस्थिती होती.
वांद्रे येथील शासकीय जमिनीवर ९६ एकर जागेत १९५८ ते १९७३ च्या दरम्यान शासकीय वसाहत बाधण्यात आलेली आहे. वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये, शासकीय अधिकारी व कर्मचा- याकरिता वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, व वर्ग-४ नुसार ३७० इमारतीमध्ये एकुण ४७८२ सदनिका आहेत.
वांद्रे वसाहतीमधील एकूण ३७० इमारतीपैकी धोकादायक असलेल्या ६८ इमारती पाडण्यात आलेल्या असून, या इमारतीच्या जागेवर सद्यस्थितीत टप्पा-१ अंतर्गत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकरिता इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या चतुर्थ श्रेणीकरीता एकूण २०१२ निवासस्थानचे बांधकाम सुरु आहे सदर निवासस्थाने ही टप्याटप्याने उपलब्ध होणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात इमारत क्र.सी-१, ए-१ व बी-२ तसेच बी-१ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामध्ये एकूण ६६० निवासस्थाने आहेत. त्यातील बी-१ या इमारतीमधील १२८ सदनिका सावित्रीबाई फुले वसतीगृहासाठी देण्याचे निश्चीत झाले आहे.
शासकीय वसाहत वांद्रे पूर्व येथील चतुर्थ श्रेणी इमारत क्र.१,४,६,७ व १० ह्या इमारतीमधील एकूण ५०५ सदनिकाधारकापैकी ४३५ सदनिकाधारक लॉटरी प्रक्रियेमध्ये उपस्थीत होते. अशाप्रकारे जुन्या इमारतींमधून नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याबाबतची लॉटरी प्रक्रिया पार पडली.
प्रेसनोट चुकीची आहे. जिथे काळा पैसा वापरला जातो तिथे तशी नोटीस दिली जाते.पीएमएलए ॲक्टमध्ये हा विषय येत नाहीत. मी अडचणीचा ठरत असल्याने कारवाईला वेग आला आहे.. आता जेल शिवाय कुठलीही कारवाई राहिलेली नाही.मी घाबरलेलो नाही. कुटुंब तणावात आहे. मी त्यांना सांगतो महाराष्ट्र कुटुंब.. याआधी अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकले आहे. काहीलोक भूमिका बदलून पलीकडे गेले आहे. केजरीवाल यांच्याबाबतीत देखील तेच सुरू आहे. जिथे गरज पडेल तिथे मी प्रचार करेल. माझी काय भीती वाटते ते त्यांना विचारा. मी सर्वसमांन्या माणसांचे मुद्दे मांडतोय.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना 'भारतरत्न' देण्यात यावा यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
दिल्लीतील महायुतीची आजची बैठक रद्द. अजित पवार आणि मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती, जागा वाटपावर होणार होता अंतिम निर्णय
निलेश लंके यांची आज भेट घेतली लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटांमध्ये सोबत येतील : खासदार अमोल कोल्हे यांचा दावा
आमदार निलेश लंके आणि खासदार अमोल कोल्हे यांची आज सकाळी पुण्यातील गेस्ट हाऊसला भेट झाली. अमोल कोल्हे हे त्यांच्या मतदारसंघातील हडपसर भागात बैठक घेण्यासाठी पुण्यात आहेत.
महायुतीच्या 80 टक्के जागांचा निर्णय झाला असून 20 टक्के जागांचा निर्णय एक दोन दिवसांत होईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते म्हणाले की, महायुतीत फार काही ताणतणाव नाही. सर्वच पक्ष एकमतावर आलोय. एक दोन दिवसांत फॅार्म्युला जाहीर होईल. आज केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत योग्य निर्णय होतील. विरोधी पक्षाचं राजकारण कन्फ्यूजनच्या आधारावर आहे. त्यामुळे ते रोज सकाळी उठून राज्यातील जनतेला कन्फ्यूज ठेवण्याचा प्रयत्न करतात.
आम्ही मित्रपक्षांना सन्मानाने वागवणारे लोक आहोत. आमचे नेते सर्वांना सन्मानपूर्व वागणूक देतात आणि मित्रपक्षांना जागाही सन्मानपूर्वक मिळतील. आजच्या बैठकीत होणारे निर्णय समोर येतील असंही ते म्हणाले.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच निवडणूक आयोगाची येत्या 15 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार असून 18 मार्च किंवा त्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे सर्वोच्य न्यायालयाचे SBI ला आदेश
सर्वोच्च न्यायालयाने SBI ला दणका दिला असून निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगालाही ही माहिती जारी करण्यास 15 मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) मुदतवाढ मिळणार का? याचा फैसला आज होणार होता. SBI ने 30 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने SBIला दणका देत उद्याच कामकाज संपण्यापूर्वी माहिती देण्यास सांगितली आहे.
ऑस्कर सोहळ्यात नितीन देसाई यांना आंदराजली
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार (Academey Awards) सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सुपरहिट सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळालं.
96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (Oscar Awards 2024) दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना आदरांजली वाहण्यात आली. 'इन मेमोरियम' नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला.
2 ऑगस्ट 2023 रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. 'लगान' हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. लगानने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत अंतिम पाच चित्रपटात स्थान मिळवले होते. 'स्लमडॉग मिलेनियर' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.'स्लमडॉग मिलेनियर'या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -