Maharashtra News LIVE Updates : PM Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, कुठे आणि कधी होणार प्रचार सभा?

Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Apr 2024 01:59 PM
Pune : पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस उष्णतेची लाट कायम

Pune : पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. 



पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल


असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. 


येणारा काळ हा निवडणुकीचा आहे


अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे


 
सकाळी 12 ते दुपार 3 पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका


असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे. 

Hingoli : हिंगोलीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन

Hingoli : हिंगोलीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतोष बांगर सहभागी 


हिंगोली शहरात शक्ती प्रदर्शन

Vasai : नवघर पोलीस स्टेशन समोर अचानक पालिकेची बस बंद पडली, परिसरात वाहतूक कोंडी निर्माण

Vasai : नवघर पोलीस स्टेशन समोर अचानक पालिकेची बस बंद पडल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही तांत्रिक बिघाडा मुळे बस भर रस्त्यात बंद पडली असून लोकांनी धक्का देत तिला बाजूला केली आहे.  बस मुळे नवघर नाका ते फाटक पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर दोन्ही बाजूला अवैध पार्किंग असल्याने मोठ्या प्रमाणत अडथळा निर्माण होत आहे. 

PM Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, कुठे आणि कधी होणार प्रचार सभा?

PM Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा


8 एप्रिलला पंतप्रधान प्रचार सभा घेणार


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होईल मोदींची पहिली सभा


संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करतील


तर 14 एप्रिलला रामटेकला होणार सभा

Chandrapur : ...म्हणून मी वडेट्टीवार यांची भेट घेतली; प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या भेटीवर मौन सोडलं

Chandrapur : प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या भेटीवर मौन सोडलं...


आमच्या पक्षाचे नेते असल्यामुळे विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली... प्रतिभा धानोरकर


धानोरकर म्हणाल्या, मला वाटते उमेदवारी मिळाल्या नंतर त्यात माझे कर्तव्य आहे


त्यांची भेट दिली घेणे म्हणून मी वडेट्टीवार यांची भेट घेतली


चंद्रपूर  लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या वाशिमच्या पोहरादेवी येथे आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या.....


त्यांच्यावर  भाजप नेते सुधीर मुंगूनटीवार यांनी केलेली वैयक्तिक  टीका म्हणजे काम करणाऱ्यांवर टीका आहे


त्यांच्या टीकेमुळे मी चर्चेत राहणार आहे. 


मतदारांना माहीत आहे कुणाला मतदान करायचं ते

Santosh Bangar : 'उबाठा वाले सोनिया गांधींचे घरगडी झालेत', शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा हल्लाबोल

Santosh Bangar : हिंदुस्तान मध्ये 500 वर्ष नंतर आपला राम घरी आणला 


शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा हल्लाबोल


'उबाठा वाले सोनिया गांधींचे घरगडी झालेत'


'सोनिया गांधींचे इंजेशकन घेतले आहे'


शिवाजी महाराज नंतर भगवा ध्वज बाळासाहेबांनी हाती घेतला 


बाळासाहेबांच्या शिवसेना मातीत मिसळलण्याचे काम यांनी केले 


एकनाथ शिंदे यांनी त्यांचा डाव पडून टाकला 


होय, आम्ही जातीवादी आहोत देवा धर्मावर दगडफेक करत असेल, आई बहिणीची छेद काढत आसेल तर आम्ही जातीवादी आहोत 


इंडिया क्रिकेट मॅच हारल्यावर गटाकडे फोडतात, त्याला उबाठा समर्थन देत आहे 


 


 

Chandrapur : बंजारा वेशभूषेत लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी घेतले पोहरादेवी येथील दर्शन

Chandrapur : बंजारा वेशभूषेत लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी घेतले पोहरादेवी येथील दर्शन....


संत सेवालाल महाराज ,जगदंबा देवी संस्थान ,संत रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले


यावेळी बंजारा महंत सुनील महाराज,माजी मंत्री शिवाजीराव मोघे, ययाती नाईक, राजेश राठोड, इत्यादी काँग्रेस नेते उपस्थित होते.....

