Maharashtra News Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधीमंडळात सुनावणी, अजित पवार गटाच्या वतीने फेरसाक्ष देणयत येणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा विठ्ठल मंदिर आणि परिसरातील भाविकांची गर्दी कमी झाल्यावर भाजप आ समाधान अवताडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेवून तब्बल दोन तास मंदिराची सफाई केली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात मंदिराची सफाई सुरू झाली आहे . पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात सध्या हजारो भाविकांची गर्दी असल्याने सफाई साठी वेळ काढता येत नव्हता . अखेर आज रात्री उशिरा गर्दी कमी झाल्यावर मंदिर आणि परिसराच्या सफैला सुरुवात झाली . आमदार अवताडे यांनी रात्री पाण्याचे फवारे मारून नंतर कार्यकर्त्यांना घेवून संपूर्ण मंदिर , नामदेव पायरी महाद्वार याची सफाई केली.
गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले आहेत. अयोध्या आता गर्भगृहाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता मंदिर दर्शन बंद करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण याची निर्मिती झाली होती. रात्रीच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील काही भागात अचानक अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं दुचाकी वाहनचालकांची मोठी तारांबळ उडल्याचं चित्र बघायला मिळालं. काहीकाळ पडलेल्या हा पाऊस पिकांना लाभदायक ठरला आहे. अवकाळी पावसामुळं मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाहीत. त्यांना सोहळ्याचे आमंत्रण आले आहे, पण त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करत याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच अयोध्येला सर्व मंत्रिमंडळासह जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे. अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राहल नार्वेकरांचा निकाल भाजच्या संविधानानुसार होता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार नव्हता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
अलिबाबाची ४० ची टोळी ही उद्धव ठाकरे यांची कधी होऊ शकली नाही सगळ देऊन ती लोकांची काय होणार ? असेही ते म्हणाले.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारनं जाहीर केलेली सरकारी सुट्टी रद्द करा
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, रविवारी तातडीची सुनावणी
महाराष्ट्र आणि गुजरातमधील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी दाखल केली याचिका
शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल व खुशी बांगीया यांनी ही जनहित याचिका केली आहे.
या सरकारी सुट्टीमुळे शैक्षणिक नुकसान तर होतंय तसेच बॅंका बंद असल्याने आर्थिक फटका बसत असल्याचा दावा
कल्याण,पालघर,रायगड,रत्नागिरी,मावळ या लोकसभा मतदार संघांचा समावेश होत असून यापैकी फक्त भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा असून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसचे प्रमुख नेते महाराष्ट्र प्रभारी रमेश
रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे, तर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून. त्याच न्यायाने राष्ट्रवादीच्या दुसर्या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर इत्यादी नेत्यांना निमंत्रण
- क्रिकेट, सिनेमा, उद्योग इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटीज यांना सुद्धा निमंत्रण
- देशातील कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही. केवळ राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उत्तरप्रदेशात कार्यक्रम होत असल्याने तेथील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रण
- भाजपाचे निमंत्रण हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांना. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांना निमंत्रण नाही.
- याशिवाय, 8000 निमंत्रितांमध्ये मोठा घटक हा देशभरातील संत-महंत. महाराष्ट्रातून अशा 409 संत-महतांना निमंत्रण
अमरावती : महाविकास आघाडीचं सरकार (MVA) जाऊन दोन वर्षे ओलांडली आहेत. तरीही यांचा काही समजोता झाला नाही. अजून 48 जागांचं (Lok Sabha Election 2024) वाटप नाही. मला शंका येतेय की यांना खरंच भाजपला (BJP) हारवायचं का? काँग्रेस (Congress) म्हणते आमचंच पक्क झालं नाही, मग तुम्हाला कुठून दोन जागा देणार. यांना फक्त कुणीतरी कुर्बाणीचा बकरा हवंय. ते बकरा आम्ही होणार नाही, असे वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते. इंडिया आघाडीत जर जागावाटपामध्ये तडजोड झाली नाही तर आम्ही 48 जागा लढू, असेही आंबेडकरांनी सांगितलं.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे
मुंबई विद्यापीठाच्या दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या एकूण १४ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे
या परीक्षा दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येतील
तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ३ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
यातील प्रथम वर्ष बीए सत्र १ व प्रथम वर्ष बीकॉम सत्र १ या परीक्षा २२ जानेवारी ऐवजी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी व एमएमएस सत्र २ ची परीक्षा २२ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
मुंबई : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले. ते आज वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते... नगर शहराचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना लवकरच मंत्रीपदाची संधी भेटेल असं वक्तव्य ही त्यांनी यावेळी बोलताना केलं...अहमदनगर जिल्ह्याला क्रीडा विभागासाठी अपेक्षित निधी देण्याचे कबूल करतांना त्यांनी संग्राम जगताप यांचा लवकर भविष्यातील 'नामदार' असा उल्लेख केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मधील मोती तलावात मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सावंतवाडीच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मोती तलावात मगरीचे दर्शन दिसल्याने मोती तलावाच्या काठावर बसणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भर वस्तीत असलेल्या मोती तलावात मगर आली कशी याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.
