Maharashtra News LIVE Updates : उपोषण मंडपात उपोषणकर्त्याची आत्महत्या, वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन 252 दिवसांपासून आंदोलन सुरुच

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jan 2024 02:34 PM
Bhandara Blast News : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट, एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू

Bhandara News : भंडारा शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. सीएक्स विभागात हा स्फोट झाला. या दुर्घटनेत अविनाश भागवत मेश्राम (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू झाली होती. सीएक्स विभागात दारुगोळ्याचा कोट तयार करण्याचे काम केले जाते, तिथं हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्राम हे एकटेच असल्याने मोठी जीवितहानी टळली. आयुध निर्माणी प्रशासनाने या घटनेची गंभीर दाखल घेत आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधकांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती गठीत केली असून त्याचा अहवाल तात्काळ मागितला आहे. अहवालानंतरच स्फोटाचं नेमक कारण पुढे येईल. यापूर्वी 2 जानेवारीला भंडारा शहरालग असलेल्या सनफ्लॅग कंपनीतली स्फोटाची घटना घडली होती. त्यामध्ये आठ कर्मचारी भाजले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे.

Manmad Kabbadi Competition : मनमाडमध्ये कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Manmad Kabbadi Competition : मनमाड : प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी खेळाला महत्व प्राप्त झाले असून अनेक तरुण करिअर म्हणून कबड्डी खेळाकडे पाहत आहे. तरुणांचा कबड्डीकडे ओघ वाढू लागला आहे. कबड्डीची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकच्या  मनमाडमध्ये कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तब्बल 30 संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला चुरशीच्या लढतीमुळे कबड्डीप्रेमीच्या डोळ्याचे पारणे फिटले. अटीतटीच्या अंतिम सामान्यात नवयुवक  क्रीडा मंडळाने अवघ्या 2 गुणांनी जयभवानी क्रीडा मंडळाचा पराभव  करीत विजेतेपद पटकावले. यावेळी विजयी संघाने एकच जल्लोष केला.

Manmad Kabbadi Competition : मनमाडमध्ये कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Manmad Kabbadi Competition : मनमाड : प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी खेळाला महत्व प्राप्त झाले असून अनेक तरुण करिअर म्हणून कबड्डी खेळाकडे पाहत आहे. तरुणांचा कबड्डीकडे ओघ वाढू लागला आहे. कबड्डीची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकच्या  मनमाडमध्ये कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तब्बल 30 संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला चुरशीच्या लढतीमुळे कबड्डीप्रेमीच्या डोळ्याचे पारणे फिटले. अटीतटीच्या अंतिम सामान्यात नवयुवक  क्रीडा मंडळाने अवघ्या 2 गुणांनी जयभवानी क्रीडा मंडळाचा पराभव  करीत विजेतेपद पटकावले. यावेळी विजयी संघाने एकच जल्लोष केला.

Solapur Natya Dindi : नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाआधी नाट्यदिंडी

Solapur Natya Dindi : सोलापूर आजपासून शंभराव्या नाट्यसंमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन सुरू होत आहे. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाआधी नाट्यदिंडी आज सोलापुरात पार पडली. सोलापुरातल्या ऐतिहासिक अशा बलिदान चौकातून या नाट्य दिंडीला सुरुवात झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नाट्यकलावंत प्रशांत दामले यांच्या उपस्थितीमध्ये या नाट्य दिंडीला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नाट्य कलावंत मोहन जोशी, अभिनेत्री तेजस्वी प्रधान, अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांच्यासह अनेक सीने आणि नाट्यकलावंत या नाट्य दिंडीमध्ये सहभागी झाले. सोलापूर सह राज्याची संस्कृती या नाट्यदिंडीच्या माध्यमातून दाखवण्याचे प्रयत्न करण्यात आले. नाट्य दिंडीच्या उदघाटनप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील आणि नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहुयात 

Thane Truck Accident : ठाण्यातील घोडबंदर परिसरात अपघात सत्र सुरूच

Thane Truck Accident : ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर, मुंबई नाशिक महामार्गावर सकाळी 06.56 वाजताच्या माजीवाडा ब्रीजजवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवर आयशर टेम्पोमधून डेकोरेशनचे सामान घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पोने एका अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. घटनास्थळावरून अज्ञात वाहन निघून गेले होते. या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह, वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान 1 फायर वाहन आणि 1 रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. या घटनेत वाहन चालक मोनू अली, वय 28 वर्ष यांना दोन्ही पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सिव्हील रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघातग्रस्त टेम्पो आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने बाजूला करण्यात आला असून सदरचा रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