Sanjay Nirupam : सोनं आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चाललीय - संजय निरुपम

Sanjay Nirupam - मी कोणत्या तरी पपक्षाकडून निवडणूक लढेल
- ⁠जून्या गोष्टी काढू नका
- ⁠माझा कट्टा वरती बोललो सोनं आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चालली आहे
- ⁠लोकशाही मध्ये सर्वाना भुमिका मांडण्याच स्वातंत्र्य आहे
- ⁠मोहीत कंबोज हे माझे जुने मित्र आहेत त्यांच्या सोबत मी बोलेल

Sanjay Nirupam : ⁠शिवसेनेने एक 'खिचडी चोर' ला उमेदवारी दिली- संजय निरुपम पत्रकार परिषद


Sanjay Nirupam -संजय निरुपम पत्रकार परिषद


सर्वांना नमस्कार आणि जय श्रीराम - संजय निरुपम


- ⁠शिवसेनेने एक खिचडी चोर ला उमेदवारी दिली
- ⁠बचीकुची सेना आहे
- ⁠दिल्लीत जाऊन त्यांनी भ्रष्टाचार भाजप पार्टी म्हटलं
- ⁠ मात्र खिचडी घोटाळा मध्ये नाव आहे
- ⁠मी खरगे यांना काल राजीनामा दिला 
- ⁠त्यांनी माझ्यासाठी एक कागद वाया घालवला
- ⁠काॅग्रेसमधये पहिल एक पाॅवर सेंटर बनवलं होत
- मात्र आता पाच पाॅवर सेंटर बनवले आहेत
- ⁠ते आपआपसात टक्कर देत असतात
- ⁠सोनिया गांधी, राहूल गांधी आणि बहीण आणि अध्यक्ष यांची पाॅवर सेंटर आहे
- ⁠वेणुगोपल यांचं एक पाॅवर सेंटर आहे
- ⁠हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम बोलले तरी समजत नाही असे लोक त्या ठिकाणी बसले आ

Buldhana : बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल, सुषमा अंधारे अर्ज दाखल करताना होत्या हजर

Buldhana : बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल.


शिवसेना नेत्या सुषमा अंधारे अर्ज दाखल करताना होत्या हजर..


मी निवडून येणारं ....हीच आज भावना ...- नरेंद्र खेडेकर.


विद्यमान खासदार यांनी पाच वर्षात फक्त संपत्ती जमा केली..त्यामुळे ही धन शक्ती विरुद्ध जन शक्ती आहे.

Navneet Rana : नवनीत राणा यांना मोठा दिलासा, नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Navneet Rana : नवनीत राणा यांना मोठा दिलासा


नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध 


मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवला


नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब

Bhavana Gawali : आम्ही शेती विकून शिवसेना पक्ष मोठा केला, भावना गवळींच्या कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंवर संताप

Bhavana Gawali : भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांना अजूनही भावना गवळी यांना उमेदवारी मिळेल ही आशा ...


एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसैनिकांचा संताप


आम्ही कोणाला नेते मनात नाही, भावना गवळी आमच्या नेत्या


आम्ही शेती विकून शिवसेना पक्ष मोठा केला. आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवत येते

Nitesh Rane : केजरीवाल पार्ट 2 महाराष्ट्रात होऊ शकतो, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे पत्रकार परिषद


ज्याने आपल्या पक्षाला रसातळाला नेला, तीन तेरा वाजवले त्याने दुसऱ्यांवर बोलू नये संजय राऊत यांच्यावर टीका 


केजरीवाल पार्ट 2 महाराष्ट्रात होऊ शकतो, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद- नितेश राणे


अनेकांनाच्या खुणानी हात बरबटलेले असल्यानी भ्रष्टाचाराचा आरोप करू नये - नितेश राणे

Mohit Kambhoj : संजय निरुपम हा तर काँग्रेसने पक्षातून बाहेर फेकलेला कचरा, भाजप नेते मोहित कंबोज यांचा थेट निशाणा

Mohit Kambhoj : संजय निरुपम हा तर काँग्रेसने पक्षातून बाहेर फेकलेला कचरा 


-  हा कचरा घरात घेण्याची गरज नाही 


- सर्जिकल स्ट्राइक वर संशय घेणाऱ्या, बीफ पार्टी आयोजित करणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या संजय निरुपम यांना कुणीही आपल्या पक्षात घेणे दुर्दैवी


- भाजप नेते मोहित कंबोज यांचा माजी काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर थेट निशाणा

Dharashiv : धाराशिव लोकसभेच्या रिंगणात राणा जगजीत सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Dharashiv : धाराशिव लोकसभेच्या रिंगणात राणा जगजीत सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


 दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडणार


राणा जगजीत सिंह यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी संधी

Maharera : महारेराने 5471 अर्जांपैकी  4332 नवीन प्रकल्पांना केला नोंदणीक्रमांक मंजूर

Maharera :  महारेराने गेल्या वर्षात आलेल्या 5471 अर्जांपैकी  4332 नवीन प्रकल्पांना केला नोंदणीक्रमांक मंजूर


यात सर्वात जास्त 1172 प्रकल्प पुण्याचे, नंतर ठाणे 597, मुंबई उपनगर 528, रायगड 450, नागपूर 336, नाशिक 310 इत्यादी प्रकल्पांचा समावेश


मुंबई महाप्रदेशासह कोकणातील प्रकल्पांची 1976 अशी सर्वात जास्त संख्या. नंतर पश्चिम महाराष्ट्र 1415, विदर्भ 437 , उत्तर महाराष्ट्र 347, मराठवाड्यातील 149 आणि दादरा नगर हवेलीतील 8 प्रकल्पांचा समावेश

Lok Sabha 2024 : वंचित आघाडी आणि प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीत अजूनही काही जागांसंदर्भात चर्चा सुरुच 

Lok Sabha 2024 : वंचित आघाडी आणि प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीत अजूनही काही जागांसंदर्भात चर्चा सुरुच 


प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीचे प्रतिनिधी अकोल्यात जात प्रकाश आंबेडकरांची आज भेट घेणार 


प्रकाश आंबेडकर आज नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर भेट होण्याची शक्यता 


सोबतच, ओबीसी बहुजन पार्टीकडून आनंदराज आंबेडकरांना अमरावतीतून पाठिंबा देण्याची शक्यता, उद्या अधिकृत घोषणा प्रकाश शेंडगेंकडून केली जाणार 

Chandrapur : चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली, तब्बल पाऊण तास चर्चा

Chandrapur : चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली


गडचिरोली येथील पोटेगाव रोड वर असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या घरी ही भेट झाली


यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे हे देखील उपस्थित होते.


या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली.


चंद्रपूर येथे उद्या काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा एक मेळावा होणार आहे


याच मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात आलंय.

Bhaskar Jadhav : शिंदे सोबत गेलेल्या 50 आमदारांसोबत 'असे' कधीही होईल.. आता तरी सुधरा - भास्कर जाधव


Bhaskar Jadhav : एकनाथ शिंदे सोबत गेलेल्यांनो आता तरी समजून घ्या आणि सुधरा... - भास्कर जाधव


जे हेमंत पाटील, गजानन कीर्तिकर, हेमंत गोडसे आणि कृपाल तुमाने सोबत झालं..


ते शिंदे सोबत गेलेल्या 50 आमदारांसोबत कधीही होईल.. त्यामुळे आता तरी सुधरा


असे मत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे... 


भाजपला शिवसेना संपवायचीच आहे, मग ती उद्धव ठाकरे सोबतची शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेली शिवसेना असेल..


त्यांनी शिवसेना संपवायचा विडाच उचलला आहे असे भास्कर जाधव म्हणाले... 

Metro Train : मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड, घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रखडली

Metro Train : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो ट्रेन उशिराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे मेट्रो रखडली होती. आता मेट्रो ट्रेन सेवा सुरु झाली असली, तरी मेट्रो ट्रेन 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.



Satara : सातारा लोकसभेचा तिढा अद्याप कायम, शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत आजच निर्णय अंतिम होण्याची दाट शक्यता`

Satara : सातारा लोकसभेचा तिढा अद्याप कायम


सातारा लोकसभेसाठी इच्छुक शशिकांत शिंदे, सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले


श्रीनिवास पाटील यांची निवडणूक न लढण्याची भूमिका आपल्या मुलाला सारंग पाटील याला उमेदवारी द्यावी यावर श्रीनिवास पाटील अद्याप ठाम


तर शशिकांत शिंदे यांची पक्षाने आदेश दिल्यास रणांगणात उतरून महायुतीच्या उमेदवारा विरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची भूमिका


शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत आजच निर्णय अंतिम होण्याची दाट शक्यता`

Sanjay Raut :सांगलीवर पर्याय निघाला, दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्टीशी चर्चा होईल संजय राऊत उद्या सांगली दौऱ्यावर जाणार 

Sanjay Raut : संजय राऊत उद्या सांगली दौऱ्यावर जाणार 



पुढील 3 दिवस ठाण मांडून बसणार 



महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार 



सांगली वर पर्याय निघाला आहे,


दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्टीशी चर्चा होईल 


भिवंडी ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचं लढणार

Ratnagiri : बालिकांशी गैरवर्तन करणे शिक्षकाला पडले महागात... 2 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा

Ratnagiri : बालिकांशी गैरवर्तन करणे शिक्षकाला पडले महागात...


2 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा


खेड न्यायालयाचा निर्णय 


विजय महादेव कळंबटे असे या आरोपीचे नाव आहे. 

Lok Sabha 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली आणि यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणार 

Lok Sabha 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळाकडे रवाना 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली आणि यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणार 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावरुन हिंगोलीकडे जात महायुतीच्या उमेदवाराचे नामनिर्देशन दाखल करणार 


त्यानंतर, यवतमाळकडे रवाना होत संभाव्य उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार

Lok Sabha 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली आणि यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणार 

Lok Sabha 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळाकडे रवाना 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली आणि यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणार 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावरुन हिंगोलीकडे जात महायुतीच्या उमेदवाराचे नामनिर्देशन दाखल करणार 


त्यानंतर, यवतमाळकडे रवाना होत संभाव्य उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share Market : भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकावर, सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टी 22 हजार 557 वर 

Share Market : भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकावर 


सेन्सेक्स 500 अंकांनी वधारत 74 हजार 370 पार


बाजार उघडताच सेन्सेक्स पहिल्यांदाच 74 हजार 500 चा टप्पा पार केला 


निफ्टी 123 अंकांनी वधारत 22 हजार 557 वर 


बाजार उघडताच निफ्टीनं देखील पहिल्यांदाच 22 हजार 600 चा टप्पा पार केला होता 


अमेरिकेतील बाजारात फेडच्या अध्यक्षांनी व्याजदरात कपात करण्याचे संकेत यंदाच्या वर्षात आपल्या भाषणात दिल्यानंतर मोठी उसळी दिसली होती 


आरबीआयकडून देखील उद्या पतधोरण जाहीर होणार

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिली, पुढील राजकीय भूमिका आज जाहीर करणार

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला 


 काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गेना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा निरुपम यांनी पाठवला आहे   


 आज सकाळी साडेअकरा वाजता आपली पुढील राजकीय भूमिका संजय निरूपम जाहीर करतील

Ratnagiri - रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच, शिंदे शिवसेनेची आज महत्वपुर्ण बैठक

Ratnagiri - रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच


शिंदे शिवसेनेची आज रत्नागिरीत महत्वपुर्ण बैठक


रत्नागिरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज होणार बैठक


रत्नागिरीत  हाँटेल विवेक मध्ये  दुपारी 3 वाजता होणार बैठक 


या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहण्याची शक्यता


रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघात भूमिका बैठकीत ठरणार


भाजपच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाची बैठक

Pune : पिंपरी चिंचवड जवळ पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बाँबशेल आढळले

Pune : पिंपरी चिंचवड जवळ हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बाँबशेल आढळले


पोलिसांनी हे बॉम्बशेल तात्काळ ताब्यात घेत संरक्षण विभागाकडे सुपूर्द केले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या कामादरम्यान जेसीबीने खोदकाम करत असताना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळले


त्यानंतर पोलिसांनी हे बॉम्बशेल ताब्यात घेत संरक्षण विभागाला सुपूर्द केले..

Nashik : धर्मगुरू बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, नाशिकमध्ये मध्यरात्री शेकडोंचा जमाव रस्त्यावर

Nashik : धर्मगुरू बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या विरोधात


नाशिकमध्ये शेकडोंचा जमाव रस्त्यावर आला होता.


काल मध्यरात्री अडीच तीन वाजेपर्यंत जमावाने नाशिक पुणे महामार्गवर ठिय्या आंदोलन करत महामार्ग रोखुन धरला होता.


जोरदार घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड ही करण्यात आली.


जमावाला पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


मात्र तरीही पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती.


पोस्ट करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची जमवाची मागणी होती.


संबंधित व्यक्ती ला अटक करून पोलिसांनी दोन समाजात तेढ निर्माण करणे,


समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला,


त्यानंतर काही प्रमाणात गर्दी पांगण्यास सुरवात झाली

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर येथे पिस्तुल, चाकू घेऊन फिरत दहशत माजविणाऱ्याला पोलिसांकडून अटक

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर येथे पिस्तुल आणि चाकू घेऊन फिरत दहशत माजविणाऱ्याला पोलिसांकडून अटक


युवकाला दहशत माजविणे पडले महागात; पिस्टल आणि चाकू घेऊन फिरतांनाचा सीसीटीव्ही आला होता समोर



पदमपुरा येथील मामा चौकात पिस्टल आणि चाक़ू घेऊन दहशत माजवीणाऱ्या युवकाला वेदांतनगर पोलिसांनी अटक केली


जय कन्हैया भांडारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


आरोपी आणि त्याच्या मित्राने पिस्टल आणि चाक़ू दाखवत स्थानिक नागरिकांना धमकाविले होते

Dharashiv : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन गाव गुंडांना धाराशिव जिल्ह्यातून करण्यात आले हद्दपार

Dharashiv : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव कळम तालुक्यातील तीन गाव गुंडांना धाराशिव जिल्ह्यातून करण्यात आले हद्दपार


कळंब तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांची कारवाई 


सदर गाव गुंडांना धाराशिव जिल्ह्यातून तीन महिन्यासाठी करण्यात आले हद्दपार 


अतुल कोल्हे, शिवराज लोकरे,  उमेश लोकरे अशी हद्दपार करण्यात आलेल्या गावगुंडाची नावे आहेत 


सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक गौरहसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Nashik - लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार, आजपासून बेमुदत बंद..


Nashik - लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या राहणार आजपासून बेमुदत बंद..


 


-हमाली, तोलाई व लेव्ही संदर्भात वाद..



- माथाडी - मापारी कामगारांचे बाजार समित्यांना पत्र..



- माथाडी - मापारी कामगार कामकाज लिलावात सहभागी होणार नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या राहणार बंद..



- हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्ही संदर्भात सर्वमान्य तोडगा निघत नाही..तोपर्यंत बाजार समित्या राहणार बंद..



- माथाडी कामगार व व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचे होणार हाल..



- मार्च एंड निमित्ताने गेल्या पाच दिवसांपासून बाजार समित्या आहे बंद..

Ram Navami 2024 : यंदा राम नवमी फक्त एका दिवसापुरतीच साजरी केली जाणार नाही, तर...! विश्व हिंदू परिषदेची माहिती

Ram Navami 2024 : यंदा राम नवमी फक्त एका दिवसापुरतीच साजरी केली जाणार नाही, तर...! विश्व हिंदू परिषदेची माहिती


गुढीपाडव्या ते हनुमान जयंती रामनवमीच्या पार्श्वभूमीवर


देशभरात पंधरा दिवस रामोत्सव साजरा करणार..


विश्व हिंदू परिषदेचे खास नियोजन...  


महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा दरम्यान होणारा रामोत्सव


भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आहे का? विहीप ने आरोप फेटाळले...

Dharashiv : धाराशिव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला, अर्चना पाटील भाजपातून अजित पवार गटात घेणार प्रवेश

Dharashiv : धाराशिव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला....


उस्मानाबाद लोकसभा महायुतीचा उमेदवार आज होणार जाहीर 


भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील भाजपातून अजित पवार गटात घेणार प्रवेश 


अर्चना पाटील यांचा मुंबईमध्ये  अजित पवार गटात  होणार प्रवेश


अर्चना पाटील यांना प्रवेशानंतर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 : राज्यातील तब्बल 65 गावातील 41 हजार 440 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा

Lok Sabha Election 2024 : राज्यात तब्बल 65 गावातील 41 हजार 440 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा


राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू


निवडणूक आयोगाकडून अधिका अधिक मतदान होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना


राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय


विशेष म्हणजे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला


रस्ते, पाणी,मराठा आरक्षण, रेल्वे गाडी सुरू करावी यासह बीड जिल्ह्यातील एका गावाने त्याच्या मोबाईल टावर साठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला..