Ram Mandir: 22 जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या पूजाविधींचा आजचा पाचवा दिवस आहे. आज रामाची मूर्ती गर्भगृहात आणण्याची शक्यता आहे. आज पूजाविधीनंतर मंदिर बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे
Palghar News : पालघरमधील ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार गरोदर माता आणि गर्भातील बाळाच्या जीवावर बेतला. वेळेत उपचार न मिळाल्याने 25 वर्षीय गरोदर मातेसह गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप आहे. गरोदर माता रूपाली रोज हिच्यासह गर्भातील बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या मातेच्या गर्भातील बाळाचा आधीच मृत्यू झाल्याची मोखाडा रुग्णालय प्रशासनाची माहिती दिली आहे.
Manoj Jarange : सरकारला 7 महिन्यांचा वेळ दिला पण आता कुठलीही चर्चा नाही जरांगे म्हणाले..मराठा बांधवांनी आरक्षणासाठी दिलेल्या बलिदानामुळे मन व्यथित होत असल्य़ाचं जरांगे म्हणाले.. पत्रकारांशी बोलताना जरांगे भावूक झाले.. सरकारच्या दारात मरण आलं तरी मागे हटणार नाही असं म्हणताना जरांगेंच्या डोळ्यात पाणी आलं.. दरम्यान आमरण उपोषण करतच मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत..
Solapur News: प्रभू श्री रामाच्या प्रतिष्ठापनेचा उत्साह देशभरात दिसून येतोय. सोलापुरातील हिंदू समाजाच्यावतीने अयोध्येत भंडारा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ज्यामध्ये सेवा करण्यासाठी 40 स्त्री-पुरुषांची पहिली तुकडी रात्री उशिरा अयोध्येकडे रवाना झाली. प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यानंतर देशातून हजारो राम भक्त अयोध्येत येणार आहेत. त्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून सोलापूरकरांच्या वतीने 24 जानेवारीपासून सलग 45 दिवस भंडाऱ्याचे आयोजन अयोध्येतच करण्यात आले आहे. दररोज चार हजार लोकांसाठी या भंडाऱ्यात जेवणाची व्यवस्था असेल. 45 दिवसात सुमारे एक लाख 80 हजार भाविकांना या भंडाऱ्यात जेवणाचा आस्वाद घेता येईल. सोलापुरातल्या बचत गटाच्या महिलांकडून हे जेवण बनविले जाईल. स्वयंपाकसाठी लागणारे साहित्य अयोध्येतून खरेदी केले जाईल. भंडाऱ्याची ही सेवा करण्यासाठी 40 सेवेकर्यांची पहिली तुकडी अयोध्येला रात्री रवाना झाली. सोलापुरातील जवळपास दोनशे सेवेकरी अयोध्येत दाखल होतील.
Share Market: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शेअर बाजारासह चलन आणि रोख बाजारातील व्यवहार त्या दिवशी पूर्ण बंद राहणार आहेत. तसंच राष्ट्रीय शेअर बाजारानं 20 जानेवारीला सुट्टीच्या दिवशी व्यवहार सुरू राहणार असल्याचे जाहीर केलंय.
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळात सुनावणी असून अजित पवार गटाच्या वतीने फेरसाक्ष देण्यात येईल. शरद पवार गटाचे वकील अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांना सवाल करतील. अजित पवार गटाच्या वतीने नुकतंच जे प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये अजित दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रतिज्ञापत्र आहे
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार आहेत. आज दुपारी ३ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.
22nd Jan Holiday In Maharashtra: महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. त्यामुळे २२ जानेवारी रोजी राज्यातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद राहणार आहेत.
Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे आज सकाळी ९ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. २६ जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे. आतापर्यंत सरकारनं त्यांची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न केले, मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. ५४ लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -