Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... ...More
Maharashtra Politics: सध्या लोकसभेची रणधुमाळी राज्यासह संपूर्ण देशाता पाहायला मिळत आहे. भाजपनं सत्ता काबीज करण्यासाठी तर विरोधकांनी भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी एकजूट केली आहे. अशातच राज्यात मात्र विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीत मात्र फारसं काही आलबेल दिसत नाही. लोकसभेच्या जागावाटपावरुन धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीचा जागावाटप अद्यापही पूर्ण झालेला नाही. मात्र विदर्भातील दहा जागांवर संभाव्य जागावाटप कसा राहील? याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.
पूर्व विदर्भातील सहा लोकसभा मतदार संघापैकी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक हे पाच लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती आहे. यापैकी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायचा. मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भंडारा-गोंदिया हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तर रामटेक मतदार संघ परंपरेने शिवसेनेकडे असायचा. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे यांची वाट धरल्यानंतर शिवसेना उबाठा गटानं रामटेक मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास होकार दिल्याची माहिती आहे.