Wardha News : उपोषण मंडपात उपोषणकर्त्याची आत्महत्या, वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन 252 दिवसांपासून आंदोलन सुरुच

Wardha Dam Protest : मोर्शी याठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन 252 दिवसांपासून सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी या आंदोलकांनी थेट मंत्रालयात जाऊन जाळीवर उड्या मारून शासनाचे लक्ष वेधले होते. तेव्हा आश्वासन दिले पण अजूनही त्याची पूर्तता झाली नाही. 26 जानेवारीला याच प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला.. अशातच काल शुक्रवारी मध्यरात्री उपोषण मंडपात एका उपोषणकर्त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.


वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणारे गोपाल दहिवडे असं गळफास घेऊन आत्महत्या करण्याऱ्या आंदोलकांचे नाव आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी. ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे, या सर्व मागण्याची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे शासनाच्या आणि प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे 252 दिवसांपासून सुरू असलेल्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला शासन प्रशासन जवाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवलं आहे. सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून हा लढा असाच सुरुच ठेवावा असेही गोपाल यांनी लिहून ठेवले आहे. घटनास्थळावर पोलीस पोहचले असून पुढील तपस सुरु केला आहे.
Ashok Chavan on Maratha Reservation : ही शुभ सुरुवात : काँग्रेस नेते अशोक चव्हाण 
Ashok Chavan on Maratha Reservation : मराठा समाजातील नोंदी आढळलेल्या तसेच त्यांच्या सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा झालेला निर्णय हा शुभ सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिलीय. एबीपी माझाशी एक्सकलुसिव्ह बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. आता नोंदी नसलेल्या लोकांबाबत देखील निर्णय होईल, याबाबत मी आशावादी आहे, असेही चव्हाण म्हणाले आहेत. सरकारच्या मराठा समाजाच्या अध्यादेशावर पहिली प्रतिक्रिया त्यांनी नांदेडमध्ये एबीपी माझाला देताना ही भावना व्यक्त केलीय. 
Bhiwandi News : आमदार नितेश राणेंवर कारवाईची मागणी

Bhiwandi News : भडकावू भाषण करून वातावरण खराब करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय सचिव सैय्यद जलालुद्दिन यांनी केली आहे.


भिवंडी : मीरा-भाईंदरमध्ये झालेली घटना ही निंदनीय असून आमदार नितेश राणे, गीता जैन आणि प्रताप सरनाईक यांनी भडकाऊ वक्तव्य करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही समाजातील लोकांना शांत करणे गरजेचे होतं, परंतु भडकाऊ भाषण करून वातावरण खराब करण्याचं काम त्यांनी केलं. कायदा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय सचिव सैय्यद जलालुद्दिन यांनी केली आहे. 


दुसरीकडे दंगा घडवल्याशिवाय मत सरकारला मिळणार नाही, जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना सैय्यद जलालुद्दीन यांनी सांगितलं की, जितेंद्र 'आव्हाड ज्या भागातून निवडून जातात, तो भाग मुस्लिम बहुसंख्या आहे, त्यांचं देखील कर्तव्य होता की, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शांततेचं आव्हान करायला पाहिजे होतं, ते का गेले नाही? ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड राजकारण करतात, हे निंदनीय आहे.'

Palghar Road Issue : काँक्रिटीकरणाचं कामात नागरिकांच्या जीवाशी खेळ

Palghar News : पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त करण्यासाठी या महामार्गाचे 130 किलोमीटरच्या काँक्रिटीकरणाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलं असून कामाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडून निष्काळजीपणा करत नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याच समोर आला आहे. काँक्रिटीकरण सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांमधून धोकादायक लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून यामुळे अपघातांना आमंत्रण दिलं जात आहे. धोकादायक पद्धतीने निघालेल्या लोखंडी सळ्या टायरला लागल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाले असताना देखील कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा बॅरीगेट्स ठेवण्यात आले नसल्याने प्रवाशी आणि वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.