Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालायचा महत्त्वाचा निकाल, नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jan 2024 01:06 PM
NCP Politicle Crisis : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालायचा महत्त्वाचा निकाल, नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत

NCP Politicle Crisis : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात निर्णय देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिलीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेवर निर्णय करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलीये.

Sanjay Raut on Rahul Narwekar: पक्षांतर करुन फुटीर गटाला मान्यता दिली, हा आंबेडकरांचा अपमान : संजय राऊत

Sanjay Raut on Rahul Narwekar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधनाचा अपमान केला जातोय.  भाजपचा हस्तक म्हणून राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय. संविधान आणि घटनेचा हा अपमान आहे अशी टीका  ठाकरे गटाचे खासदार संजय  राऊतांनी दिलीये.

Ravindra Waikar: आमदार रवींद्र वायकर यांची  ईडी चौकशी

Ravindra Waikar: आमदार रवींद्र वायकर यांची  ईडी चौकशी


रविंद्र वायकरांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

जोगेश्वरी भूखंड प्रकरणात वायकरांना  ईडीचं समन्स

Maharashtra News: भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य

Maharashtra News: सरकारच्या अधिसूचनेवरून एकीकडे भुजबळ आक्रमक झाले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहमती दर्शवलीय. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान होत आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचत नाही तोवर भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. तायवाडेंच्या या भूमिकेला भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय. 

Lok Sabha Election 2024 : राज्यातील 48 लोकसभा जागांवर वंचितांची मोठी ताकद : प्रकाश आंबेडकर

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात वंचितांची मोठी ताकद असून प्रत्येक मतदारसंघात आमचे दोन ते अडीच लाख मतदान आहे. आता उद्या होणाऱ्या राज्यातील लोकसभा जागावाटप बैठकीला आमच्या पक्षांचे प्रतिनिधी जातील. इतर पक्षांची भूमिका ऐकून घेतील आणि मगच जागावाटपाबाबत दावा केला जाईल, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. काल रात्री उशिरा माढा येथील ओबीसी महासंघाचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.

Solapur Accident  : सोलापुरात भीषण अपघात, रस्ते अपघातात तीन मित्रांवर काळाचा घाला

Solapur Accident  : सोलापूर : सोलापुरात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सोलापुरातल्या महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये इरण्णा मठपती (वय 24), निखिल कोळी (वय 24), दिग्विजय (आतिश) सोमवंशी (वय 21) ह्या तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही एकाच दुचाकीवर होते. महावीर चौक येथे मध्यरात्री झाडाला जोरदार धडक दिल्यानं तिघंही गंभीर जखमी झाले. बेशुद्ध अवस्थेतील या तिघांना ही पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी या तिघांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शासकीय रुग्णालयात मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

Mumbai Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली, 6 दिवसांत 72 टक्के सर्वेक्षण पूर्ण

Mumbai Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसलीये. कारण पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसांत 72 टक्के सर्वेक्षण पूर्ण झालंय. मुंबई महापालिकेनं 6 दिवसांत 28 लाख 7 हजार 518 घरांचं सर्वेक्षण पूर्ण केलंय. तसंच सलगच्या सुट्ट्यांमुळे घरं बंद असल्यानं 5 लाख 79 हजार घरे बंद होती. त्यामुळे माहिती नसल्याचंही पालिकेकडून सांगण्यात आलंय. 

Sankashti Chaturthi: आज पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी

Sankashti Chaturthi: आज पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. यानिमित्ताने नागपूरमधील टेकडी गणपती मंदिर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले. आज सकाळपासून टेकडी गणपती मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. विदर्भात आजच्या संकष्टी चतुर्थीला तीळ चतुर्थी म्हणून ओळखले आहे. त्यामुळे बहुतांश गणेश मंदिरात यात्रेचे स्वरुप असते.

Pune News: ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण, ससून रुग्णालयाचे माजी डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न?

Pune News: ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण, ससून रुग्णालयाचे माजी डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न?

कारवाईवर निर्णय न घेता अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

वैद्यकीय शिक्षण विभागाने अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

PM MOdi Yavatmal Visit:  11 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचा संभाव्य यवतमाळ दौरा

PM MOdi Yavatmal Visit: 11 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचा संभाव्य यवतमाळ दौरा

पंतप्रधानांचा दौरा, जिल्हा प्रशासनाची आज तातडीची बैठक

यवतमाळच्या किन्हीमध्ये मोदींची सभा, पोलीस सूत्रांची माहिती

Lok Sabha Elections 2024: शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात?