Lok Sabha Election 2024 : 'वंचित' नं यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार बदलला 

Lok Sabha Election 2024 : वंचितनं यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार बदलला 


सुभाष खेमसिंग पवार ऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोडे यांना उमेदवारी 


नामांकन पत्र दाखल केल्यानंतर उमेदवार बदलण्याची वंचितवर नामुष्की

Akola : प्रकाश आंबेडकर आज अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

Akola : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार


आज सकाळी 11 वाजता अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार


यावेळी प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यासह आणखी काही महत्वाचे नेते हजर असणार


सिव्हील लाईन चौकातील प्रचार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली यावेळी काढण्यात येणार


तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार


याशिवाय भाजपाचे बंडखोर नेते आणि बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Amravati : अमरावतीमध्ये आज भाजपचं शक्तिप्रदर्शन, नवनीत राणा आज अर्ज दाखल करणार

Amravati : अमरावतीमध्ये आज भाजपचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार


भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार


अमरावतीच्या दसरा मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.


नवनीत राणा यांना भाजपतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : मृत्यूच्या काही वेळ आधी ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस चर्चेत, आगीत एकाच परिवारातील सात जणांचा गुदमरून मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : मृत्यूच्या काही वेळ आधी ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस मात्र चर्चेत, आगीत एकाच परिवारातील सात जणांचा गुदमरून मृत्यू


छत्रपती संभाजीनगर मधील घटना 


"अल्ला भीतीदायक मृत्यू देऊ नको" अशी विनंती 


स्टेटस च्या चार तासानंतर घडली भयाहव घटना 


दुकानाला लागलेल्या आगीत एकाच परिवारातील सात जणांचा गुदमरून मृत्यू


दोन भाऊ, आई दोघांच्या पत्नी, मोठ्या भावाचे दोन मुलं, आणि लहान या भावाच्या 8 महिन्याच्या गर्भवती असलेल्या पत्नीचा समावेश


या घटनेत गर्भवती महिलेचा पती मृत्यू झालेल्या वसीम शेख याने मृत्यूच्या काही वेळ आधी ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस मात्र चर्चेत आले आहे. 


त्याच्या या स्टेटस मध्ये त्याने मृत्यूविषयी भाष्य असलेले विधान ठेऊन अल्ला भीतीदायक मृत्यू देऊ नको अशी विनंती केली होती


 


 

Solapur : "मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन" भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा सोलापूरकरांना शब्द

Solapur - मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे.


- सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा सोलापूरकरांना शब्द


- ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरु होईल. त्यासाठी मी मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे.


- सोलापुरातील एमआयडीसी पुन्हा नव्या जोमाने उभा करेन.


- चादर आणि टॉवेल उद्योगासाठी टेक्स्टाईल पार्क उभं करणार

Hingoli : हिंगोली लोकसभेसाठी महायुती कडून बाबुराव कदम आज उमेदवारी अर्ज भरणार

Hingoli : हिंगोली लोकसभेसाठी महायुती कडून बाबुराव कदम आज उमेदवारी अर्ज भरणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज 


हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी बदलावी 


यासाठी हा शिवसेनेवर दबाव टाकला जात होता 


अखेर काल हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.


 त्यानंतर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे 


 


 


 

Rain : महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचे? हवामान विभागाची माहिती

Rain : महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचे? हवामान विभागाची माहिती


शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता


30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता


4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता 

Yavatmal : आजचा दिवस यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी महत्वाचा, राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं समोर

Yavatmal : आजचा दिवस यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी अतिशय महत्वाचा


अखेर उमेदवारीचा तिढा सुटला


हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना ही उमेदवारी जाहीर झाल्याचं समोर


आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहे. 

Amravati : रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amravati : अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक


रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज मागे...


अमरावतीत वंचितला आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा...


 

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार


माढा, बीड, साताऱ्यातून कोणाला संधी?


काही जागांचा वाद सोडवताना पक्षाच्या नेतृत्त्वाची दमछाक 


महत्त्वाच्या जागांवर कोणाला संधी दिली जाणार?


साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न 

पार्श्वभूमी

Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.