Lok Sabha Elections 2024: शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात?

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत

आज निवडणूक लढवण्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता


शांतीगिरी महाराज यांनी या आधी 2009 मध्ये संभाजी नगर मधून लढविली होती लोकसभा निवडणूक

Haribhau Rathod vs Manoj Jarange: हरीभाऊ राठोड म्हणाले, जरांगे युद्धात जिंकले, पण तहात मात्र हरले; आता जरांगे म्हणतात, आता तह नाही कायदा झालाय

Haribhau Rathod vs Manoj Jarange: मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते हरीभाऊ राठोड यांनी जरांगेंचं अभिनंदन केलं. पण अभिनंदन करताना जरांगे युद्धात जिंकले मात्र तहात हरले अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. मात्र मनोज जराेगंनी हरीभाऊ राठोडांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर दिलंय पाहुयात. 

Satara News: साताऱ्यात अजित पवार आणि श्रीनिवास पाटील यांची भेट

Satara News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची साताऱ्यातील कराड इथल्या निवासस्थानी भेट घेतली.  काही दिवसांपूर्वी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन झालं होतं. त्यामुळे ही सांत्वन पर भेट होती. यावेळी अजित पवार आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

Kashmir Snowfall: काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी

Kashmir Snowfall: काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग, गुरेज, बंगस, जोजिला पास, बांदीपोरासह उंच ठिकाणी बर्फवृष्टी झाली. गुलमर्गपासून कुपवाडापर्यंत बर्फवृष्टी झाली. काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमातील ही पहिली बर्फवृष्टी आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या हिमवृष्टीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik News: लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद

Nashik News: लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद

कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक


कांद्याला सरासरी 1067 रुपये भाव तर जास्तीत जास्त 1140 रुपये प्रति क्विंटल भाव

Raj Thackeray on Railway Bharti: रेल्वे भरतीत जास्तीत जास्त मराठी तरुण- तरुणींना रोजगार मिळावं हे पाहावं : राज ठाकरे

Raj Thackeray on Railway Bharti: रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलटच्या साडेपाच हजार जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.  यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरुण आणि तरुणींना रोजगार मिळेल हे पाहावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कार्यकर्त्यांना केलं आहे. जास्तीत-जास्त मराठी तरुण यात नोकरी कशी मिळवेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

Crime News: पत्नीनंच रचला पतीला संपवण्याचा कट; पाणीपुरीवाल्याच्या 'ब्लाईंड मर्डर मिस्ट्री'चं गूढ अखेर उकललं

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर देहाट येथे झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तीन दिवसांपूर्वी पाणीपुरीची गाडी चालवणाऱ्याच्या हत्या झाली होती. या हत्येच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांच्या तपासादरम्यान जे समोर आलं, ते अत्यंत धक्कादायक होतं. पोलिसांना तपासात अशा काही गोष्टी आढळून आल्या, ज्यामुळे आपोआप संशयाची सुई हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीवर गेली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली आणि त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. पाणीपुरीवाल्याची हत्या दुसऱ्या, तिसऱ्या कोणीही केलेली नसून त्याच्या पत्नीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पाणीपुरीवाल्याच्या पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 


वाचा सविस्तर 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


Bigg Boss 17 Winner: मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस-17' चा विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये


Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी  Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर  फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं (Salman Khan) मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे... वाचा सविस्तर 


Stock Market: यंदाच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये झळाळी; बजेटपासून ते फेडपर्यंत काय-काय होणार? जाणून घ्या


Stock Market In This Week: मुंबई : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील (Stock Market) येता आठवडा अतिशय व्यस्त असणार आहे. त्यातल्यात्यात अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या काही दिवसांतच अमेरिकेच्या फेडच्या व्याजदराचा निर्णय येणार आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या तिमाहीचे निकाल, वित्तीय तूट आणि पायाभूत सुविधांचे आकडेही येणार आहेत. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर (Stock Market News) होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात शेअर बाजारात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडूनही वर्तवली जात आहे... वाचा सविस्तर 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.